मोठी झेप...स्वप्नांचा पाठलाग करा
दिनांक - १ फेब्रुवारी २०२२
आज मी सकाळीच सकाळी चिंचवड स्टेशन वर येऊन पोचलो.कारण सुद्धा त्याला तितकेच महत्त्वपूर्ण होते.सालाबाद प्रमाणे ह्यावर्षी सुध्दा आमच्या घरी माघी गणपती उत्सव ,माझ्या नव्हे आमच्या सौ.सावित्री बाईसाहेबांनी त्याचे नियोजन केले आहे.मी असे का म्हणत आहे.ह्याचा प्रत्येय तुम्हांस पुढील लिखाणावरून समजलेच...
तर मित्र हो,रेल्वेचे टिकट ( अॅडव्हान्स बुकिंग-रिझर्व्हेशन) करून मी कल्याणला जाण्यास मी चिंचवड स्थानकावर येऊन पोचलो. कामानिमित्त मी पुण्यात राहतो आणि माझा पूर्ण घर परिवार कल्याण येथे राहतो. त्यामुळेच घराची सर्व जबाबदारी अर्थात आमच्या सौ.वर येऊन पोचते.मग सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत.मी त्या कामाची यादी करत बसलो तर फारच मला लिहून ठेवावे लागेल.म्हणूनच मी त्या फंदात पडत नाही आणि मी त्याच्यावर भाष्य करू शकत नाही.कारण आपण सर्वजण जाणकार आहात.आणि एक " घरंदाज स्त्री "च काय करू शकते.हे मी इथं बसून सांगणार नाही. संसाराचा गाडा कसा ओढायचा ह्याची पीएचडी कोणी केली असेल तर घरच्या बायकोस विचारा.मग तुम्हांस समजेल कि हे भव्यदिव्य धनुष्यबाण ती कसे पेलते ते..आणि आपल्यासाठी ती जिवाचा आटापिटा करते ते.. त्यामुळेच तिला कमी लेखू नका..तिचा आदर करा...मान सन्मान करण्यात जराही मागे पुढे पाहू नका....घराचा स्वर्ग करायचंय तर घरच्या लक्ष्मीचा मान राखा.....
तर असो ,आपण पुढे जाऊ या. तर मी काय म्हणत होतो...प्रत्येक गोष्टीत तिचा शंभर टक्के सहभाग असतो.आणि माझा वाटा फक्त एक टक्का. कारण मी प्रत्यक्षात तेथे उपलब्ध नसतो. पण फायनल टच हे माझ्या एक टक्क्यांवरच अवलंबून असते. कारण कोणी तरी म्हणाले कि सबका साथ सबका विकास..अणि हो, आम्ही सर्वजण कोणतेही काम एकशे एक टक्का कसे होईल. यावर भर देतो...कारण आम्हांस सर्व साधारण, चांगले,फारच चांगलेच,उत्तम वगैरे .... असे केलेले तिला मान्य नाही.तर आमच्या सौ.सावित्री बाईसाहेबांनी तसेच शिकवले आहे की कोणतेही काम करताना ते "सर्वोत्कृष्ट" कसे होईल. ह्या कडेच लक्ष दिले पाहिजेत आणि तसाच त्याचा आग्रह आणि -होरा सुद्धा असतो.आणि सर्वजण तो तंतोतंत पालन करण्याचा प्रयत्न करत असतात.आणि त्यात आम्हांस आनंद वाटतो.कारण त्या शिक्षिका आहेत.
आणि त्या नेहेमीच म्हणतात # Always go for Excellence..कारण त्याचे असे सांगणे आहे की लोक नेहमीच सर्वोत्कृष्ट गोष्टींवर लक्ष केंद्रित करतात किंवा त्यालाच फार मागणी असते...जसे धातूंच्या अनेक चकाकणा-या गोष्टी आहेत पण सर्वात जास्त मागणी सोन्याला असते.कारण गुणवत्तेवर चर्चा होते.तेव्हा सोन्याचा कस मोजला जातो....आणि त्यामुळेच ते जो काही निर्णय घेतात त्यास आमचे सर्वजणांचे अनुमोदन असते.फार नाही तर थोडेफार ...केव्हा केव्हा चालू परिस्थितीत निर्णय घेताना त्यात बदल सुद्धा होत असतात.पण फारच दुर्मीळच..पण निर्णय घेताना सर्वजण त्या चर्चेत सहभाग घेतात.सर्वाचेच मत विचारात घेऊनच पुढील वाटचाल होत असते. अर्थात आमची टीम लीडर असते.आमची होम मिनिस्टर म्हणजेच आमची सौ.सावित्री बाईसाहेब .थोडक्यात काय ," नियोजन कर्ती " " Event Manager " असे मी का म्हणालो ते आता समजून आलेच असेल..In short all solutions under one roof ..or SPOC ( Single Point Of Contact.)
