शनिवार, १५ जानेवारी, २०२२

"मॅडमसर "बोला....आता नाही तर केव्हा??

आजच्या लेखातील नावावरून जरा काहीतरी विलक्षण पण बोधप्रद आणि नाविन्यपूर्ण आपला अनुभव लिहित आहे.

आज कित्येक  दिवसानंतर मला एका शासकीय ऑफिसात जाण्याचा योग आला होता आणि मी आनंदून  गेलो होतो.कारण तुम्हांस तर माहित आहे.शासकीय विभागात सरळ किंवा सहजा सहजी मुख्य अधिका-याची भेट होऊ शकत नाही.त्यात कारणे पुष्कळ असतात. जसे तुम्ही कोणत्याही  महत्वाच्या आणि उच्च शासकीय अधिका-यास पूर्व अनुमती किंवा त्याची सहमती असल्याशिवाय तुम्ही त्यास भेटू शकत नाही. त्याची  किंवा तिची भेट होणे.फार दिव्य असते. 

आजच्या काळात सांगवयाचे म्हणजे प्रथम आपणास त्यांची कायदेशीर सहकारी नियमानुसार अपाॅयमेन्ट  त्याच्या सचिवामार्फत किंवा पर्सनल सेक्रेटरी मार्फत घ्यावी लागते. नंतर ठरवलेल्या भेटीच्या आदल्याच दिवशीच वेळे पुर्वी  त्यांस फोन काॅल करून आपण येणार आहोत याची खात्री द्यावी लागते.तरच तुम्हांस त्याची भेट घडू शकते .अनथा नाही....आणि एवढे करून सुद्धा जर तुम्ही ती वेळ चुकवली वा तुम्हांस थोडीफार  उशीर  झाला तर तुमचे काही खंर नाही..त्यांचा सचिव वा पर्सनल सेक्रेटरी तुम्हांस पळो कि सळो करून सोडणार.

तेव्हा मी अगोदरच काळजीपूर्वक नियोजन करूनच  निघालो.तरी मला थोडासा उशीर झाला.मी काही मुद्दामहून उशीर केला नव्हता. त्यास कारणीभूत दुसऱ्याच होता. झाले असे की माझ्या सवयी नुसार मी दिड दोन तास अगोदरच घरातून बाहेर पडलो होतो.आज मी एका खास व्यक्तीस  भेटणार  होतो.म्हणून  मी तरातरा  रस्त्यावरून  झपझप  पावले  टाकत  चाललो होतो..एवढ्यात माझी टक्कर रस्त्यावरून चालणा-या दुसऱ्याच व्यक्तीशी झाली. मी त्याला  काहीतरी बोलणारच  होतो.इतक्यात त्यांनीच मला कडकडून मिठी मारली. मी त्याला दुर सारत म्हणालो कि मी तुम्हांस ओळखले  नाही. तर तो माझे बालपणातील टोपण  नावाने हाक मारत,माझ्या  पाठीवर  थाप मारत मला म्हणाला. अरे गाढवा....मी तुझा बालपणाचा सवंगडी. बालमित्र...वगैरे वगैरे....

मग काय आमच्या गप्पा सुरू झाल्या आणि वेळ कसा निघून गेला ते समजलेच नाही.मग आता करणार काय, तो माझा फार जुना शालेय मित्र होता आणि मी त्याला रोखू  शकत नव्हतो. त्याला पाहून मला थोडे आश्चर्य वाटले.कारण माझ्या  माहितीनुसार तो ह्या शहरात राहत नव्हता. आणि आम्हाला दोघांना भेटून जवळपास वीस पंचवीस वर्षे झाली होती. मग काय मी प्रथम दर्शनीय त्याला  ओळखलंच  नाही.कारण त्याची शरीरयष्टी बदलली होती. तो फारच वेगळाच वाटत होता.त्याची उंचीसुद्धा वाढली होती.त्याचा चेहर्‍यावरील तेच वेगळेच जाणवत होते. क्षणभर मी विचारात  पडलो. इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्यावर आम्ही भानावर आलो.कारण आम्ही रस्त्यावरच बोलत होतो.मी त्याला म्हणालो ,मला एका शासकीय ऑफिसात जायचे आहे.आणि अगोदरच मला उशीर झालाय.एवढ्यात तो कसा म्हणतो...अरे माझे ऑफिस येथून तर जवळपास आहे.

आपण प्रथम माझ्या ऑफिसात जाऊ या. तेथे चहापानानंतर तु तुझ्या  पुढील कामाला जा..ठरल्याप्रमाणे आम्ही  दोघंजण चालत चालत त्याच्या ऑफिसात पोहचलो. चहापानानंतर मला त्यांनी माझ्या आजच्या कामाबद्दल विचारले व तुला कोठे जायचे आहे.असे विचारले.मी माझ्या शर्टातील लिफाफा काढून त्याला दाखवला व विचारले.हे ऑफिस कुठे आहे.फक्त लिफाप्या वरील मागील बाजूंवर असणारा पत्त्या वाचून  तो म्हणाला  " अरे हे तर ,माझ्या ऑफिसच्या पाठीमागे आहे. आणि हो ,मी तुला सांगयलाच विसरलो की माझी धर्म पत्नी ( तुझी वहिनी) तेथेच  काम करते.मग त्यांनी त्याच्या साहेबाची परवानगी ( फक्त दहा मिनिटांची ) घेऊन  आम्ही  दोघंजण त्या ऑफिसात आलो.ऑफिस फार मोठ होते.तो मला म्हणला " तू वर ऑफिसात  जा..मी काही येत  नाही.कारण  माझा साहेब  माझी वाट पाहत आहे.तेव्हा मी जातो.

