शनिवार, १२ फेब्रुवारी, २०२२

माणसे ओळखायला शिका.....

माणसं ओळखायला नाही.....

माणसं ओळखायला नाही, तर तयाचा वर्तमान चेहरा वाचायला शिका असे मी म्हणेन कारण ..
मी माणसं ओळखायला शिकलो’ असं वाक्य अनेकजण वापरतात. परंतु माणसं ओळखायला नाही तर माणसं समजून घ्यायला शिकायला हवं. माणसांचा स्वभाव ओठात एक आणि पोटात एक असा असतो. तसंच काही माणसे ही फार हळवी असतात. त्यांच्या मनात एक असंत आणि वागण्यात मात्र वेगळंच. मनातून दुःखी असलेली व्यक्ती आपलं दुःख कोणाला कळू नेय म्हणून ते मनातच दाबून ठेवण्याचा प्रयत्न करतात.

आता माणसे वाचणे म्हणजेच काय तर परिस्थिती सारखी बदलत असते.थोड्याच वेळापूर्वीच तुमचा सहकारी तुमच्या समोरून काहीच न बोलता निघून गेला व पुढच्याच पाच मिनिटांत तुमच्याशी भांडण करून हुज्जत घालू लागला.आता तूम्ही त्यास काय म्हणाल.?  तुम्ही जर त्याला त्यावेळेस  प्रतिउत्तर देण्याचा प्रयत्न केला तर शब्दाला शब्द वाढत जावून ते भांडण विकोपास जाते.हा माझा आजपर्यंतचा अनुभव आहे.

काही व्यक्ती साध्या साध्या गोष्टींवरसुद्धा चिडतात, रागावतात. अशा व्यक्तींच्या वागण्यावर जाऊ नका, तर त्या व्यक्तीला समजून घ्या. कारण ती व्यक्ती मनातून फार एकटी आणि अस्वस्थ असू शकते. त्या व्यक्तीला कशाचा  तरी आधार  हवा असतो, पण तोच  तिला कोणाकडूनही मिळालेलं नसतं. त्या व्यक्तीच्या अशा वागण्यामुळे तिला चुकीचं जज करू नका, तर त्यामागची अवस्था समजून घ्या.

तुम्ही त्यास कितीही समजवण्याचा  प्रयत्न केला तर तो ऐकण्याच्या मनस्थितीत नसतो.तो तुम्हांस त्याचा विरोधक असल्याचा आभास निर्माण करून मनात  क्रोध बाळगून वागत असतो. तुम्ही जर काळजीपूर्वक निरखून त्याच्या चेहर्‍यावर पाहिले तर एक वेगळीच प्रतिमा तुम्हांस दिसत असते.त्याला कशाची तरी चिंता वा भिती वाटत असते.काहीतरी झालेय .असे तुम्हांस वाटेल.माणूस जसा दिसतो तसा तो नसतो, प्रत्येक जण मनाचं खरं प्रतिबिंब चेहऱ्यावर उमटू न देता खोटा मुखवटा धारण तुम्ही या क्षणी वावरत असतो. म्हणून माणसं ओळखण्या पेक्षा त्यांचा वर्तमान चेहर्‍यावर हावभाव  समजून घेण आवश्यक असतं.

तो व्यक्ती आतून फारच घाबरलेला असतो.अजून तुम्ही त्याच्या जवळ गेला तर त्याचे शरीर थरथरत  असते.पण तो तुम्हांस  दाखवत नाही.उलट जोर जोरात बोलत असतो.तुम्हीपण त्यास प्रतिसाद दिला तर सर्वच संपले.त्यातून काहीच निष्पन्न होणार नाही.उलट तुम्ही शांत राहुन त्याचे म्हणण ऐकले तर उलट दोघांनाही फायदाच होईल. कारण  पाच दहा मिनिटांत त्याचा राग ओसरून जाईल. पण त्यासाठीच तुम्हालाच थोडे दूर जावे लागेल. तुम्ही शांत राहिल्यात म्हणून शूद्र वा लहान होत नाही वा तुम्ही कमजोर आहात असा अर्थ निघत नाही.उलट तुम्ही त्याचा मान सन्मान ठेवून त्या दुषित वातावरणातून बाहेर निघून जाण्याचा प्रयत्न करत असतात. त्यामुळेच तुम्ही श्रेष्ठ ठरतात. 

असे  आकस्मित संकट आले तर घाबरून जाऊ नका उलट त्यातून चांगले कसे  निर्माण होईल ते बघा.त्यास राग आला म्हणून तुम्हांस काहीच नुकसान होणार नाही कारण त्याचा राग हा क्षणभंगुर होता.तो शांत झाल्यावर त्याला त्याची चूक समजून येणार आणि त्यालाच त्याची लाज वाटेल. कारण तुम्ही त्याला काहीच न बोलता समजून घेतलेले असता.हा सर्वस्वी तुमचा निर्णय होता.आजूबाजूस घडणाऱ्या कोणत्याही गोष्टीचा तुमच्यावर परिणाम तुम्ही होऊ दिला नव्हता.हा तुमच्या मनाचा मोठेपणा होता.तुम्ही  त्यास माफ केले.

ह्या ठिकाणी मी ऐवढंच  म्हणेन कि कोणावर कशी वेळ येईल. हे कोणालाही माहीत नाही.परिस्थिती सारखीच  बदलत असते.तेव्हा अहंकार करू नका. आपण कोणासाठी कधीपर्यत असणार  हे ब्रम्हदेवाला सुद्धा  माहित नाही.तेव्हा आपण माणसं नाती जोडा.आपण जो पर्यंत आहोत तोपर्यंत आपल्या माणसांसाठी असणार, अशाप्रकारे जगण्यात कमी पडू नका.दुसऱ्याचा तिरस्कार वा अनादर करू नका.जे पेरलं तेच उगवणार..

तेव्हा चांगल्या माणसांचा कदर  करा त्याचा आदर करा..जे चांगल तेच तुम्ही ओळखून त्यानुसार वागणे हेच सारे खरे आहे. फायदा आणि नुकसान ह्या दोन्ही गोष्टी फारच लांबच्या आहेत.कारण एकाच  वेळेस ह्याचा प्रत्यय तुम्हांस मिळणार नाही. एका वेळेस एकच ध्येय साध्य होणार. एकतर फायदा नाहीतर नुकसान..आता फायदा कोणाचा आणि नुकसान कोणाचे ??? हा तर यक्षप्रश्न आहे. कारण भांडण चालू होण्या आधी ते दोघंजण गुण्यागोविंदाने वागत होते.आणि एका शुल्लक गोष्टींमुळेच हे भांडण उरकून आले. तो काही वाईट नाही वा तुम्ही त्याचे कायमचे शत्रू  नाही. फक्त एक गैरसमज वा एक असुरी  ईच्छा शक्ती जी त्यास शांत बसू देत नाही.ऐवढंच म्हणूनच म्हणतो कि माणसं ओळखायला नाही, तर तयाचा वर्तमान चेहरा वाचायला शिका...

लेख कसा वाटला ते जरूर कळवा.

लेखन कौशल्य-उदय माळगांवकर

लेबल:

0 टिप्पण्या:

टिप्पणी पोस्ट करा

याची सदस्यत्व घ्या टिप्पणी पोस्ट करा [Atom]

<< मुख्यपृष्ठ