बुधवार, १९ जानेवारी, २०२२

......ह्यातून मला काय मिळेल????

   मित्र हो,आपणास माहीत आहे, कि आपण कोणतेही काम करायचंय म्हटले कि आपला पाहिला प्रश्न, ह्यातून मला काय मिळेल.?माझा फायदा काय?माझे नुकसान तर होणार नाही ना.....
असे आपण का म्हणतो?प्रत्येक गोष्टीत आपण आपला नेहेमीच स्वार्थ शोधत असतो.ही आपल्याला  सवय झाली काय?...कि आपला दृष्टिकोनच असा आहे..ह्याच्या पलीकडे ही वेगळीच दुनिया आहे.जेथे स्वार्थीपणा हा कुठेच दिसत नाही.उलट प्रत्येक जण कुठल्याच बाबतीत मागेपुढे पहात नाही.आणि सर्व जण नि:स्वार्थ भावार्थ मनात बाळगून काम करत असतात. तन मन धन ह्यांच्याशी त्यांनी फारकत घेऊन सर्व काही शक्य तितके ते दुसऱ्यावर ओवाळून टाकतात. दुसऱ्याना नेहमीच मदत करण्यास आघाडीवर असतात आणि त्यामधून जो आनंद त्यांना मिळतो तो अद्वितीय असा असतो.त्याची कोणाशीच तुलना करता येत नाही.

अश्याच एका आगळीवेगळी दुनियेत तुम्हांस जायचंय आहे का?जेथे दूर दूर कुठेही स्वार्थीपणा आपल्या नजरेसमोर येत नाही.कारणही तितकेच सत्य आहे.ते ठिकाण तुमच्या अगदीच जवळ आहे..आणि हो त्यासाठी तुम्हांस  घरदार वा परिवार सोडुन जावे लागणार नाही.तर थोडीफार  मेहनत घ्यावी लागेल एवढेच... थोडा  त्याग करावयास लागेल. आठवड्यातून  एकदा तरी थोडीफार  वेळ द्यायलाच हवा. तिथं जीवनाची गणिते वेगळीच असतात.पण बाकी मात्र शुन्य येते.आणि आपल्या जीवनाचे गणित सुटतंय व आपल्याला पैकीच्या पैकी मार्क्स मिळतात.आपण जीवनाच्या  परिक्षेत मात्र  पास होतो...मग आहात का तयार ....???

बाकी लेख वाचण्यास थोडा धीर धरा.....लवकरच भेटू..
###########################
मागील लिखाणावरून पुढे......

मित्र  हो जास्त उशीर तर  झाला नाही ना...तर आपण मुळ मुद्यावर बोलूयात....

संत शिरोमणी जगतगुरू श्री संत तुकाराम महाराज ह्यांनी  जगाला एक महत्त्वपूर्ण उपदेश आपल्या खालील अभंगातून दिला.

जे का रंजले गांजले । त्यासि म्हणे जो आपले ।। १।।
तोची साधू ओळखावा ।। देव तेथे चि जाणावा ।।धृ . ।।
मृदू सबाह नवनीत । तैसे सज्जनाचे चित्त ।। २।।
ज्यासि अंपगिता नाही । त्यासि घरी जो हृदयी ।। ३।।
दया करणे जे पुत्रासी । ते चि दासा आणि दासी ।। ४।।
तुका म्हणे सांगू किती । तो चि भगवंताची मूर्ती ।। ५।।

त्यांनी सांगितल्याप्रमाणेच या जगात मोह माया,तिरस्कार,अहंकार, वासना,मीपणा ह्या सर्व गोष्टींचा त्याग करून , गोरगरीब, आंधळी पांगळी आणि मुकीबहीरी जनता ,ह्याचावर  प्रेम करा.त्याच्यावर लोभ,दया, करूणा आणि परोपकार, परमार्थ याचा वर्षाव करा.आड अडचणींच्या काळात त्यांना जरूर ती मदत करा..भुकेलेल्या अन्न, भोजन द्या .बेरोजगारांच्या हाताला काम द्या. तहानलेल्या माणसास पाणी पाजा..बेघर वा गरजवंत लोकांबद्दल सहानुभूतीपूर्वक विचार करा.अशा अनेक विषयांवर त्यांनी मार्गदर्शन केले.


तुम्हांस  वर सांगितल्याप्रमाणेच, जर अशा कनवाळू   दुनियेत जायचे असेल तर  कोठेही जायची गरज  नाही. आपले तसेज डोळे उघडून जर एक त्रिवार नजर  टाकल्यास  आपल्याच ह्या गोष्टीचा साक्षात्कार होतो.आपल्या अवतीभोवती अशी दुनिया आहे.पण ह्या स्वार्थी आणि लोभी दुनियेत ती आपल्याच  दिसत नाही.जसे दिवसा आपणास चांदण्या दिसत नाहीत.त्यासाठीच आपल्याला रात्र व्हायची वाट पाहत राहावे लागते.त्याचे ते मनमोहक सौंदर्य पाहायचे असेल तर संध्याकाळी सुर्य मावळल्यानंतर संपूर्ण रात्रभर तुम्ही ते पाहू शकता.मग काय त्या भौगोलिक दुनियेत तुम्ही हरवून हरपून जाता.तुम्हांस कसल्याच गोष्टींचे भान राहत नाही..

