आजचा विचार- ज्ञान..मान..आणि दान ह्या तीन गोष्टीं सतत देत रहा...
आजचा विचार- ज्ञान..मान..आणि दान ह्या तीन गोष्टीं सतत देत रहा...
# जीवनात तीन गोष्टीं सतत देत राहील्या पाहिजेत.
१> ज्ञान
२> मान
३> दान
मग बघा..तुम्हीच म्हणाल, जीवन फार सुंदर आहे...
ज्याला जीवनाचा खरा दृष्टिकोन समजला आहे.तयास काहीच कमी नाही.तो आपले जीवन आनंदमय करत असतो.पण इतरांना ते लवकर अंगवळणीच पडत नाही..त्याच्या दृष्टिकोनात तो फारच सामान्य माणूस म्हणून दिसतो.पण एकदा का त्याचे विचार ,वाणी तसेच आचार समजायला लागले की तो इतरांसमोर आदर्श ठरतो. लोक तयाचे अनुकरण करायला लागतात..ते त्यास गुरू समान मानतात व जेव्हा केव्हा भेटतात तेव्हा त्याला दोन्ही हाताने नमस्कार करतात. हिच तर खरी त्याची ताकद आहे.
म्हणूनच असा सिद्धांत सांगितला जातो " प्रथम आपण ज्ञान मिळवा व समजल्यावर इतरांना द्या जेणेकरुन आपला मान वाढतो आणि एकदा का त्याचीच आपणास सवय झाली कि आपण आपलाच आदर सत्कार करायला सुरुवात करतो.मग आपोआप पुढील वाटचाल होत जातात व आपण दान करायला लागतो .
म्हणूनच म्हणतात नेहेमीच नविनगोष्ट गोष्टी शिकत राहिलो पाहिजेत. तयाचा आग्रह धरला पाहिजे. जेणेकरून ज्ञान कायमच आपणास मिळेल आणि आपोआपच पुढील घटना घडत जातात व आपण वेगळ्याच विश्वात रममाण होऊन जातो...
सरते शेवटी तीन गोष्टींवर लक्ष केंद्रित करा....ज्ञान...मान..आणि ...दान...केव्हाच तुम्ही दुःखी वा निराश होणार नाही...आपले जीवन सुखकर होईल ..
लेखन कौशल्य-उदय माळगांवकर
लेबल: आजचा विचार- ज्ञान..मान..आणि दान ह्या तीन गोष्टीं सतत देत रहा...

0 टिप्पण्या:
टिप्पणी पोस्ट करा
याची सदस्यत्व घ्या टिप्पणी पोस्ट करा [Atom]
<< मुख्यपृष्ठ