दोनच शब्द-पॉझिटिव्ह या निगेटिव्ह.
मित्र हो ,ह्या कोरोना काळात आपण सर्वजण एकाच गोष्टीवर ठाम आहोत आणि ते म्हणजेच " मी कोरोना पॉझिटिव्ह झालो नाहीतर माझा कोरोना टेस्ट रिपोर्ट निगेटिव्ह आला.दुसरे सर्व निष्क्रिय.शेवटी बाकी शून्य....
ह्याची तुलना इतरांशी करूच शकत नाहीत. आपण ह्यांना एवढे का घाबरतो.? आपणास हेच दोन शब्द आताच कानावर पडतात का? पुर्वी केव्हाच हे दोन शब्द ऐकावयास मिळालेच नाही का ?
मग लहानपणापासूनच आपल्यावर जे संस्कार झाले ते काय होते.? लहानपणापासूनच आपणास अशी शिकवण देण्यात आली होती कि कोणत्याही गोष्टीकडे आपण सकारात्मक म्हणूनच पाहावयास हवे.नकारात्मक ह्या शब्दास कोणत्याच थारा देऊ नये. त्याला जवळ करू नये...जे काही करायचंय ते सकारात्मक असावे...मग आता काय बरं आपण ह्या शब्दापासून दूर धावतो आहोत. आपण त्याचा तिरस्कार का करत आहोत? तेव्हा आपणास ह्याचेच ज्ञान नव्हत का?त्या नकारात्मक शब्दाचे एवढे महत्त्व असेल असे आपल्याला तेव्हाच का वाटत नव्हेत? त्याचा आपण सर्वजण तिरस्कार का करत होतो? आणि आता त्याला कवटाळत आहोत. प्रत्येकजण देवाकडे एकच मागणे मागत आहे .माझा कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह येऊ देत. निगेटिव्ह रिपोर्ट हाच माझा मित्र... वगैरे ..वगैरे....हे असे का ?
हा मोठाच गहन विषय आहे.तो समजायला फारच कठीण आहे..माझ्या अल्प बुद्धी जीवाला जे समजले ते असे आहे. प्रत्येकास विचार व्यक्त करण्याचा अधिकार आहे.वा तो आपले मत व्यक्त करू शकतो.त्यामुळेच आपण माझ्या मताशी सहमत असाल किंवा नसाल .ह्यावर दुमत नाहीच तर ..मित्र हो ,ज्या कोणी साहित्यिकांनी वा आपल्या विद्वान लोकांनी वा आपल्या पूर्वजांनी ह्या दोन शब्दाची निर्मित केली आहे ती फारच विचारपूर्वक केली आहे...जर तुम्हांस दोन शब्दात किती ताकद आहे.हे जर अनुभवाचे असेल तर आपण त्या दोन्ही शब्दाचा जवळून अभ्यास केला पाहीजेत.त्यांचाशी एकरूप झाले पाहिजेत. तुम्ही म्हणाल ते कसे काय?
समजा मी समुद्र किनाऱ्यावर बसलो आहे आणि समुद्राकडे पाहत आहे.तेव्हाच एकजण माझ्याजवळ येऊन म्हणतो कसा ? समुद्र फार खोल आहे.मी क्षणभर विचार करून म्हणेन मला माहीत नाही कारण मी तिथे गेलो नाहीच. मला त्याचा अंदाज नाही. म्हणजेच काय तर , समुद्र किनाऱ्यावर बसून आपणास समुद्राच्या पाण्याची खोली मोजता येत नाही तर ती अनुभवावी लागते. समुद्रात उतरून पाण्यात जावे लागते..आपणास किनाऱ्यावर बसून हे करता येणार नाही...समुद्र कसा आहे ? हे जर अनुभवायचे असेल तर पाण्यात उतरा..आणि मगच आपले अनुभव कथन करा. समुद्र फारच खोल आहे कि नाही...
तशीच स्थिती आज ह्या कोरोना काळात निर्माण झाली आहे.कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला किंवा निगेटिव्ह आला तर त्यापासून घाबरून जाऊ नका.तर त्यावर मात करून त्या गोष्टीचा अनुभव घ्या. दोन्ही शब्दात ताकद आहे .दोन्ही शब्द सारखेच. चारच तर अक्षरे आहेत......मग घाबरता कशाला ? आपणास अनुभव वेगवेगळे प्राप्त होतील.पण फुकट काही जाणार नाहीत. ऐवढे मी खात्रीपूर्वक सांगू शकतो..बाकी आपण सर्वजण सुजाण नागरीक आहात तेव्हा जास्त विचार न करता. आपण अनुभव घ्या.मला आपले मत जरूर कळवा.हीच माफक अपेक्षा......धन्यवाद
@लेखनकौशल्य-उदय माळगांवकर

0 टिप्पण्या:
टिप्पणी पोस्ट करा
याची सदस्यत्व घ्या टिप्पणी पोस्ट करा [Atom]
<< मुख्यपृष्ठ