रविवार, २० मार्च, २०२२

शून्याची किंमत..

शून्याची किंमत..

मित्र हो, कोणत्याही कार्याची सुरुवात ही प्रथमतः शून्यातून होत असते.आता हेच बघा ना..
आपला डोक्यात एक विचार येतो.तेव्हा त्याला काहीच अर्थ वा आकार नसतो.तो विचार एक शून्यातून निर्माण होत असतो.व जस जसे आपण त्याच्यावर विचार करायला सुरुवात करतो तस तसे एक एक नविन अंकाची निर्मिती होत असते.जसे एक, दोन,तीन,चार,पाच,सहा,सात,आठ,नऊ,दहा..पण कोणतेही कार्य पूर्णत्वास नेण्यास शून्य पुरेशा असतो.तर कसे ...प्रथम शून्याची महतीच समजून घेऊ यात...

अंकाची तोंड ओळख आपणांस शालेय जीवनापासूनच होत असते.आपल्या लहानपणापासूनच कुणीतरी मोठी व्यक्ती आपणांस लाकडी दगडी पाटीवर हातात खडू वा चाॅक ,पेन्सिल धरून शिकवत असतो.मग ही मोठी व्यक्ती कोणी का असेनात..जसे माझी आई,वडील,मोठा भाऊ,वा माझी मोठी बहिण,माझी मावशी,माझे मोठे काका, माझी आत्याबाई आणि ......यादी मोठी आहे...व्यक्ती तितका प्रकृती....आणि आपण एक एक अंक शिकत असतो..सर्वात मोठा आणि मूल्यवान कोण तर हा शून्य. असे का बरं..तर बारकाईने अभ्यास केला तर असे दिसून येते कि कोणत्याही अंकाची सुरुवात ही एक बिंदू पासून होऊन ती परत त्याच बिंदूवर थांबते..तर असा कोण बरं आहे? परत एकदा विचार करा.दोन मिनिटे थांबवून सुरुवात करू या...

एक ते नऊ अंक बघा.त्याची सुरुवात एका बिंदू पासून होऊन शेवट दुसऱ्याच ठिकाणी होत असतो.म्हणूनच म्हणतोय दोन्ही बिंदू एकाच ठिकाणी एकत्र येऊन मिळत नाही.बघा बघा....
प्रयत्न करा.विचार करा.एकदा सोडून दहावेळा विचार करा.मनन करा.चिंतन करा..तुम्हांस कोडे सुटतंय का ??? उत्तर नाही सांगता येत तर वर दिलेल्या माहितीनुसार असा एकच अंक आहे आणि तो म्हणजेच शून्य होय.ज्याची सुरुवात ही एका बिंदू पासून होऊन ती त्याच बिंदूवर येऊन पोचते.आहे कि नाही मज्जा . 

म्हणूनच तो फारच किंमतीचा अंक आहे.मूल्यवान आहे.मौल्यवान आहे.तो ज्या अंकाच्या मागे उभा राहतो त्याची किंमत वाढते.तो जरी पुढे उभा राहिला तरी त्याची दखल घेण्यात येते कारण त्यावेळेस दोन घरात ते पोहचलेले असतात. In Short two digits असे म्हटलं जाते.मग काय दोन अंकी पासून जी सुरुवात होते ती वाढत जाते.त्यासाठीच आपण नेहेमीच म्हणतोय कि शून्यातून विश्व निर्माण होत असते..तिची ताकद किती आहे हे सांगण्याची गरज नाही.तूम्ही ते सर्व जाणतात..

शून्य म्हणजेच जी गोल आहे , परिपक्व आहे, पूर्णत्वास प्राप्त करून अगाध तिची लीला  आहे.जीची महती सांगण्यास शब्द अपुरे पडतात अशी ही अप्रतिम सुंदर आणिक विश्वाचा पायाभरणी करते ती शून्य...

