सोळावं वरीस धोक्याचं....
काल असाच सवयीनुसार पुस्तक वाचत बसलो होतो.अचानक कुठूनतरी कानावर स्वर आले..सोळावं वरीस धोक्याचं....
लगोलग पुढील बोल जिभेवर नाचू लागले....
तरुणपणाच्या रस्त्यावरचं पहिलं ठिकाण नाक्याचं, सोळावं वरीस धोक्याचं....
अर्थात बालपणातून तरुणपणात जाण्यापूर्वी लागणारे एका टप्पा वा द्वार म्हणूया....
जीवन शास्त्रानुसार आपल्या जीवनाचे तीन प्रवेशद्वार आहेत...बालपण, तरूणपण, म्हातारपण आणि एकावेळेस एकाच "_पणात" राहता येईल.पुढे पुढे जाणं शक्य पण पाठी फिरणं अशक्य..कारण पुढील दारात प्रवेश केला की मागील दार कायमचे बंद होते..उरतात त्या फक्त आठवणी.....चांगल्या वा वाईट..सुखकर वा खडतर अनुभव....पण जीवनाला कलाटणी देणारे हा कालखंड...
तेव्हा हे कालचक्र कोणासही काही चुकलं नाही. माणसाच्या जीवन अवस्था बदलतात जसे लहानपणी आपण बाळ (मुलगा वा मुलगी ) म्हणतो. तरुणपणात स्त्री वा पुरूष आणि म्हातारपणी "म्हातारा वा म्हातारी एवढंच...
पण जीवनाचा सर्वच अर्थ बदलून जातो...
जीवनशैलीत वा खानपानात काळानुरूप बदल होतात.पण आजसुद्धा जीवनाच्या ह्या टप्प्यावर आल्यावर आपल्या आईवडिलांच्या मनात धाकधूक निर्माण होते. चिंता आणि विचार सतावतात.मन बैचेन होत.दिवस रात्र झोप लागत नाही.शब्द तोकडे पडतात पण अर्थ एकच...आता काय करायचं ?ह्याचे किंवा हीचे कसं होणार ?पुढे काय वाढून ठेवलयं ? कारण जीवनाला कलाटणी देणारा कालखंड....म्हणजेच हे सोळावं वरीस...अधोगती का परागती????
प्रत्येकजण आपापल्या परीने प्रयत्न करत असतो पण यश मिळेल कि नाही.ह्याची खात्री हा येणारा काळच देत असतो.कारण ते आपल्या हातात नाही...कर्म करत राहणे.कोणत्याही फळाची अपेक्षा न करता.
श्रीमद् भगवद्गीतेत कृष्णाने सांगितल्याप्रमाणेच
कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन।
मा कर्मफलहेतुर्भूर्मा ते सङ्गोऽस्त्वकर्मणि।।2.47
लेखन कौशल्य-उदय माळगांवकर
लेबल: सोळावं वरीस धोक्याचं....

0 टिप्पण्या:
टिप्पणी पोस्ट करा
याची सदस्यत्व घ्या टिप्पणी पोस्ट करा [Atom]
<< मुख्यपृष्ठ