मंगळवार, १५ फेब्रुवारी, २०२२

जीवनाला खरा अर्थ कसा प्राप्त होतो??

मला मनापासून असं वाटतं की 
“तुमच्या जीवनाला तुम्ही ज्याप्रकारे घडवण्याचा प्रयत्न करता तो तुमच्या जीवनाचा अर्थ बनतो.”

आता मित्र हो,हे मी का व कशाचया आधारावर बोलत असेल तर गेल्या तीस पस्तीस वर्षांत जे मी काही शिकलो वा अनुभवले त्याच्या आधारावरच हे मी बोलत आहे. ह्या विचाराचे  स्वातंत्र्य सर्वानाच आहे. हे चिंतन सार्वजनिक आहे.पण त्यातून प्रत्येकांनी जो मार्ग अवलंबून त्याच्याबद्दल आत्मविश्वास बाळगला.त्याचे जीवन सार्थक झाले. असे मी म्हणेन वा त्यापुढे मी असे ही सांगणार आहे कि त्यांनी स्वतः बरोबर दुसऱ्याचे सुदधा कल्याण केले......

ह्या  विचारांवर काम करताना मला मात्र  एका गोष्टीचा साक्षात्कार झालाय तो म्हणजेच  जिथं आपण काम करतो ती कंपनी नव्हे तर ती एक संस्था आहे.ह्या संस्थेत आपण आपल्या बरोबर आपल्या समाजाचे ऋण फेडण्यासाठी कार्यरत झालो पाहिजेत.तरच  आपल्या संस्थेचा विकास व आपला उद्धार होईल....हे तितकेच सत्य आहे..

ज्या विचारांनी मी प्रेरित झालो व ज्या संस्काराने मी माझ्या जीवनात आनंद निर्माण करीत आलो.ते विचार वा चिंतन आपल्या समोर घेऊन आलो आहे.आपण ते एकवार अवश्य वाचावे आणि त्यामधून मिळेल त्या अनुभूतीत जीवनात पुढील वाटचाल करावीत..असे मला वाटते...


ह्या विचारांवर कोणाचीच मक्तेदारी नाही... हे विचार  सर्वानाच  खुले आहेत. हे विचार कोणी लिहिले ?  व का लिहिले ? आणि कशासाठी  लिहिले?????? हे मला माहीत नाही.पण एवढं बाकी म्हणेन कि ......

आम्ही बि-घडलो तुम्ही ही बिघडांना ||ध्रु||
सद्गुरुच्या संगे शिष्य बिघडला
शिष्य बिघडला सद्गुरुची झाला ||१||
परिसाच्या संगे लोह बिघडले
लोह बिघडले सुवर्णची झाले ||२||

लेखन कौशल्य-उदय माळगांवकर.

लेबल:

1 टिप्पण्या:

१५ फेब्रुवारी, २०२२ रोजी ७:१३ AM वाजता वाजता, Blogger Unknown म्हणातात...

खूपच छान

 

टिप्पणी पोस्ट करा

याची सदस्यत्व घ्या टिप्पणी पोस्ट करा [Atom]

<< मुख्यपृष्ठ