शून्याचा अर्थ तुम्हांस आता समजून चुकला असेल तर आपणसुद्धा तयास नमस्कार केला पाहिजे..जर तुम्हांस कोणी म्हणत असेल कि तू शून्य आहेस किंवा तुझी किंमत शून्य तर समजून जायचे कि मी लाखात एक आहे.माझ्याशिवाय त्यांना किंमत नाही.कारण मी कुठेही उभा राहिलो तर समोरच्याची किंमत वाढणार आहे.यात काहीच दुमत नाही. म्हणूनच स्वःताला ओळखा....स्वतःवर प्रेम करा...तुमच्या सारखा दुसरा कोणीच नाही. In Short only one Piece...देवानेच तुम्हांस एक विलक्षण व दुर्मीळच माणूस बनवून ह्या पृथ्वीवर पाठवले आहे.तेव्हा देवाचे आभार मानून ह्या मानव योनीत जन्म घेतलाय तेव्हा त्याचा क्षणभर विसर पडू देऊ नका.मनुष्य देह हा दुर्लभ आहे....ह्याचा विचार करा व तसे आचरणात आणा....

लेखन कौशल्य-उदय माळगांवकर..

लेबल:

स्वतःला कसे ओळखावे?

स्वतःला कसे ओळखावे?

मित्र हो, 
आज आपण एका महत्त्वपूर्ण विषयांवर बोलूयात. 
विषय थोडा किचकट आहे पण कठीण नाही.तुम्ही शांतपणे तो प्रश्न व्यवस्थित व काळजीपूर्वक वाचला तर अर्ध अधिक उत्तर सहजच मिळेल. पण त्यासाठी योग्य नियोजन, कष्ट करण्याची तयारी व मार्गदर्शन असेल तर आपणांस हा विषय समजायला सोप्प जाईल. आपण जर हे भाग्य मला दिले तर मी तुमचा  Mentor व्हायला तयार आहे.

जास्त काही करायचंय नाही.शिकायला वयाची अट नाही. फक्त जिद्द, संयम आणि गुरूजणांवर ठेवलेली निष्ठा आणि शिकण्याची तळमळ असेल तर आपण हे दिव्य धनुष्य पेलू शकतो.

मित्र  हो क गोष्ट  लक्षात ठेवा.
आपण आज   जरी   पालक झालो असलो तरी एक काही वर्षांपूर्वी एक बालक  होतो .आणि तो बालक मरेपर्यंत आपल्या साथीदार म्हणून शेवटपर्यंत कायम राहील हे  मात्र विसरू   नका.

जीवनाचा प्रवास हा बालक ते पालक  ...पालक ते बालक  ह्यातच चौकटीत बंदिस्त राहून  फिरत असतो .त्यालाच  आपण  जीवनचक्र  म्हणून संबोधतो.   थोडक्यात काय  बालपण ते तारुण्य..पण.नंतर  म्हातारपण  ते  बालपण ..उतारवयात  आपणास  छोट्या मुलाप्रमाणेच   जेवण  भरवावे लागता..
आहे कि नाही खरी मज्जा.....

तर परत एकदा मुख्य विषयावर बोलूयात.स्वतःला कसे ओळखाल.म्हणूनच म्हणतो.आपण पालक म्हणून मुलांवर योग्य ते संस्कार करावयास हवे.मुलाना त्याच्या ध्येय साध्य करण्यासाठी मदत केली पाहिजेत. कारण मुले लहान आहेत त्यांना विचार करण्याची परिपक्वता आलेली नसते.तेव्हा आपण त्याना मार्ग दाखवला पाहिजेत. 

कोणत्याही माणसाचे / किंवा स्वतःचे प्रामाणिक विश्लेषण करण्यासाठी पुढील गोष्टींचा विचार करावा.

१. निश्चित ध्येय - माणसाच्या आयुष्याला काही ध्येय असेल तर आणि तरच निश्चित दिशा असते. पाय मोकळे करायला कोणत्याही दिशेला गेले तरी चालते पण जर निश्चित स्थळी जायचे असेल तर निश्चित रस्ताच पकडावा लागतो. ध्येय कोणत्याही प्रकारचे असो … व्यावहारिक [पैसा, सत्ता नावलौकिक], प्रातिभासिक [कलेची साधना] किंवा आध्यात्मिक [आध्यात्मात विशिष्ट उंची प्राप्त करणे]. सर्वांनाच वाटते की आपण असामान्य आहोत पण जेव्हा आपण त्या क्षेत्रात यशस्वी झालेल्या लोकांचे चरित्र वाचतो किंवा जाणून घेता तेव्हा इच्छा किंवा स्वप्न म्हणजे ध्येय नाही याची कल्पना येते.

