शुक्रवार, २८ जानेवारी, २०२२

वेळ काळ बदलत असतो.....

वेळ काळ बदलत असतो.....

......का कुणास ठाऊक ,मी आज चक्क एका भिका-यासमोर  स्तंभित होऊन त्याच्याकडे एकटक पाहात होतो..तो माझी नजर चुकवत होता....मी अजून काही क्षण पाहत,माझ्या मागील जीवनामध्ये घडलेल्या घटनांवर जोर देत अजून त्याच्या जवळ आलो.क्षणभर दोघांची नजरानजर झाली व तो क्षणाचाही विलंब न लावता ,माझ्या चक्क पायावर लोटांगण घालत रडू लागला..

मी त्याचे नाव आठवण्यासाठी बुद्धीचा आटापिटा करीतच होतो.इतक्यात, लगेच त्यांनी मला माझ्याच टोपण नावाने हाक मारत मलाच मिठी मारली..मी फार हादरून गेलो. त्याचा मागील जीवनप्रवास आठवून मला कसंतरीच झाले होते.मी बैचेन होत, बुचकळ्यात पडलो कि हे असं कसं झाले..???

तो एकुलता एक ,श्रीमंत बापाचा हुशार मुलगा होता. गडगंज पैसा अडका,जमीन जुमला, नोकर चाकर याची काहीच कमतरता नसलेला,आज एक भिकारी म्हणून तो माझ्या समोर उभा होता...हे असं कसं झाले..???

मी क्षणभर भानावर आलो.व त्याची समजूत घालून एका हाॅटेलात घेऊन गेलो.व चहापानानंतर त्याला बोलते केले.तो अजूनपर्यंत ढसाढसा रडतच होता.मी त्यास धीर देत होतो.मी म्हणालो "झाले गेले  विसरून जा.तू धडधाकट ,हट्टा कट्टा आहेस.तेव्हा तू घाबरू नकोस.आपण काही तरी करू.ही पण वेळ जाईल.कारण वेळ सारखी बदलत राहते.ह्या दुनियेत स्थिर असे काहीच नाही.आणि परिवर्तन हा निसर्गाचा नियमच आहे..दिवस-रात्र हे सारखे चक्रासारखे धावत असतात .त्याला  तू सुद्धा अपवाद नाहीस.हे तूसुद्धा विसरू नकोस....मग तो थोडीफार  शांत झाल्यावर पटापट बोलू लागला...थोड्याच वेळात मला सर्व आशय समजून आला..

मी काही तरी बोलणार, इतक्या माझा सर्वात जवळचा मित्र आम्हांस त्याच हाॅटेलात भेटला..आम्हांस त्याला भेटून फारच आनंद झाला. कारण आता त्याची आम्हांस  गरज होती.तो सुद्धा फारच आनंदित झाला होता.कारण फार वर्षांनंतर आम्ही सर्वजण असे एकत्र भेटत होतो.पुढे गप्पाटप्पा सुरू करण्यात इतक्यात एक वेटर जवळ येत, त्यास म्हणतो कसा," मालक आपण आज लवकर कसे??ही आपली हाॅटेलात यायची वेळ नाही.तर तो म्हणतो  "अरे ,विजय मी आज ,कामानिमित्त बाहेर जात आहे.पण माझे काही लागत नव्हतं. म्हणून म्ह्टलं, जरा हाॅटेलात जावून येऊ...म्हणूनच मी इकडेच आलो..असं काय म्हणून, वेटर आम्हांस  चहापाणी देऊन निघून गेला...आम्ही दोघंजण टकमक ऐकमेकांकडे आश्चर्य ने पाहत होतो.कारण अजूनपर्यंत आम्ही काहीच ऑर्डर पण दिली नव्हती..पण हे सर्व त्या हाॅटेल मालकाचे संस्कार होते.अर्थात माझ्या  जिवलग मित्र चे....

पुढे काही सांगायची गरजच नव्हती कारण आमची परिस्थिती पाहून त्याला जे समजायचे होते.ते तर तो केव्हाच  समजून गेला होता..कारण तो एक यशस्वी हाॅटेल मालक होता..तर मित्र हो, पुढचे  कथानक  तुम्हांस  समजलेच  असेल.....मी काही बोलणार नाही....कारण आता आमची वेळ " जेवणाची झाली" .. म्हणूनच म्हणतात वेळ काळ बदलत असतो....ह्या  जगात काहीच स्थिर नाही...चंद्र, तारे,
पृथ्वी, आकाश,एवढेच काय तर माझे मन सुद्धा स्थिर नाही........मग कशाला घाबरता,येणाऱ्या संकटाना ध्येयार्न  तोंड द्या..एकच लक्षात ठेवा..आपल्या  किशोर कुमार तर ऐक गाणे म्हटलं आहे.त्याचे बोल असे " आनेवाला पल जानेवाला है, आनेवाला पल जानेवाला है ,हो सके तो इसमें जिंदगी बिता दो, पल जो ये जानेवाला है हो हो..........आनेवाला पल जानेवाला है, आनेवाला पल जानेवाला है....

@लेखनकौशल्य-उदय माळगांवकर

लेबल:

0 टिप्पण्या:

टिप्पणी पोस्ट करा

याची सदस्यत्व घ्या टिप्पणी पोस्ट करा [Atom]

<< मुख्यपृष्ठ