आजचे विचार पुष्प -सोड सोड माया सारी, आहे जग हे नश्वर..
दिनांक - २७/०२/२०२२
आजचे विचार पुष्प - सोड सोड माया सारी आहे जग हे नश्वर......
आज सकाळीच बसमध्ये कोणाच्या तरी मोबाईल वर रिंग जोरजोरात वाजत होती..त्यावर हे स्वर ऐकून माझी झोप उडाली.जुन्या काळातील थोर गायक कै.प्रह्लाद शिंदे ह्याचे गाणे चालू होते.
"ज्ञानी असो की अज्ञानी, गती एक आहे जाण,
मृत्यूला न चुकवी कोणी थोर असो अथवा सान,
सोड सोड माया सारी आहे जग हे नश्वर,
जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर"
लगोलग गाणे ऐकण्यात तल्लीन होऊन विचार करू लागलो कि पुर्वीच्या काळात समाजाचे प्रबोधन गाण्यातून केले जायचे.एक एक शब्द नी शब्द सुसंस्कृत आणि अर्थबोध असायचा.गीतकारांने योग्य तो शब्दकोशाचा वापर करून गाणे लिहून त्याकाळातील ताकदीच्या संगीतकाराने संगीतबद्ध करून थोर गायकाने त्यात जीव ओतून ते स्वरबद्ध केले.म्हणूनच ते गीत अजरामर झाले.आजसुद्धा ते गाणे ऐकतांना आपण आपले भान हरपून त्यात तल्लीन होतो.
जीवनाचे खरे सार ह्या गाण्यात मांडले आहे.खोलवर विचार करता, असा बोध होतो " मनुष्य योनीत जन्म देऊन ईश्वराने फार मोठे उपकार आपल्यावर केले आहेत.आपली जीवन गती एकसमान आहे.त्यामध्ये कुठलाच भेदभाव नाही,ज्ञानी वा अज्ञानी असे म्हणून पळवाट काढता येणार नाही.जीवन मोक्ष प्राप्ती व्हायला हवी असेल तुमचे जीवन सार्थकी लावा.हा जन्म पुन्हा भेटणे नाही.तुम्ही जे काही चांगले वाईट कर्म कराल त्याचेच फळ तुम्हांस ह्याच जन्मात मिळेल. शेवटी आपला मृत्यु अटळ आहे.तो कोणालाच चुकला नाही...म्हणूनच असे सांगितले आहे "
राग,रूसवे,लबाडी,माया,मोह,मस्तर,द्वेष ,अहंकार,
भेदभाव, अभिमान हे सर्व सोडून ईश्वर चरणी लीन होऊन प्रेम,
माणुसकी,ममता,लोभ ,दया,करूणा,वात्सल्य ह्याची कास धरा.
गरजवंत,निराधार लोकांचा आधार व्हा, गोरगरीबांवर दया करून त्याच्या जीवनात आनंद निर्माण करा.वेळप्रसंगी हातचे सोडून त्यांस मदत करा.दैवयोगाने जर काही देण्याजोगे संपत्ती असेल तर समाजकार्य करून समाजाच्या ऋणातून मुक्त व्हा.शक्य तेवढे नि:स्वार्थाने दुस-यास आनंद द्या. त्याच्या मदतीला धावून जा. परोपकार करा .
प्रत्येक क्षण जगणं हेच जीवन.जीवनातील प्रत्येक क्षण महत्त्वाचा असतो. कुठल्याही क्षणाचं मूल्य दुसऱ्यापेक्षा कमी किंवा जास्त नसतं ज्ञानी लोक प्रत्येक क्षणातून आनंद मिळवितात . थेंबाथेंबानं सागर बनतो. क्षणाक्षणानं जीवन बनतं जो प्रत्येक क्षणाचा लाभ करून घेतो त्याला जीवनही लाभदायक होतं.
ज्याला त्याला हे समजले तो खरा जीवन साधक....
लेखन कौशल्य-उदय माळगांवकर...
लेबल: आजचे विचार पुष्प -सोड सोड माया सारी, आहे जग हे नश्वर..

0 टिप्पण्या:
टिप्पणी पोस्ट करा
याची सदस्यत्व घ्या टिप्पणी पोस्ट करा [Atom]
<< मुख्यपृष्ठ