२. वस्तूस्थितीचे भान - ध्येयाच्या प्राप्तीसाठी ज्या गोष्टी आवश्यक आहेत त्या माझ्याकडे त्या प्रमाणात आहे का? म्हणजे व्यावहारिक ध्येय असेल तर जे व्यावहारिक ज्ञान, शैक्षणिक पात्रता, आणि बुद्धिचातुर्य असायला हवे ते आपल्याकडे आहे का? माणसे ओळखायची कला आपल्यात आहे का? स्वतंत्र व्यवसाय करायचा असेल तर मुळात भांडवल उभारणी करणे शक्य आहे का? बाजारात आपली पत काय आहे? … अशा प्रश्नांची निश्चित उत्तरे हवीत.

प्रतिभासिक ध्येय असेल तर मुळात ती कला सिद्ध होण्यासाठी माझ्यात ती प्रतिभा आहे का? म्हणजे समजा एखादे तालवाद्य वाजवायला शिकायचे असेल तर ताल शिकता येतो पण लय ही अंगातच असावी लागते. आता ज्या माणसाला असंख्यवेळा ऐकलेली गणपतीची आरती म्हणताना टाळी नेमकी कुठे वाजवायची हे कळत नसेल तर तो मृदुंग, तबला, ढोलक … वगैरे तालवाद्य वाजवू शकणार नाही कारण त्याला मात्रा कळणार नाहीत तर 'सम' आणि 'खाली' कसे कळेल? किंवा मुळात ज्याचा हात स्थिर नसेल त्या माणसाला उत्तम दर्जाची चित्रकला जमणार नाही [मॉडर्न आर्ट ) तर सोडूनच द्या. जी व्यक्ती मुकी आहे किंवा तोतरी आहे तिला एक उत्तम गायक होणे कसे जमेल? एखाद्या खेळात विशेष प्राविण्य मिळवायचे असेल तर आपण हातीपायी धड आहोत का याची जाणीव पाहिजे. अपंग व्यक्तीने सामान्य लोकांच्यात मैदानी खेळ खेळण्याचे स्वप्न बघू नये. इतकेच मी येथे सांगू ईच्छूतो. 

आध्यात्मिक ध्येय असणाऱ्या माणसांचा रस्ताच पूर्णतः वेगळा आहे आणि तो स्वतंत्र असा मोठा विषय आहे म्हणून इथे विस्तृतपणे लिहित नाही. पण एखाद्या संताचे चरित्र वाचल्यावर त्यांनी आयुष्यात जशी कठोर तपस्या केली आणि संसाराचा त्याग केला तसा आपल्याला जमेल का हे बघावे.फक्त इथे संत म्हणजे ज्ञानेश्वर, तुकाराम, रामदास, नामदेव, श्रीधरस्वामी … वगैरे संत घ्यावेत. आधुनिक काळातील पंच तारांकित चॅनेलगुरु नव्हेत म्हणजे संत, महंत, महामंडलेश्वर, आचार्य, भगवान, ओशो, श्री., श्री. श्री., श्री.श्री.श्री., अनंतश्री, बापू, महाराज, बाबा, मामा, काका, तात्या, अम्मा, अक्का, काकी, मामी, मावशी, विद्यावाचस्पती, गुरु, महागुरू, जगत्गुरू, विश्वगुरु, ब्रह्मांडगुरु …. वगैरे नाहीत. 