तसेच ह्या दुनियेत आहेत.पण हे सर्व समजण्यासाठी आपणांस ज्ञानी व्यक्ती वा गुरू लागतो.तो आपल्या जवळपास सुदधा असतो. पण आपल्या दररोजच्या रामरगाड्यात आपण त्यांच्या कडे दुर्लक्ष करतो.हे माझे काम नाही.मला त्यांची गरज नाही.मी का म्हणून त्यांना मदत करू.? माझ्या वर असा प्रसंग आला होता तेव्हा मला कोणीच मदत केली नाही.मी स्वतःच सर्व  केले .प्रथम दर्शनीय ते तसं तुम्हांस वाटतंय पण ते तसं नसते.खोलवर विचार करून आकलन  केले कि एक एक पडदा उघडत जातो व आपणांस उलघडा होतो की माझ्या पाठीशी कोणीतरी उभा होता.

मग तो कोणत्यातरी स्वरूपात ( प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष) मला मदत करत होता.त्याची अनेक रूपे आपल्यासमोर असतात.पण तुम्ही ती  ओळखत नाहीत.उदाहरणार्थ..ते रूप तुमच्या आईवडील वा भाऊबहिण वा मित्रमंडळीत वा तुमच्या  धर्म पत्नीत तुम्हांस  दिसून  येईल. किंवा तुम्हांस एकाद्या धर्मादाय  संस्थेकडून  वा एकाद्या गोष्टींवर समाजसेवी संस्थेमार्फत मदत झाली असेल.एवढ्यावर ते कार्य थांबणार नाही.तर एखादेवेळेस कोणीतरी दानशूर,दयाळू  व्यक्ती वा अनोळखी इसम तुम्हांस मदत करून जातो. ज्याला मी ओळखत  नाही.दूरदूरवर  माझी त्याची  केव्हाच  भेटच झाली नाही. अशी व्यक्ती मला मदत करते.तेव्हा तुम्हांस काय वाटतंय. कधी तुम्ही याचा विचार केला आहे का????? .

.......हे कोण लोक आहेत. त्याचीं दुनिया कोणती .हे आपल्याच जवळपास होते.पण मी त्यांना ओळखत नव्हतो..तर मित्र हो ..हे दुसरे तिसरे कोणीच नसून ते तुमच्याच हदयात आहेत. तुमच्याच मनात त्यांचे घर आहे.देवाने मानवाची निर्मित करताना ,एक कनवाळू,परोपकारी,दयाळू,करुणामय,मायाळू,प्रेम,दानशूर  व्यक्ती आपल्याच  शरीरात निर्माण  करून  त्याची स्थापना  आपल्या शरीरात जन्मजात केली आहे.पण आपण  नेहेमीच सर्वजण  त्याकडेच  दुर्लक्ष  करतो.

परत एकदा हयाच विषयांवर बोलूया .मराठीतील नामांकित गायक होऊन गेलेले आपले सर्वाचेच आवडते  बाबूजी  कै.श्री.सुधीर फडके ह्यानी  गायलंय प्रसिद्ध गाणचं तुम्हांस सादर ( फक्त त्या  गाण्याचे बोल ) करतो. ते असे आहेत...

कुठे शोधिसी रामेश्वर अन्‌ कुठे शोधिसी काशी
हृदयातिल भगवंत राहिला हृदयातून उपाशी

झाड फुलांनी आले बहरुन, तू न पाहिले डोळे उघडुन
वर्षाकाळी पाउसधारा, तुला न दिसला त्यात इषारा
काय तुला उपयोग आंधळ्या दीप असून उशाशी

रुद्राक्षांच्या गळ्यात माळा, लाविलेस तू भस्म कपाळा
कधी न घेउन नांगर हाती, पिकविलेस मातीतुनि मोती
हाय अभाग्या भगवे नेसून घर संन्यासुन जाशी

देव बोलतो बाळमुखातुन, देव डोलतो उंच पिकांतुन
कधी होऊनी देव भिकारी, अन्नासाठी आर्त पुकारी
अवती भवती असुन दिसेना, शोधितोस आकाशी

हे सर्व  वाचल्यावर  आपण कुठे आहोत.???ह्या सर्व नाही ,पण चिमूटभर तर गोंष्टी आपण आपल्या दैनंदिन जीवनात आचरणात आणू शकतो.
म्हणूनच परत एकदा  म्हणतो त्याला तुम्ही त्या दिव्य पुरूषास ओळखा. जो तुमच्या सान्निध्यात अखंड व अविरत राज्य करतो.आणि तुम्हीच त्यास  त्या  नि:स्वार्थ दुनियेत  घेऊन जा. जेथे फक्त दया, प्रेम ,माया ,ममता, करूणा, लोभ,आशिर्वाद.....हयाचाच भरणा असतो.दुसरे काहीच नाही.सर्वत्र आनंदीआनंद असतो..म्हणूनच माझे सांगणे आहे.आपण दुसऱ्याच एका दुनियेत प्रवेश करून ह्या जीवनात आनंद निर्माण करा...मी शेवटी एकच सांगेन, स्वःता जगा आणि दुसऱ्यास ही जगवा.जग फारच फारच सुंदर आणि विलोभनीय आहे......


लेखनकौशल्य-उदय माळगांवकर 

लेबल:

0 टिप्पण्या:

टिप्पणी पोस्ट करा

याची सदस्यत्व घ्या टिप्पणी पोस्ट करा [Atom]

<< मुख्यपृष्ठ