सोमवार, १७ जानेवारी, २०२२

लघू लेखन - जैसे ज्याचे कर्म.

आज अचानक माझ्या कानावर बातमी आली की आपला उदयन ह्याला कोरोना झाला.आणि लगेच क्षणभर माझ्या डोळ्यासमोर त्याचे ते बेफिकीर वागणं, कोरोना त्याचाच जणू मित्र असे त्याचे ते वेळ अवेळी रात्रंदिवस फिरणं, मास्क न घालताच बाजारात वा गर्दीत जाणे.आणि एवढं होऊनसुद्धा जर कोणी काहीच उपदेश द्यायला लागेले तर त्यास उद्धटपणे बोलणे...सर्व काही..सर्वच प्रसंग जसेच्या तसेच माझ्या डोळ्यासमोर  उभे राहिले...आणि विचार करता करता मी नामांकित हाॅस्पिटलच्या एका आय सी यू रूम मध्ये येऊन पोचलो.ते मला कळंच नाही. समोरील त्यास लावलेली ऑक्सिजनचा मास्क आणि त्याची ती बेडवर  पाहिलेली  अवस्था पाहून माझ्या तोंडून तुकाराम महाराज तो अभंग  आपोआप  बाहेर आला " जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो ईश्वर ".....

@लेखनकौशल्य-उदय माळगांवकर 

लेबल:

0 टिप्पण्या:

टिप्पणी पोस्ट करा

याची सदस्यत्व घ्या टिप्पणी पोस्ट करा [Atom]

<< मुख्यपृष्ठ