३. त्याग करण्याची तयारी - काहीतरी मिळवण्यासाठी काहीतरी सोडावे लागणे अर्थात त्याग करायला लागणे शक्य आहे. पंडित शिवकुमार शर्मा आणि पंडित जसराज हे मुळचे तबलजी होते पण संतूरमध्ये कारकीर्द करण्यासाठी शिवकुमार शर्मा यांनी तबला सोडला तर शास्त्रीय गायनात कारकीर्द घडवण्यासाठी जसराज यांनी तबला सोडला. पंडित भीमसेन जोशी यांनी तर घरच सोडले होते. कोणत्याही ध्येयपूर्तीसाठी पुरेसा वेळ द्यावा लागतो आणि कठोर परिश्रम करावेच लागतात. जर आपण आपली जगण्यावागण्याच्या पद्धतीत, सवयीत किंवा राहणीमानात तसूभरही बदल करण्यास तयार नसू तर आपल्याला नवीन जीवन पद्धती स्वीकारताच येणार नाही. म्हणजेच त्याग करण्याची मानसिक तयारी असावी. मुळात स्वभावात लवचिकता हवी.

४. अपयश स्वीकारायची तयारी - हे सर्व असूनही ध्येयपूर्ती होईलच असे नाही आणि ध्येयाची प्राप्ती झाल्यावर आनंद मिळेलच असेही नाही. कारण बरेच वेळा असे होते की उत्साहाच्या भरात आपण एखादे ध्येय धरतो … प्राप्तीसाठी तयारी करतो … आवश्यक तो त्याग करतो आणि जेव्हा ध्येयपूर्ती होते तेव्हा असे कळते की या शिखरावर पोहोचल्यावर जो अनुभव येईल असे आपल्याला पूर्वी वाटले होते तसे इथे काहीच नाही आणि त्यामुळे ध्येयपूर्ती होऊनही आनंद मिळत नाही. अशावेळी माणूस इतका खचतो की पूर्णतः वैफल्यग्रस्त होऊ शकतो आणि प्रसंगी आत्महत्यासुद्धा करू शकतो. त्यामुळे अपयश स्वीकारायची तयारी असलेली चांगली … क्रिकेट खेळणारा प्रत्येक मुलगा काही सचिन तेंडूलकर होऊ शकत नाही. मोठे आणि यशस्वी पैसेवाले सिनेकलावंत व्यसनाधीन का होतात आणि आत्महत्या का करतात.कारण त्यांचा भ्रमनिरास झालेला असतो किंवा त्यांना अपयश पचवता येत नाही.

हे निकष स्वतःला लागू करून बघावेत … प्रामाणिकपणे सखोल विचार करून जे उत्तर येते ते बरोबर असण्याची शक्यता आहे … कारण माणूस स्वतःशी खोटं बोलू शकत नाही.

लेखन कौशल्य-उदय माळगांवकर

लेबल:

बुधवार, १६ मार्च, २०२२

Stipend वा पगार तुम्हीच ठरवा .

Stipend वा पगार..तुम्हीच ठरवा..

मित्र हो,
आपण आपले शालेय शिक्षण पूर्ण करत असताना किंवा करून झाल्यावर आपणांस  आपल्याच कामाचा मोबदला ह्या ना त्या स्वरूपात मिळतो .त्यास आपण  स्टायपेंड वा विद्यावेतन- पगार- वा मिळकत बरेच काही शब्द वापरत असतो. त्यातूनच आपणांस समाधान,सुख आणि आनंद  मिळतो. लहानपणापासूनच आपणांस शिकवले जाते कि काम केल्यावर पैसा मिळणार..काम आणि पैसा वा पगार वा हवंतर मिळकत वा मोबदलाच  म्हणा ना ..पण इकडून तिकडून सारखेच. ..आज आपण ह्याच विषयावर बोलणार आहोत.... 

तर हे Stipend म्हणजेच काय?ज्याची तोंड ओळख आपणांस शालेय जीवनापासूनच माहीत झाली आहे. Stipend ह्या शब्दापासून Salary / Income ह्या शब्दापर्यंत आपण केव्हा येऊन पोहचतो. हे आपल्या लक्षातच येत नाही.मग आपण  आयुष्याच्या जीवन चक्रात गुरफटून जातो.मग  काय  आपण  जागेपणी वा झोपेतसुदधा त्याचा पाठलाग सोडत नाही.खरं आहे ना मित्रांनो..तुम्हांस काय वाटतंय? 