तर मित्र हो,परत आपण मूळ मुद्यावर बोलूयात .तर आज मी पुण्यातून कल्याणला जाण्यास चिंचवड स्टेशन वर आलो..माझी चौकस बुद्धी आणि चौफेर वायुवेगाने फिरणारी नजर, मला काही स्वस्थ बसू देत नव्हती..माझी नजर समोरील फलाट क्रमांक तीन वर एका रेल्वे पुरस्कृत रेल्वेच्या डब्यावर पडली. आणि मित्र हो,मी तुम्हांस काय सांगू...तिथे साकारलेले चित्र पाहून व त्यावरील लिहून ठेवलेला महत्त्वपूर्ण संदेश पाहून मी क्षणभर विसरूनच गेलो कि मी रेल्वे स्टेशन वर उभा आहे ते...तो संदेश असा होता ...
" I would say if you have a dream,it doesn't really matter whether you are woman or from India or from wherever. Message Quoted by Kalpna Chawla. "तुम्ही एखादे स्वप्न पाहत असाल तर मी म्हणेन. त्याचे अनुसरण करा. तुम्ही स्त्री आहात किंवा भारतातील आहात किंवा कोठूनही आहात याने काही फरक पडत नाही. कल्पना चावला यांनी उद्धृत केलेला संदेश.
कल्पना चावला : प्रत्येक भारतीयाच्या मनातील अंतराळ परी"
पुढे काहीच सांगायची गरज नव्हती..मला तो सर्व प्रसंग डोळ्यासमोर उभा ठाकला...तो काळाकुट्ट दिवस आठवला.तो होता १ फेब्रुवारी २००३ ...ज्या दिवशी म्हणजेच १ फेब्रुवारी २००३ ला कोलंबिया अंतराळ यानाने पृथ्वीकडं येण्यासाठी अमेरिकेजवळच्या पॅसिफिक समुद्राकडं झेप घेतली. अंतराळवीरांनी स्पेस सुट घातला. त्यावेळी सर्व योग्यरीत्या सुरू होतं.
त्यावेळी स्थानिक वेळेनुसार सकाळच्या 8.40 वाजता कोलंबिया यानानं पृथ्वीच्या वातावरणात प्रवेश केला. अंतराळवीर आणि नासातल्या अंतराळयान नियंत्रण कक्षातले सगळेजण आनंदी होते.22 मिनिटांत ते यान पृथ्वीवर उतरणार होतं. सुमारे 8.54 वाजता यानाचा आणि नियंत्रण कक्षाचा संपर्क तुटायला सुरुवात झाली. 9.16 वाजता काही गोष्टी स्पष्ट व्हायला लागल्या आणि कोलंबिया यान इतिहासात जमा झालं.
तेव्हा कोलंबिया स्पेस शटलचा अपघात झाला आणि त्यातच सगळ्या अंतराळवीरांचं निधन झालं.
आपण एका भारतीय अंतराळ परी # कल्पना चावला" ह्यास कायमचे पोरके झालो होतो...तो दिवस आणि आजचा दिवस ह्यास विशेष महत्त्व आहे. ते आपणास विसरून चालणार नाही.कारण आज १ फेब्रुवारी २०२२ आहे..म्हणजेच आज तिचा स्मृतिदिन आहे. तिने सांगितलं तसे " तुम्ही एखादे स्वप्न पाहत असाल तर मी म्हणेन. त्याचे अनुसरण करा. तुम्ही स्त्री आहात किंवा भारतातील आहात किंवा कोठूनही आहात याने काही फरक पडत नाही.# कल्पना चावला.तिने आपली सर्व स्वप्न पूर्ण केली होती..ती अजरामर झाली होती.तिच्यावर मी काही जास्त बोलणार.....पण एवढ्यात माझी गाडी आली व मी गाडीत जाऊन बसलो.मला सीट मिळाली कारण माझे रिझर्व्हेशन होते व मी गाडीतच लिखाण करण्यास सुरुवात केली..
