दैवजात दुःखें भरतां दोष ना कुणाचा,पराधीन आहे पुत्र मानवाचा...
दिनांक-२२ जानेवारी २२
आजचा लेख-दैवजात दुःखें भरतां दोष ना कुणाचा
पराधीन आहे जगतीं पुत्र मानवाचा......
आज सकाळपासून माझे मन थोडेसे सैरभैर झाले होते. थोडेफार बैचेन झाले होते. कामात काहीच लक्ष लागत नव्हतं. जीव कावराबावरा होत होता....मला काही समजत नव्हेतं.मी विचार करू लागलो कि असं का बरं होत असेल.आज माझे मन माझ्या ताब्यात राहत नाही.मी क्षणभर थांबून थोडा दिर्घ श्वास घेऊन परत माझ्या मनातील भाव समजून घेण्याचा प्रयत्न करू लागलो..
मित्र हो ,तुम्ही खरंच तुमच्या मनाचे जीवाभावाचे सख्खे सोबती असाल तर ते मन केव्हाच दगाफटका करणार नाही.प्रथम ते थोडेफार रागवेल पण परत टाळयावर येईल. हा माझा स्व:अनुभव आहे. मनातील घालमेल आपणास ओळखता आली पाहिजे.मग सर्व काही ठीक होतं..
तर झाले असे कि मी सकाळच्या सर्व विधी आपटून कामावर जायला निघालोच होतो.इतक्यात माझा फोन गुरगुरायला लागला.म्हटलं एवढ्या सकाळीच सकाळी कोणाचा बरं फोन असेल? विचार करत करत फोन उचला आणि पलीकडून माझ्या डॉक्टर मित्राच्या मुलाचा आवाज ऐकून मी घाबरून गेलो.तो फारच जोरात व अडखळत बोलत होता. अधूनमधून जोरात जोरात रडत होता..मला काहीच समजत नव्हते. मी त्याची समजूत घालून म्हटलं अरे पहिले तुझे रडणं थांबव.आणि नंतर बोल. कारण तू काय बोलतो.ते मला समजत नाही.त्याला थोडा धीर आला.थोडं थांबून तो मला सांगायला लागला कि आताच अर्धा तासापूर्वीच माझे वडील स्वर्गवासी झाले. मी ताडकन जागेवरून उडलो. मी नि:शब्द झालो. असे कसे शक्य आहे.? मी काहीच बोलत नव्हतो. म्हणून की काय माझी बायको मला जोरात जोरात आवाज देऊन मला जागेवरून उठवत होती. मी फार कोसळून गेलो होतो..माझा फोन बंद करून मी बायकोला म्हणालो कि आपला "ल्याला डॉक्टर" आपल्याला सोडून गेला.आम्ही त्याला लाडाने "ल्याला" म्हणायचो...
बायकोनेच मला पाणी पाजून खाली बसवले.आणि विचारपूस करण्यास सुरुवात केली.असं कसे घडले.मी क्षणार्धात चाळीस बेचाळीस वर्षे भूतकाळात जाऊन पोचलो.लहानपणापासूनच आम्ही दोघंजण मुंबईलाच चाळीत ( चाळसुद्धा म्हटल तर अन्याय होईल कारण ते एक झोपडं होतं). घर कसलं ते तर दहा बाय दहाची एकच खोली,घराच्याच आतल्या बाजूस पडदा लावला कि किचन ( गावच्या बोलीभाषेत स्वयंपाक घर) .अश्या परिस्थितीत आम्ही सहा भावडं व दोन आमचे आईवडील. असे एकूण आठजण त्या ईवल्याशा खोलीत राहत होतो.तरी ह्यायी परिस्थितीत आम्हांस आमच्या आईवडीलांनी केव्हाच काही कमी पडू दिलं नाही.हे तितकेच खरं..धन्य ते माझे आई वडील. कारण आम्ही सहाही भावडं ,आपल्या बुद्धी कौशल्याच्या जोरावर शिक्षण पूर्ण करून कामास लागलो.व पोटाची खळगी कशी भरायची याची जाणीव आम्हांस भावडांना लहानपणापासूनच आईवडिलांनी दिली होती.त्यामुळेच आपला पुढील जीवनप्रवास खडतर असेल यात वादच नाही.अशी मनाची समजूत करूनच पुढे पुढे चालत होतो.
दहावी चांगल्या मार्कांनी पास झाल्यावर माझा नंबर मुंबईलाच आय टी आय मध्ये लागला. शिक्षण घेत असतानाच मला माझा हा " ल्याला" भेटला. आम्ही दोघंजण वेगवेगळ्या ठिकाणी राहत होतो.पण पहिल्याच भेटीत असे काही दोस्त बनलो कि आमची दोस्ती फार वर्षांपासून आहे.असेच जणू वाटत होते.