तर हे Stipend वाटतंय तेवढं सोप्प नाही बरं का ? तो  विषय शिकायचंय वा शिकवायचं झालं तर फार अभ्यास करावा लागतोय.ज्ञान  प्राप्त करून घेण्यास फार काबाडकष्ट करावे लागतात.तसेच त्याचा आशय दुसऱ्याला समजून द्यायला वा त्याच्या डोक्यात प्रकाश पडायलासुदधा वेळ द्यायलाच हवा.आणि हेच काम शिक्षक करत असतात.म्हणूनच म्हणतात  विद्यार्थी होणं सोप्प पण एकदा शिक्षक होऊन बघा...एक शिक्षक साठ सत्तर  विद्यार्थी...समीकरण फारच किचकट...तर आपण कश्यावर बोलतोय...हा Stipend...

Stipend म्हणजेच विद्यावेतन- पगार- मिळकत. प्रथम ह्याचा अर्थ समजून घेऊ यात. ह्यामध्ये दोन बाजू आहेत. एक बाजू  स्टायपेंड आणि दुसरी बाजू पगार वा मिळकत जसे नाण्यास दोन बाजू  असतात. तसे...पण मूल्यमापन करताना नाणं एकच आणि बाजारात जाऊन त्याचा वापर  करावयाचा असेल तर ते खणखणीत असावे लागते...

तर काय  शालेय शिक्षण पूर्ण करताना जे मिळतं ते Stipend  आणि नोकरी लागल्यानंतर जो  मिळतो तो पगार वा मिळकत....मित्र  हो येथेच आपण चूक करतो...तो पगार  नसून ते एक प्रकारचे Stipend आहे आणि त्याचा वापर तुम्हांस तुमचा पगार किंवा मिळकत कसे जास्त वाढेल. ह्यासाठीच करावयाचा आहे..म्हणजेच काय  Stipend  हे तुमचे कौशल्य वाढवण्यासाठी वापरायचं  असते.ज्यो तो आपले  Skill वा कौशल्य काळानुरूप वाढवत जातो.तस तसा त्याचा पगार आणि मिळकत वाढतच जाते .त्यासाठीच तर हे तुम्हांस Stipend  दिले जाते.त्याचा वापर हा तुमच्या  Skill Development साठी करायचंय नाही कि तुमच्या  कौटुंबिक गरजांसाठी ...तुमचे कौशल्य वाढलं कि तुमचा पगार वाढतो वा मिळकत वाढते.म्हणजेच  Stipend  व्यतिरिक्त  जो जादा मोबदला मिळतो तो तुमचे Skills वाढल्यावर मिळेल. आहे कि नाही गंमत. ..विषय फार कठीण आहे...त्याचा अर्थ तुम्हांस लगेच समजणार नाही.त्यासाठी विचार करून आकलन करावे लागेल तरच तुम्ही त्याच्या तळास पोहचू शकतात...
आता आपण एक उदाहरण घेऊ या.बघा दोन सख्खे मित्र  एकत्र आणि एकाच कंपनीत काम करतात. दोघेही आय टी आय पास झालेत आणि एकच त्याचा टेंड/ Trade  " फिटर"

कामास लागल्यानंतर एक जातो Production department ला व  दुसरा जातो Maintenance ला .दोघांना पगार सुद्धा सारखाच आहे..पण कालांतराने दहा वर्षात जो Production department मध्ये काम करणारा मित्र फार काही न करता निमूटपणे आपले जीवन जगत असतो.मज्जाच मज्जा करीत असतो..पण याउलट Maintenance मध्ये काम करणारा मित्र आपलं कौशल्य वाढविण्यास नेहमीच धडपड करीत असतो आणि त्यामुळेच त्याचा पगार हा खुपच जास्त असतो. दोघांच्या पगारात तफावत आढळून आली कारण एकजण वरच्या पदावर कार्यरत असून दुसरा मात्र आहे त्याठिकाणी राहतो.कारण त्यास मिळत असणारा पैसा तो पगार म्हणून समजत राहिला आणि दुसरा मात्र त्यास Stipend  समजून त्याचा वापर त्यांनी आपल्या उच्च शिक्षणासाठी वापरला आणिक  आपला पगार वाढविला.जेणेकरून आपल्या कौटुंबिक गरजा योग्यरीत्या भागविल्या जातील . मला पगार  कमी म्हणून रडत बसायचं नाही तर उलट माझे मी Skills वाढवून माझी मिळकत वाढवेण.असे म्हणायचे. कारण acquiring multi skills and knowledge leads to gaining your salary  and growth your income. 
नाही समजले तर आपण आणखी एक उदाहरण बघू.
 