मी लिहितच होतो.कारण तिने सांगितल्याप्रमाणेच आम्ही दोघंजणांनी सुदधा ( नवरा बायको) एक स्वप्न पाहिलं होते.आणि ते म्हणजेच आमचे लग्न झाल्यावर ,माझी सौभाग्यवती माहेर सोडून सासरी आली होती. ती आता सासुरवाशीण झाली होती..पण तिचे पुढील शिक्षण थांबले होते.ती " हंगामी शिक्षक "म्हणून नोकरी करत होती.लग्न करताना तिने मला एक अट घातली होती आणि ती म्हणजेच मला बीएड करण्यास आपण मला मदत कराल..मी पण लगेच हो सुद्धा म्हटलं..पण मला कुठे माहित होते कि पुढे काय वाढून ठेवलय ते..झाल दिवसामागून दिवस जात होते..आणि थोड्याच दिवसात एक गोड बातमी आम्हांस समजली. ती आता आई होणार होती.मग काय सगळीकडेच आनंदीआनंद ..त्या काळात आम्ही दोघंजण हे विसरून गेलो..आणि वर्तमान स्थितीवर अवलोकन करून एक निर्णय घेतला कि आता मुलांची संगोपन करण्यासाठी तिने शाळेतली नोकरी सोडून घरीच राहावे..कारण मी फिरतीची नोकरी करत होतो..तिने हा निर्णय मान्य केला पण एका अटीवर कि वेळ मिळेल तेव्हा तूम्ही माझं स्वप्न पूर्ण करायचे.मला तिला बीएड करायचंय....पण
दिवसामागून दिवस चालेले होते..ह्यातच आमची चौदा वर्षे निघून गेली..फार पावसाळे झाले होते ..पण मी ती गोष्ट विसरलो नव्हतो.....
# स्वप्नांचा पाठलाग." .मी परत भूतकाळात जाऊन पोचलो..पण डब्यात झालेला गोंगाट ऐकून माझी तंद्री भंग पावली.मी लिखाण थोडे थांबवले.कारण कर्जत स्टेशन वर गाडी येऊन पोचली होती...अरे हो, मी सांगायलाच विसरलो कि मी गाडीत बसून कल्याणला निघालो आहे ते. आणि हे लिखाण मी चालू गाडीतच लिहत आहे..मला कल्याण यायच्या अगोदरच हे पूर्ण केले पाहिजेत..तर थोडा धीर धरा...एक घोट पाणी पिऊन व डब्यात आलेला नाष्टा व चहापानानंतर परत लिखाण करण्यास सुरुवात केली...
चौदा वर्षांत आम्हांस दोन कन्यारत्नांनी आमचे घर आता उजळून निघाले होते.आमचे कुटुंब चौकोनी झाला होते.आमच्या घरात लक्ष्मी व सरस्वती पाणी ह्याचा आम्हांस वरदहस्त लाभला होता.असे मी म्हटल तर वावगं ठरणार नाही.कारण मी अभियंता म्हणून भरपूर पैसा कमवत होतो आणिक माझी धर्मपत्नी शिक्षक या नात्याने आमच्या मुलांवर चांगले संस्कार घडवत होती. जरी तिने नोकरी सोडून घरी बसली होती.तरी तिचे घरच्याघरी होम क्लासेस चालूच होते व त्यास उत्तम प्रतिसाद सुद्धा मिळत होता..दिवसभरात जवळपास तीस चाळीस मुले मुली आमच्या घरात येत जात होती.त्यावरूनच तुम्हांस समजलेच असेल कि हाडाचा शिक्षक कोणास म्हटले जाते ते...असे मी का म्हणतो तर तिचे विद्यार्थी ,विद्यार्थिनी आज उत्कृष्ट शिक्षण घेऊन डॉक्टर ,इंजिनिअर, ऐवन ऑफिसर झाले आहेत. कोणी अमेरिकेत वा जपान, जर्मनीत काम करतात आहेत.........तर आमचे सर्व आलबेल सुरळीत चालू होते...सुखासमाधानात जराही कसलीच कमतरता नव्हती.
