गुरुवार, २७ जानेवारी, २०२२

मला उमजले माझे मन ......

  आज माझंच अंतर्मन माझ्याशीच विद्रोह करीत होते. मनासारखे काहीच घडत नव्हते.काय बरं , त्याचं म्हणणं होते. ते सांगत होते कि मी सुखी नाही..मग मी प्रती उत्तरलो. मग सांग बरं .या जगात कोण सुखी आहे???....तर लगोलग माझे बहिर्मन उद्गगारले चला तर आपण त्यास शोधायला जावू...क्षणार्धात आमची स्वारी निघाली भटकंतीवर...

पहिल्याच भेटीत रिक्षाचालक, म्हणतो कसा...माझं नशीबच फुटकं..रस्तावर दिवसभर उभं राहून मनासारखे प्रवासी काही मिळत नाही...म्हणूनच म्हणतो,माझ्यासारखा दुःखी कोणीच नाही..

मग काय, स्वारी निघाली दुसरीकडे.....पाहतो तर काय, समोर हात गाडीवाला उभा,म्हणतो कसा..कितीही मेहनत केली तरी,पोट काही भरत नाही....म्हणूनच म्हणतो,माझ्यासारखा दुःखी कोणीच नाही..

मग काय तिथून घेतला काढता पाय आणि स्वारी निघाली तिसरीकडे....समोरच होता...पोलिस हवालदार उभा,म्हणतो कसा...माझे कामच आहे   बेकार,उभा असतो चौका चौकात, तरी नाही मनाला थारा व  शांती.... म्हणूनच म्हणतो,माझ्यासारखा दुःखी कोणीच नाही..

आता तर मन झालं सैरभैर आणि निघाले सुखाच्या शोधात...पाहतो तर काय, माझ्या समोर एक भिकारी उभा...हात पसरून म्हणतो कसा...अहो मायबाप, आतातरी गरीबा वर दया करा. दिवसभर भीक मागून, असते माझी झोळी रिकामी....म्हणूनच म्हणतो, माझ्यासारखा दुःखी कोणीच नाही..

आता तर माझा धीरच सुटला....ईकडे तिकडे पाहून  सरळ निघालो तडक घराकडे....आणि एकच निर्धार  केला....जगी सर्व सुखी असा आहे कोण आहे रे, नको विचारू, तू माझ्या मना..मी आहेच मुळात बरा....

@लेखनकौशल्य-उदय माळगांवकर 

लेबल:

0 टिप्पण्या:

टिप्पणी पोस्ट करा

याची सदस्यत्व घ्या टिप्पणी पोस्ट करा [Atom]

<< मुख्यपृष्ठ