आता दुसरे उदाहरण घेऊ यात. श्याम आणि मनोहर एकाच आईवडिलांच  दोन जुळी मुले. दोघंजण एकाच शाळेत शिकून दहावीपर्यंत शिक्षण पूर्ण करून कामास लागली. चांगला पगार दोघांना होता. पण विचारसरणी दोघांची वेगवेगळी होती.दोघांची ध्येय वेगळी होती.काळ बदलत  होता. वर्ष सरसर जात होती. जवळपास दहा वर्षानंतर दोघांमधील बदल समोर दिसत होता.श्याम एक सर्वसाधारण कामगार म्हणून जीवन जगत होता आणि मनोहर मात्र एक सुपरवायझर म्हणून नावलौकिक प्राप्त करून जीवन जगत होता. हे कसे काय शक्य झालंय..प्रत्यक्ष त्यांच्याशी बोलून व चर्चा करून एक सत्य बाहेर आलं. ते म्हणजेच  श्याम आपणांस मिळणारा  सर्व  पगार  हा आपल्या कौटुंबिक व आपल्या मनोरंजन व मज्जेसाठी खर्च करत होता. राहिलेला शिल्लक पैसा हा आपल्याच कौटुंबावर  आकस्मित येणाऱ्या संकटावर खर्च करत होता.याउलट मनोहर  हा मात्र त्याला मिळणारा सर्व  पगार तो खर्च करत नव्हता तर त्याचे त्याने चार वेगवेगळे भाग केले होते.एक भाग कौटुंबिक खर्चासाठी, तर दुसरा आकस्मित खर्चासाठी, तिसरा व्यक्तीगत खर्चासाठी वा  स्वतःच्याच मज्जेसाठी आता राहिला चौथा भाग म्हणजेच शेवटचा भाग हा त्याने स्वतःच्या विकासासाठी  वा ज्ञान आणि आपले कौशल्य वाढविण्यासाठी वापरत होता.जेणेकरून त्याची मिळकत वाढेल.तसेच  त्यामध्ये  वृद्धी होईल. ह्याकडे त्याचे सदैव लक्ष असायचं. त्यासाठीच  तो नेहमीच धडपड करीत होता.म्हणजेच आपलं कौशल्य काळानुरूप वाढवत राहिलो तर आपले income वा पगार  वाढविला. IN SHORT MORE SKILLS MORE MONEY. #Profitable Skills to make 💰 

हे  कसे होते ते वेगळे मी सांगणार नाही.कारण तुम्ही सुजाण व सुसंस्कृत व सज्ञान नागरीक आहात. तेव्हा शहाण्यास शब्दाचा मार पुरेसा असतो....
  
तरी मी तुम्हांस एक hint देतो.आपणांस आपल्या मातृभाषेच्या व्यतिरिक्त अजून किती भाषा आपण बोलू शकतो...भारतीय वा परदेशी...बघा विचार करा.अजून वेळ गेलेली नाही....तुमच्यसाठी अजून  भरपूर 
 नविन द्वारे उघडी आहेत. मग थांबलात का? व्हा सज्ज...जग तुमचेच आहे...

सारांश...मिळणारा पगार हा Stipend म्हणून  समजा व त्याचा वापर उच्च ज्ञान वा शिक्षणासाठी वापरा. जेणेकरून तुमची मिलकत वा त्यामध्येही वृद्धी होऊन तुम्हांस पैसा भरपूर मिळेल. 

Learning and Growth is a pioneer key for getting us a great success in our happy life. .. विचार बदला..दृष्टिकोन बदलून आपलं ध्येय साध्य करायचंय...प्रयत्न करायला काय हरकत आहे...सहज सुचलं म्हणून...आम्ही  बिघडलो...तुम्ही ही बिघडांना,सद्गुरू संगे शिष्य  बिघडला...