मग मी ऑफिसातील पायऱ्या चढून वर दुसऱ्या मजल्यावर आलो.पाकिटावर असलेला पत्त्यावर आलो. नाव व खोली क्रमांक ह्याची  खात्री करूनच योग्य  त्या ऑफिसच्या बाहेर थांबलो.त्या ऑफिसच्या बाहेर एक शिपाई बसला होता.मी माझे अपाॅयमेन्टचे पत्र त्यास दाखवले.तो ते पत्र पाहून  थोडे थांबा. असे म्हणून आत ऑफिसात गेला..थोड्याच वेळात तो बाहेर येऊन मला कसा म्हणतो...मॅडमनी तुम्हांस आत बोलवले आहे..मी आत ऑफिस मध्ये आलो.सुरवात  कशी आणि कोठून करावी.हे मला समजत नव्हतं.मी मॅडमला पाहता क्षणीच ओळखले. कारण  तिच्या  नावाची पाटी वाचून मला समजले कि ही आपल्या मित्राची धर्मपत्नी आहे ते..अर्थातच  आपली वहिनी...मग ह्यांना काय  म्हणावे....किंवा कोणत्या नावाने आदरतीथ  करावे.मॅडम म्हणावे कि मॅडम सर म्हणावे.हेच मला समजत नव्हते .मी थोडा भांबावून गेलो.माझी ही मनातील  घालमेल पाहून  मॅडमनेच  मला बसायला सांगितलं. त्यांही मला ओळखत  नव्हत्या..कारण थोड्याच वेळापूर्वीच मला माझ्या  मित्राने आपल्या धर्मपत्नी बद्दल  सांगितले होते.....माझे सर्व म्हणणे मॅडमला सांगत होतो.मला घाम पुटला होता.मी अधूनमधून माझा घाम पुसत होतो.मी माझ्या आयुष्यात पहिल्यांदाच अशा उच्च शासकीय अधिकार व्यक्तीस भेटत होतो.आणि विशेष करून ती माझ्या  मित्राची धर्मपत्नी होती.....

क्षणार्धात मी विचार करता करता माझ्या घरात  येऊन  पोचलो. आता माझी पत्नी माझ्या डोळ्यासमोर  दिसत  होती. माझी पत्नी घरीच  काम करत होती.तिचे शिक्षण जेमतेम झाले होते.पण घरकामात ती फार तेज होती.सर्व घरी येणाऱ्यांची ती उठबस ती व्यवस्थित करायची.तिचे कोणतेच काम निष्फळ नव्हते. पण आजच्या जीवन शैलीत मी असे म्हणेन, थोडक्यात काय तर ती "हाऊस वाईप"   होती.मी तिला केव्हाच  मॅडम किंवा मॅडम सर असे म्हणालो नाही. का ..बरं?  का ...ती काही ,काम करत नाही.? का ...ती काही, स्वतःचे निर्णय घेऊ शकत नाही? का...ती काही,स्वतःची मत मांडू शकत  नाही ? का ..ती कोठे कामामध्ये कमी पडत का?? असे एकना अनेक प्रश्न माझ्या मनात  घोंगावत राहिले.माझे डोके विचार करून करून थकले.माझे डोळ्यासमोर अंधार पडू लागला...एवढ्यात मॅडमने मला जोरात सर म्हणून हाक मारली .आणि माझी तंद्री भंग पावली..आणि मी भानावर आलो.

मी ऑफिसातील  माझे  काम संपवून बाहेर निघायच्या  अगोदर, " मॅडम सर" म्हणून त्याचे आभार  मानून  बाहेर  आलो.मी माझ्या मित्राला फोन  करून त्यास मनापासुन धन्यवाद दिले व त्याला घरी जेवायला ये.असे आमंत्रण अर्थातच सहकुटुंब सहपरीवार या..असे म्हणून घरी निघालो..

आज मी एक नविन गोष्ट शिकलो होतो.हयापुढे मी माझ्या पत्नीस " मॅडम सर " असे संबोधून  तिचा गौरव  करणार होतो..... तिला आता केव्हाच  तिच्या  नावाने हाक  मारणार  नाही.असा मनोभावे निश्चय करून  घरी आलो.आज माझ्या मनात तिच्याबद्दल फार आदर होता. कारण माझ्या मुलांवर संस्कार करण्यास तिचा फार मोठा मोलाचा वाटा आहे.माझ्या मुलांना काय  हवंय, काय नको...ह्याचा सर्व  लेखाजोखा तिच्या डायरीत  लिहिलेला  असतो.प्रत्येक  गोष्टींवर  तिचा बारीक सारीक  लक्ष्य  असतो.एक वेळ  माझी मुलं मला काहीच  सांगत  नाहीत ....पण तीच  मुलं तिच्या  आई पासून  काहीच लपवून  ठेवत  नाहीत.हे फार मोठे  कार्य व मुलांचा विश्वास  तिने संपादन केला आहे.मुलांच्या आजारपणात तिचे फार मोठे कष्ट असतात. तेव्हा तिचे हे " योगदान" मी आता  वाया जाऊ देणार  नाही. आजपासून नव्हेतर आता ह्या क्षणापासून मी तिला "मॅडमसर " असेच म्हणणार.....

विशेष नोंद-मित्र हो ,हे सर्व माझे विचार  वा व्यक्तिगत मत आहे.तेव्हा तुम्हांस काय वाटते.ते जरूर कळवा.खालील दिलेल्या कॅ काॅमेट बॉक्समध्ये जरुर लिहा.....शुभरात्री....

@लेखनकौशल्य-उदय माळगांवकर. 

लेबल:

0 टिप्पण्या:

टिप्पणी पोस्ट करा

याची सदस्यत्व घ्या टिप्पणी पोस्ट करा [Atom]

<< मुख्यपृष्ठ