आंतरिक इच्छा आणि समाधान
....आज परत मी त्याच देवळात गेलो.पण ह्यावेळेस सर्व काही वेगळेच स्थिती होते.कारण देवळात समोर देवाची मूर्ती उभी होती आणि आजूबाजूला थोडीफार गर्दी होती.सर्वत्र लगभग चालू होती आणि सर्वत्र मंगलमय वातावरण निर्माण झाले होते. सभोवार फुलांचा सडा पडला होता व त्याचा सुवास सगळीकडे दरवळत होता.घंटानाद अधूनमधून चालू होता..आज माझ्यासारखेच बहुतेक लोक तिथे होते.आज माझी वेळ बदलली होती.घड्याळात साडेसहा वाजले होते.
मित्र हो ,आज ह्या संदर्भातील मी तुम्हांस एक गोष्ट सांगणार आहे. ते असे आहे की वेळ बदलली कसा चमत्कार होतो.आपल्या जीवनात कसा बदल होतो.आपणास असलेले दुख, चिंता, मनातील अशांतता,सर्व काही क्षणातच बदलते.थोड्याच वेळात सर्व काही बदलुन जाते.पण त्यासाठीच आपल्याला थोडा धीर धरावा लागतो..बरोबर आहे ना मित्रांनो..मी बोलतो ते खंर आहे का ? तर आता आपण मूळ मुद्यावर बोलूयात...
मगाशीच सांगितल्याप्रमाणेच जर आपली वेळ बदलली तर सर्वच काही बदलते.कारण तो निसर्गाचा नियम आहे आणि तो कोणालाही चुकला नाही.मग तो कोणीही असो ...देवळातील देव असो वा पृथ्वीतलावरील मनुष्य. नियम सर्वानाच सारखाच... असे मी का म्हणतो कि कित्येक वेळा देवळात कोणीही नसतो.देव एकटाच असतो.देउळ बंद असते.. एव्हाना पुजारी सुदधा नसतो...त्याला भक्तांची वाट पाहावी लागते आणि आपण सर्वानीच ह्या कोरोना काळात हे सर्व अनुभवले आहेत. तसेच माझे झाले होते...
मी फार वर्षांपासून एक ईच्छा मनात बाळगून होतो.पण ती काही पुर्ण होत नव्हती. कारणे त्यासाठी भरपूर होती.हो... पण मी स्वस्थ सुदधा बसून राहत नव्हतो.काही ना काही हालचाल करत पण मला यश येत नव्हते.मी फार विचार करायचो.पण काहीही होत नव्हेते..मी पुष्कळ लोकांना माझी ईच्छा सांगू लागलो.पण काही फरक पडला नाही.मग मी मनाशीच ठरवून टाकलो की ही वेळ माझ्यासाठी नाही आहे. वेळ योग्य कि अयोग्य असते किंवा नसते.ह्यात मी पडणार नाही....आपण ठराविक वेळेची वाट पाहिली पाहिजेत. अशी मनाची समजुत काढली व तो विषय तिथेच सोडून दिला पण मनातील आंतरिक ईच्छा काही सोडली नाही...
मित्र हो आता ह्या गोष्टीस चाळीस-बेचाळीस वर्ष झालीत..आणि अचानक एक दिवस मला माहिती मिळाली की आता तुझी वेळ आली आहे.आता तुझी अतृप्त ईच्छा पुर्ण होणार आहे.मग काय मी कामाला लागलो..आता मला ही सुर्वणसंधी सोडायची नव्हती..मी कितीही कष्ट करायला तयार होतो..पण मला ही वेळ सोडायची नव्हती.काही ही झाले तर मी ही आंतरिक ईच्छा पुर्ण करणार होतो....
सर्व काही झाले.मी माझे कामाचे नियोजन करून, सर्व काही तयारी करून मी त्यावेळची वाट पाहू लागलो.
अचानक एक नविन वार्ता माझ्या कानावर आली.अजून थोडीफार अडचण आहे.मी घाबरून न जाता त्यावर मात कशी करायची ह्याचा विचार करून पुढील वाटचाल केली. कारण ती माझी आंतरिक ईच्छा होती आणि ती मला पुर्ण करायची होती .मग लगेच क्षणभर ही वेळ न दवडता सरळ मी देवळात आलो आणिक देवालाच साकडे घातले .सरतेशेवटी मला माझा मार्ग सापडला..
कालच माझी आंतरिक ईच्छा पुर्ण झाली..वाचक हो पण मी तुम्हांस माझी ही आंतरिक ईच्छा कोणती ती सांगितलीच नाही.. आता तुम्ही म्हणाल अशी कोणती तुमची आंतरिक ईच्छा होती.ती एवढी वर्ष तुम्हांस वाट पहावी लागली.....तर मित्र हो..ती आंतरिक ईच्छा म्हणजेच " फोटोग्राफर होण्याची " छायाचित्रकार व्हावे. हीच लहानपणापासूनच आंतरिक ईच्छा होती.मला माझ्या लहानपणापासून मला माहीत आहे की त्यासाठी फार मेहनत लागते.तसेच कॅमेरा घ्यायला पैसे फार खर्च होतात. हे मी ऐकून होतो.पण केव्हाच त्याचा संबंध आला नाही.तसेच त्याचे शास्त्रशुद्ध प्रशिक्षण घेणे.हे सुद्धा सहज उपलब्ध नसते.कारण त्यावेळेस एवढ तंत्रज्ञान विकसित झाले नव्हेते.फार अडचणी होत्या. पण आता तसे नाही आहे...
आता मित्र हो,तुम्हांस काय सांगू की मी किती आनंदात आहे.माझा आनंद गगनात मावत नाही आहे..मला इतका हर्ष होत आहे की मी लहान मुलाप्रमाणेच सैरावैरा इकडे तिकडे उड्याच मारीत आहे..पण हे माझे वय नाही.आता मी पंचावन्न वर्ष पूर्ण केली आहेत. पण माझ्यातील बालक अजून पर्यंत तरूणच आहे.त्यामुळेच मला झालेला आनंद मी कुणास काय सांगू काय नको सांगू असे मला झाले आहे...थोड्याच वेळात मी भानावर आलो व लगेच परत देवळात आलो.कारण ही वेळ आता मला देवाने दिली होती...मी त्यास मनापासुन नमस्कार केला व त्याचे आभार मानून परत घरी आलो...
मला पुर्ण समाधान झाले आहे .येथे मी एवढंच सांगेन की वेळ बदलत असते तेव्हा धीर धरा....निराश होऊ नका..वेळ बदलायला थोडीफार वेळ लागतो ..पण ती वेळ आज ना उदधा तुम्हांस मिळणार.वेळ कदाचित यायला उशीर होतो पण ती येत नाही असे केव्हाच होत नाही.देव तुम्हांस संधी जरूर देणार. ह्यात तिळमात्र शंका नाही.हा माझा स्व अनुभव आहे.....आता मी असे म्हणेन "आंतरिक इच्छा आणि समाधान ह्या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत...
विशेष नोंद- मला मिळाले प्रमाणपत्राचा दाखला सोबत जोडत आहे.
@लेखनकौशल्य-उदय माळगांवकर

1 टिप्पण्या:
अप्रतिम लेखन आणि भावना व्यक्त केल्या आहेत सर तुम्ही. तुमच्या मधल्या लेखकाला आणि फोटोग्राफर यांना माझे मनापासून अभिवादन.
टिप्पणी पोस्ट करा
याची सदस्यत्व घ्या टिप्पणी पोस्ट करा [Atom]
<< मुख्यपृष्ठ