तर झालं असे कि माझ्या सासुरवाडीत सालाबाद प्रमाणे भाद्रपदातील गणपती आला होता व आम्ही दोघंजण त्याच्या घरी जाण्यास निघालोच....सवयीनुसार मी एक मराठी वर्तमान पत्र विकत घेऊन वाचायला सुरुवात केली...वाचता वाचता माझी नजर एका बातमीवर गेली...त्यात असे लिहले होते कि होतकरू विद्यार्थी आणि विद्यार्थीना आपले बीएड चे पुढील शिक्षण पूर्ण करता येईल.मग काय माझ मन चक्क त्या गोष्टीवर पुढे सरकायला धजावत नव्हतं...मी लगेच बायकोस न बोलता .त्यात लिहिलेल्या फोनवर फोन गेला.तेव्हा मला समजले कि शेवटच्या तीन जागा खाली आहेत..मी आपलं संभाषण थांबवून सासुरवाडीत येऊन पीहचलो. रितीरिवाजानुसार गणपतीचे दर्शन घेऊन बायकोस म्हणालो ,चला आपणास एका ठिकाणी जायचं आहे.ती पण काही आढेवेढे न घेता निघाली.कोणालाच काहीच बोललो नाही.कारण मला सुद्धा काहीच माहित नव्हते की पुढे काय होणार ???
रिक्षात बसून सरळ शिक्षण संस्थेत येऊन पोचलो. संबधित क्लार्क ला भेटून सर्व फॉर्म भरून पुढील सर्व सोयिस्कर गोष्टी पार करून ,पैसे भरायची वेळ आली..तर त्यावेळेस माझ्याकडे पैसेच नव्हते..आता काय करायचं??? आता परत क्लार्कला भेटून अडचण सांगितली. तर तो म्हणाला कि आज शेवटचा दिवस आहे. तेव्हा तुम्ही काहीही करा व दुपारी तीन वाजेपर्यंत पैसे भरा.नाहीतर दुस-यास सीट दिली जाईल...मग काय आली का पंचाईत..
थोडावेळ थांबून दोन मिनिटांचा पाॅज घेऊन विचार करू लागलो. कारण मित्र हो ,ही संधी मला सोडायची नव्हती..कारण ती चौदा वर्षांनी मला गणपती बाप्पाने दिली होती. मी बायकोस शब्द दिला होता..अरे हो ,एवढ्यात मला आठवले कि आपण गणरायाला साकडे घालूया.आज गणेशचतुर्थीच आहे.चांगला योग आहे..तो आपल्याला जरूर मार्ग दाखवेल आणि झालंच तसे....मी मनात मनात गणपती बाप्पाला साकड घालतो ना घालतोच तोवर माझ्या मोबाईलवर एक मेसेज आला.मी लगेच बघितलं तर आमच्या कंपनीकडून माझा आऊट डोअर्स चा मोबदला जमा झाला होता. जो कि बाकी होता....ती रक्कम निश्चित मला लागणा-या फी पेक्षा जास्त होती...मग देवाचे आभार मानून सर्व पैसे जमा केले.एकूण तीस हजार भरले.आमचे अॅडमिशन पूर्ण झाले होते...म्हणूनच म्हणतात " भाव तेथे देव "
अर्थात चौदा वर्षानी आमचे स्वप्न पूर्ण झाले होते....म्हणूनच म्हणतात स्वप्नाचा पाठलाग करा.स्वप्न पूर्ण होण्यास थोडीफार वेळ लागेल पण प्रयत्न सोडू नका..एक ना एक दिवस..देव तुमची ईच्छा पुर्ण करणार....
आज आमच्या सौ.सावित्री बाईसाहेब " एम ए बी एड आहेत.आणि त्याचा आम्हांस सार्थ अभिमान आहे...
मित्र हो,मी आपला निरोप घेतो.माझा प्रवास इथेच संपणार आहे.कारण कल्याण स्टेशन आले आहे .घड्याळात बघितल तर नऊ वाजून दोन मिनिटे झाली होती....रेल्वेतील अनाउन्समेंट चालू होती... पण तुम्ही काही थांबू नका ,स्वप्नांचा पाठलाग करा....देव सर्वत्र आहे..तो तुमच्या पाठिशी आहे.तो सर्व तुमच्याच ईच्छा पुर्ण करेल. खात्री बाळगा....गणपती बाप्पा मोरया...
विशेष नोंद-मित्र हो,आजचा लेख वाचून आपणांस कसा वाटला.ते जरूर कळवा.आपले मत विचारात घेतले जाईल....वाचक वर्ग हा लेखकास आरशातल्या प्रतिबिंबासारखा असतो.तेव्हा आपला अभिप्राय जरूर कळवा.....
@लेखनकौशल्य-उदय माळगांवकर

0 टिप्पण्या:
टिप्पणी पोस्ट करा
याची सदस्यत्व घ्या टिप्पणी पोस्ट करा [Atom]
<< मुख्यपृष्ठ