लेखन कौशल्य-उदय माळगांवकर 

माझी प्रेरणास्थाने- माझा स्वःअनुभव व आचार विचार, सकारात्मक दृष्टिकोन,कष्ट करण्याची तळमळ  आणि ज्यांनी मला वेळोवेळी मार्गदर्शन केले ते माझे सर्वच हितचिंतक,परममित्र आणि गुरूजण...तयाना माझा साष्टांग नमस्कार आणि दोन्हीं हात जोडुन दंडवत ....🙏🙏

लेबल:

सोमवार, १४ मार्च, २०२२

Stipend वा पगार...तुम्हीच ठरवा.

Stipend

मित्र हो,
आपण आपले शालेय शिक्षण पूर्ण करत असताना किंवा करून झाल्यावर आपणांस  आपल्याच कामाचा मोबदला ह्या ना त्या स्वरूपात मिळतो .त्यास आपण  स्टायपेंड-शिष्यवृत्ती वा विद्यावेतन- पगार- वा बरेच काही शब्द वापरत असतो. त्यातूनच आपणांस समाधान,सुख आणि आनंद  मिळतो. लहानपणापासूनच आपणांस शिकवले जाते कि काम केल्यावर पैसा मिळणार..काम आणि पैसा वा पगार वा हवंतर मोबदलाच  म्हणा ना ..पण इकडून तिकडून सारखेच. ..आज आपण ह्याच विषयावर बोलणार आहोत.... 

तर हे Stipend म्हणजेच काय?ज्याची तोंड ओळख आपणांस शालेय जीवनापासूनच माहीत झाली आहे. Stipend ह्या शब्दापासून Salary ह्या शब्दापर्यंत आपण केव्हा येऊन पोहचतो. हे आपल्या लक्षातच येत नाही.मग आपण  आयुष्याच्या जीवन चक्रात गुरफटून जातो.मग  काय  आपण  जागेपणी वा झोपेतसुदधा त्याचा पाठलाग सोडत नाही.खरं आहे ना मित्रांनो..तुम्हांस काय वाटतंय? 

तर हे Stipend वाटतंय तेवढं सोप्प नाही बरं का ? तो  विषय शिकायचंय वा शिकवायचं झालं तर फार अभ्यास करावा लागतोय.ज्ञान  प्राप्त करून घेण्यास फार काबाडकष्ट करावे लागतात.तसेच त्याचा आशय दुसऱ्याला   समजून द्यायला वा त्याच्या डोक्यात प्रकाश पडायलासुदधा वेळ द्यायलाच हवा.आणि हेच काम शिक्षक करत असतात.म्हणूनच म्हणतात  विद्यार्थी होणं सोप्प पण एकदा शिक्षक होऊन बघा...एक शिक्षक साठ सत्तर  विद्यार्थी...समीकरण फारच किचकट...तर आपण कश्यावर बोलतोय...हा Stipend...

Stipend म्हणजेच शिष्यवृत्ती वा विद्यावेतन- पगार- प्रथम ह्याचा अर्थ समजून घेऊ यात. ह्यामध्ये दोन बाजू आहेत. एक बाजू  स्टायपेंड आणि दुसरी बाजू पगार. जसे नाण्यास दोन बाजू  असतात. तसे...पण मूल्यमापन करताना नाणं एकच आणि बाजारात जाऊन त्याचा वापर  करावयाचा असेल तर ते खणखणीत असावे लागते...

