सोमवार, १७ जानेवारी, २०२२

रेल्वेतील माझा रोचक प्रवास

दि.३जानेवारी २०२२- नविन वर्षात सांगतो कि आपले मन हे फार चंचल  व अस्थिर असते ते केव्हाच एका ठिकाणी स्थिर राहू शकत नाही.सारखेच इकडून तिकडून फिरत असते.मग त्यावर उपाय काय? माझा जवळ त्यावर एक मार्ग  आहे. प्रथमदर्शनी तो थोडा फार अवघड वाटतो.पण एकदा का तो तुम्हांस  समजला,उमजला  कि तुम्ही त्यावर स्वार होऊन त्यावर आपला हक्क गाजवता.तसे कसे काय? थोडं थांबा मित्रांनो,मी तुम्हांस तो मार्ग सांगणारच आहे.पण त्याअगोदर आपण थोडा वेगळाच अनुभव   घेऊ या.समजा तुम्हांस मी ही एक विशिष्ट गोष्ट करू नको असे म्हणालो तर तुम्ही ती गोष्ट काळजीपूर्वक करताच.उदाहरणार्थ जेव्हा  तुम्हीच तुमच्याच मनाला दहा वेळा " हे करू नको " वा "ते करू नकोस"  असे सांगून त्याची जणुकाही लहान मुलाप्रमाणेच त्याची  उजळणी घेत असता आणि ते मन आज्ञाधारक मुलाप्रमाणेच काम करत असते.वागत असते.आता त्याचा काय दोष? तुम्हीच सांगितल्यावर ते काम  करणार कारण ते तुमचे मन  आहे,माझे नव्हेत..काय मित्र हो,मी बरोबर बोलतो आहे ना..तुम्हांस काय वाटते. 
दुसरे उदाहरण बघू या..समजा असे समजा तुम्हांस सकाळीच साडेचार वाजताच उठायचं आहे आणि तुम्हीच आदल्याच दिवशीच रात्री झोपण्यापूर्वी तुमच्याच घड्याळात सकाळचा गजर लावून झोपता.ऐवढेच करून थांबता का ? काही अजून करता.? मी तुम्हांस उत्तर विचारणार नाही आहे.कारण ते मला माहीत आहे.कारण  तुम्हीसुद्धा माणूस आहात आणि तुम्ही वेगळं काय करणार?हे मलाच पक्कं ठाऊक आहे..तर तुम्ही काय करता, दहा बारा वेळा तुमच्याच मनाला खडसावून सांगत असतात कि सकाळीच साडेचार वाजताच उठायचं आहे.एवढंच करून थांबता का ? नाहीतर तर तुम्हीच मनाला तशी तंबीसुदधा देता.मग बिचारे काय करणार ते तुमच्याच घड्याळात लावलेल्या गजरा अगोदरच उठून बसते...बरोबर की नाही.? ह्यात मला असे म्हणायचेय की आपले मन  हे फार  प्रामाणिक पणे काम करत असते.तुम्ही त्याला जसे सांगणार तसे ते काम करेल. हयात त्याचा काय दोष?
तर मित्र हो,मला जो विचार  मांडायचा आहे तो असा कि आपले मन  हे को-या पाटी सारखं आहे.तुम्ही त्यावर जे लिहिलंय वा सांगणार ते तसंच काम करणार. काहीही चूक करणार  नाही.ह्याची खात्री बाळगा.तुम्हांस ते धोका देणार नाही.कारण ते   देवाने बनवले आहे.माणूस एकवेळ धोका देऊ शकतो पण मन नाही.तेव्हा आपण त्याची काळजी घेतली पाहिजे.त्याचा कणाकणात परमेश्वर वास करत असतो.दया ,करूणा,परोपकार, प्रेम,माया,वासना,हिंस्र, आनंद, दुःख,विरह,असे सर्व  गुण व अवगुण आपल्या मनात भरलेले असतात. तुम्ही जसे भाव आपल्या मनात निर्माण करणार तसे ते काम  करते.आजच्या संगणक युगात सांगायचंय झाले तर  समजा तुम्ही तुमच्या संगणकावर काम करताहेत व काम  चालूच असतानाच  आपल्या मॉनिटर वर अधूनमधून एक मेसेज झलकत असतो की आपण केलेले काम सेव करायचंय कि डिलिट आणि तुम्हीच जोपर्यंत आपल्या संगणकाला सांगणार  नाहीत तोपर्यंत तो मेसेज  जाणार  नाही..मग तुम्हीच जसे कि बोर्ड वर  कि दाबणार तसे ते काम  करते.तुम्ही एस म्हणाले तर  एस  म्हणून झालेले काम  सेव करते आणि तुम्ही नो म्हणाले तर  ते झालेले काम  डिलिट करते. म्हणजेच काय  तर  ते सुद्धा तुमच्या मनाप्रमाणे काम करते.थोडक्यात काय तर जे पेरलं ते उगवणार...दुसरे काहीच नाही......थोडक्यात काय तर  Output is always depends on input  " आता आपण मूल मुदधाकडे येऊ..मनावर नियंत्रण कसे करावे.? तर मनावर संस्कार करावे. चांगले की वाईट हे तुम्हीच ठरवावे....मनाला आचार विचार ह्याची ओळख करुन द्यावीत. मनाला नेहमीच मदत करायची.मनाला खरं काय खोटं काय..ह्याची जाणीव करून द्यावीत. मन संपूर्णपणे तुमच्याच आदेशानुसार काम करत राहते.तेव्हा तुम्हीच त्याचे मालक आहात असे मी म्हणणार नाही तर तुम्हीच त्याचे पालक व्हा आणि मग बघा ते तुमच्याच आज्ञेत राहणार. कारण कर्ता करवीता  तुम्हीच आहात. हे विसरू नका. मन तुमच्या ईशा-यावर काम करणार ह्यात किंचितही शंका नाही...मग चला तर...कामास लागा. हो .....तत्पूर्वी माझ्या लेखनाच्या सुरुवातीस सांगितल्या प्रमाणे..मनावर  नियंत्रण वाटते तेवढं सोप्प नाही.येथे मी लहानपणी शिकलेली एक कविता,थोर कवयित्री # बहिणाबाई # सांगितल्या प्रमाणे," मन वढाय...वढाय जसं शिवारातील ढोरं "" तेव्हा विचार करूनच  निर्णय घ्या.पण  अशक्य नाही.प्रथमदर्शनी तो थोडा फार अवघड विषय वाटतो.पण एकदा का तो तुम्हांस  समजला,उमजला  कि तुम्ही त्यावर स्वार होऊन त्यावर आपला हक्क गाजवता...@लेखनकौशल्य-उदय माळगांवकर, कल्याण. 

लेबल:

0 टिप्पण्या:

टिप्पणी पोस्ट करा

याची सदस्यत्व घ्या टिप्पणी पोस्ट करा [Atom]

<< मुख्यपृष्ठ