सरकता जिना ...
सोमवार दिनांक २१ फेब्रुवारी २०२२
सरकता जिना ...
आज सकाळीच साडेचार वाजता मी घाईघाईत कल्याण स्टेशन वर येऊन पोचलो.समोरचा सरकता जिना पाहून मला हायसे वाटले.कारण आता पा-यरा चढायची कटकट संपली होती.
सरकता जिना चालू होता.एक दोन लोक त्याचा वापर करून वरती मुख्य अंखड मोठया पूलावर जात होती.जिथून तुम्ही कोणत्याही फलाटावर पोहोचू शकता.आहे की नाही मज्जाच मज्जा..
मी सुद्धा त्याच्यापाशी येऊन पहिले पाऊल टाकून स्थिरावलो आणि केव्हा वर येऊन पोचलो ते मला समजलेच नाही.मग विचार करू लागलो.हे कसे झाले.सरकता जिना हे एक माध्यम ज्याच्या द्वारे मी योग्य त्या ईप्सित ठिकाणी पोहचलो होतो.कमी वेळेत आणि विशेष काही शारीरिक हालचाल न करता वरती आलो. काय फायदा वा काय तोटा ह्यावर मी काही भाष्य करणार नाही.पण एक गोष्ट बाकी मला समजली आणि ती म्हणजेच योग्य ते नियोजन आणि योग्य त्या साधनसामग्रीचा वापर करून आपण वेळेची आणि शारीरिक कष्टांची बचत करू शकतो व आपले ध्येय साध्य करू शकतो......
आता समीकरण असे झालेय...
कोणतेही ध्येय प्राप्ती करणे = योग्य नियोजन + योग्य ती साधनसामुग्री ÷ लागणारी वेळ + लागणारे कष्ट × ईच्छा शक्ती
ह्या विषयावर आपण जाणीवपूर्वक लक्ष केंद्रित केले तर आपण आपले ईप्सित साध्य करू शकतो....
खोलवर विचार केला तर आजच्या हया धकाधकीच्या जीवनात आपल्याला अश्याच समीकरणाचा वा गोष्टींचा वापर करून आपला जीवन प्रवास सुखकर करावा लागतो....तरच आपणास सुख, समाधान आणि आनंद मिळते....आहे की नाय खरं....
आपले मत व्यक्त करा.
लेखन कौशल्य-उदय माळगांवकर
लेबल: सरकता जिना.

0 टिप्पण्या:
टिप्पणी पोस्ट करा
याची सदस्यत्व घ्या टिप्पणी पोस्ट करा [Atom]
<< मुख्यपृष्ठ