जीवनप्रवासात आमची वर्षे मुंबईच्या लोकल ट्रेन प्रमाणे भरभर चालत होती.आणि इकडे आमचे शिक्षण पूर्ण होत होते..त्यास स्वर्गीय वामनराव पै याचे प्रवचन ऐकण्याचे फारच वेड होते..आणि साहजिकच मी त्याचा लंगोटीयार म्हणजे मला सुद्धा त्याचं वेड लागलं....त्याची ती जीवनविदधा आमच्या रक्तात पूर्णपणे मिसळून गेली होती.
जीवनप्रवास त्यांची विश्व शातीं प्रार्थना आम्हांस तोंडपाठ झाली होती...त्याचे ते वचन आणि विचार असे कि " तुच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार " हे खोलवर आमच्या बालमनावर फारच कोरून गेलं होते..मग काय आमचे एकच ध्येय, यापुढे अभियंता जोपर्यंत होत नाही.तोपर्यंत थांबयचे नाही.तो माझयापेक्षा फारच हुशार होता.पण त्याला गर्व नव्हता..किंवा बडेजाव नव्हता. तो नेहमीच साधा आणि उच्च विचार असणारा .आधुनिक विचार सरणीचा युवक होता....
आता मित्र हो,मी वर उल्लेख केल्याप्रमाणेच तो डॉक्टर कसा असे तुम्हीच मला विचारू शकता.तर थोडं थांबा....मला पाणी पिऊ दया...सर्व सांगतो.धीर धरा.....तर आम्ही दोघांनी आमचे शिक्षण पूर्ण करून आम्ही दोघेही अभियंता झालो..पण त्यात थोडीफार बदल होता.मी यांत्रिकी अभियंता घालो आणि तो पुढील शिक्षण घेऊन यांत्रिकी आणि विद्युत अभियंता सुद्धा झाला होता...म्हणजेच माझ्यापेक्षा जास्त त्याचे शिक्षण होते...मी फक्त मशिनचा मेकॅनिक आणि तो मशिनचा डॉक्टर....तर मित्र हो ,आता तुम्हांस समजले असेल कि मी त्याला "ल्याला डॉक्टर " का म्हणतो ते..... तर असो , आपणास विषयांतर नको..माझ्या तोंडावर पून्हा पाण्याचा फवारा मारून माझ्या बायकोने मला जाग केले..मी शुद्धीवर आलो...
हे कसं आहे कि तो आता ह्या जगात नाही.कारण माझा ह्या गोष्टीवर विश्वास बसू शकत नाही.कारण कालच आम्ही दोघंजण फार वर्षांनंतर भेटली होतो.तो आपलं सर्व काही सांगत होता..काल भरपूर गप्पा मारल्या. जसे काही आता ह्यापुढे केव्हाच भेटणार नव्हतोच.फार जोर जोरात हसत ,खिदळत होतो.एक दोन नव्हे तर अगदी पार खालच्या मजल्यावरील वहिनीसाहेबांनी आमच्या सौ. ना सुद्धा दम भरला.आणि म्हणतात कश्या " काय ह्या म्हाताऱ्यांना वेड लागलं आहे.जनाची नाय तर कमीत कमी मनाची तर लाज बाळगा..हे वय आहे का ? हसण्याचं आणि खिदळणयाचं..पोरं काय म्हणतील..पण आमचं काही तुसभर ही बोलणं कमी झाले नाही. आमची गाडी सुसाट वेगात जात होती.आम्ही वेगळ्याच दुनियेत रममाण झालो होतो..रात्रीचे दहा केव्हाच वाजले ते समजलेच नाही..माझी सौ.माझ्यावर जणू कडाडली आणि दोघांनी तंबी देऊन जेवण्याची दोन ताटचं पुढ्यात आणून ठेवली.मग काय मुकाटपणे जेवण करून मार्गस्थ झालो..मित्र हो ,आपण बाहेर कितीही शेर असलो.तरी घरात आपल्या सौभाग्यवतीचे पालतू मांजरच असतो. खरं आहे कि नाही....तिथे आपले काहीच चालत नाही.तर असो...पुढे....तर आपण कुठे होतो...हा तर मित्र हो मला सांगा..कालची रात्र आणि आजची सकाळ ,साधारण आठ नऊ तास फक्त गेले असतील. आणि ह्या आठ नऊ तासात ऐवढ मोठ कांड होतं..ह्यावर माझा विश्वासच बसत नाही... म्हणूनच मी म्हणतोय "दैवजात दुःखें भरतां दोष ना कुणाचा
पराधीन आहे जगतीं पुत्र मानवाचा.दोष ना कुणाचा....
लेखनकौशल्य-उदय माळगांवकर
लेबल: दैवजात दुःखें भरतां दोष ना कुणाचा, पराधीन आहे पुत्र मानवाचा.

0 टिप्पण्या:
टिप्पणी पोस्ट करा
याची सदस्यत्व घ्या टिप्पणी पोस्ट करा [Atom]
<< मुख्यपृष्ठ