तर काय  शालेय शिक्षण पूर्ण करताना जे मिळतं ते Stipend  आणि नोकरी लागल्यानंतर जो  मिळतो तो पगार..मित्र  हो येथेच आपण चूक करतो...तो पगार  नसून ते एक प्रकारचे Stipend आहे आणि त्याचा वापर तुम्हांस तुमचा पगार कसा जास्त वाढेल. ह्यासाठीच करावयाचा आहे..म्हणजेच काय  Stipend  हे तुमचे कौशल्य वाढवण्यासाठी वापरायचं  असते.ज्यो तो आपले  Skill वा कौशल्य काळानुरूप वाढवत जातो.तस तसा त्याचा पगार वाढतच जातो.त्यासाठीच तर हे तुम्हांस Stipend  दिले जाते.त्याचा वापर हा तुमच्या  Skill Development साठी करायचंय नाही कि तुमच्या  कौटुंबिक गरजांसाठी ...तुमचे कौशल्य वाढलं कि तुमचा पगार वाढतो म्हणजेच  Stipend  व्यतिरिक्त  जो जादा मोबदला मिळतो तो तुमचे Skills वाढल्यावर मिळेल. आहे कि नाही गंमत. ..विषय फार कठीण आहे...त्याचा अर्थ तुम्हांस लगेच समजणार नाही.त्यासाठी विचार करून आकलन करावे लागेल तरच तुम्ही त्याच्या तळास पोहचू शकतात...
आता आपण एक उदाहरण घेऊ या.बघा दोन सख्खे मित्र  एकत्र आणि एकाच कंपनीत काम करतात. दोघेही आय टी आय पास झालेत आणि एकच त्याचा टेंड " फिटर"

कामास लागल्यानंतर एक जातो Production department ला व  दुसरा जातो Maintenance ला .दोघांना पगार सुद्धा सारखाच आहे..पण कालांतराने दहा वर्षात जो Production department मध्ये काम करणारा मित्र फार काही न करता निमूटपणे आपले जीवन जगत असतो.मज्जाच मज्जा करीत असतो..पण याउलट Maintenance मध्ये काम करणारा मित्र आपलं कौशल्य वाढविण्यास नेहमीच धडपड करीत असतो आणि त्यामुळेच त्याचा पगार हा खुपच जास्त असतो. दोघांच्या पगारात तफावत आढळून आली कारण एकजण वरच्या पदावर कार्यरत असून दुसरा मात्र आहे त्याठिकाणी राहतो.कारण त्यास मिळत असणारा पैसा तो पगार म्हणून समजत राहिला आणि दुसरा मात्र त्यास Stipend  समजून त्याचा वापर त्यांनी आपल्या उच्च शिक्षणासाठी वापरला आणिक  आपला पगार वाढविला.जेणेकरून आपल्या कौटुंबिक गरजा भागविल्या. ..

सारांश...मिळणारा पगार हा Stipend म्हणून  समजा व त्याचा वापर उच्च ज्ञान वा शिक्षणासाठी वापरा जेणेकरून तुम्हांस पगार भरपूर मिळेल. ...

प्रेरणास्थान-माझे परममित्र श्री.अंनत नातू....ह्याच्या विचारांतून मला हे कोडं उमजलं....धन्यवाद नातू साहेब. ...

लेबल:

शुक्रवार, ११ मार्च, २०२२

दिसतं तसे नसतं....

एका घरात एक लहान मुलगी होती. एके दिवशी ती दोन
सफरचंद हातात घेऊन घराच्या अंगणात उभी होती.
कदाचित ती खाण्याच्या तयारीत होती. तेवढ्यात तिची
आईही तिथे आली.
तिची मुलगी हातात दोन सफरचंद घेऊन उभी असलेली
दिसली. तर ती आपल्या मुलीला म्हणाला, "बेटू तू तुझ्या
आईला सफरचंद देणार नाहीस का?"
असे ऐकताच मुलीने पटकन एक सफरचंद दातांनी
कुरतडून त्याचा छोटा तुकडा खाल्ला. तिची आई
आणखी काही बोलायच्या आधीच तिने दुसरे सफरचंदही
कुरतडले. हे सर्व पाहून तिची आई खूप दुःखी आणि
निराश झाली आणि तिला वाटले की आपल्या मुलीला
विभाजनाची अजिबात जाणीव नाही.
तिची पूर्ण फसवणूक झाली आणि तिच्या चेहऱ्यावरून
हसू नाहीसे झाले.
अचानक मुलीने तिचा एक हात पुढे केला आणि म्हणाली,
"आई, हे घे, हे सफरचंद जास्त गोड आहे.'
हे ऐकून आईच्या डोळ्यात पाणी आले आणि तिने
आपल्या मुलीला घट्ट मिठी मारली.
धडा: संपूर्ण गोष्ट जाणून घेतल्याशिवाय आपण कधीही
कोणत्याही निष्कर्षापर्यंत पोहोचू नये.

लेबल: