सोमवार, १७ जानेवारी, २०२२

माझा मास्क माझी सुरक्षा

 💐कोविड-१९ निवारण गाथा💐

 (  माझा मास्क माझी सुरक्षा - समांतर रचना  ) 💐


जेथें जातों तेथें ( रात्रंदिवसा) तुं ( तोंडावरील मास्क)माझा सांगातीं  ( सतत सोबतीला )| 

चालविसी हातीं (कोविड नियमावली)  धरूनियां ||१||


चालों वाटे आम्ही ( पोटापाण्यासाठी पायपीट ) तूझाचि आधार |

 चालविसी भार (कोरोनापासून सतत बचाव)सर्व माझा  ||२||


बोलों जातां बरळ ( कळत नकळत) करिसीं ते नीट | नेली लाज ( पॉझिटिव्ह झालो तर..) धीट  केलों देवा ||३|| 


अवघे जन (हितचिंतक वा शत्रू) मज जाले   लोकपाळ ( कायदा कानून रक्षक )  | सोइरे सकळ प्राणसखे ( शेवटी घरच्याच आधार)  ||४||


तुका (...आजवर कोविड झाला नाही असा  व्यक्ति)म्हणे,आता खेळतो कौतुके (कोविडपासून बचाव व निवारण कसे करावे.  ह्याचेच स्वःअनुभव सांगत फिरतो )|


जाले तुझे सुख (कोविड समूळ  उच्चाटन)अंतर्बाही ||५||


 संदर्भ  - वर्तमान स्थितीवर अवलोकन ( माझे  कुटुंब माझीच जबाबदारी)


मूळ विचार - कोरोनाला हरवूया देश वाचवूया. 

💐💐🙏


       हा माझ्या अल्पबुद्धीला समजलेला भावार्थ आहे. प्रत्येकास त्याचा त्याचा   वेगळा भावार्थही उमगू शकतो. जगतगुरू श्री संत तुकाराम महाराज व त्याचे अभंग हे अथांग आहे. त्याचा भावार्थही तसाच अथांग. त्यामुळे मला केवळ माझ्या मनातील विचार व्यक्त करावेसे वाटले म्हणून मी ते भावार्थ स्वरूपात लिहिले आहेत.  


@लेखन कौशल्य-उदय माळगांवकर 

लेबल:

0 टिप्पण्या:

टिप्पणी पोस्ट करा

याची सदस्यत्व घ्या टिप्पणी पोस्ट करा [Atom]

<< मुख्यपृष्ठ