सोमवार, २८ फेब्रुवारी, २०२२

सुखाचा राजमार्ग...आचारविचार आणि सुख प्राप्ती.

आजचा विचार -सुखाचा राजमार्ग...आचारविचार आणि सुख प्राप्ती. 

"दैवयोग वा दैवी प्रसाद काय आहे ??? देवाचा आशीर्वाद वा कृपा कशी प्राप्त होईल ? देव देवळात नाही तर तो तुमच्या आमच्या  हदयात आहेत.पण आपण त्यास ओळखत नाही.ती एक अदभूत व अदृश्य शक्ति आहे.त्याचा आपल्याला भास आभास होतो पण दिसत नाही. जशी हवा.....सर्वत्र संचार आहे....केव्हा थंड ( हिवाळ्यात थंडीत कुडकुडतो) ...केव्हा गरम ( उन्हाळ्यात  लाहीलाही होते ).हे असे का ????आपण  थोडा वेळ घ्या आणि त्याबद्दल विचार करा.  दिवसातून एकदा, आपण इतरांबद्दल विचार कराल आणि इतरांच्या चेह -यावर आनंद कसा असेल.  आपण त्याला कशी मदत करू शकतो किंवा त्याच्या आनंदात सहभागी होऊ शकतो.  जर आपण त्याबद्दल विचार केला तर कदाचित आपणास सार्वभौमत्व मिळू शकेल.  देव सर्वत्र आहे, फक्त आपण त्याला ओळखत नाही, म्हणून आपण दु: खी आहात.  सर्व काही आपल्या हातात आहे.  आपले विचार बदला, मग परमेश्वराचे चमत्कार पहा.  परमेश्वर नेहमीच तुमच्याबरोबर राहील आणि तुम्हाला कधीही दु: ख देणार नाही.

देव आपल्या जवळ काहीही ठेवत नाही तर त्याची परतफेड वेळ आल्यावर लगेच परत करतो.जे पेरलं ते उगवणार...कांदा जमिनीत लावला तर कांदाच येईल बटाटा नाही आणि तशी अपेक्षासुदधा करू नका.

थोर गायक कै.प्रल्हाद शिंदे  ह्यांनीच गायलेले एक गीत..."ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर"

जगी जीवनाचे सार घ्यावे जाणुनी सत्वर जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर,

 क्षणिक सुखासाठी अपुल्या कुणी होतो नीतिभ्रष्ट कुणी त्यागी जीवन अपुले दुःख जगी करण्या नष्ट देह करी जे जे काही आत्मा भोगितो नंतर,

 ज्ञानी असो की अज्ञान गती एक आहे जाण मृत्यूला न चुकवी कुणी थोर असो अथवा सान सोड सोड माया सारी आहे जग हे नश्वर,

 मना खंत वाटुनी ज्याचे शुद्ध होई अंतःकरण क्षमा करी परमेश्वर त्या जातो तयाला जो शरण अंत पृथ्वीचा बघ आला युगे चालली झरझर.

एवढेच सांगितल जाते... माणसाने केलेल्या चांगल्या, वाईट कर्माचा हिशेब त्याला इथेच चुकता करावा लागतो. धनसंपत्ती, पैसाअडका लाख कमावला तरी शेवटी हाती काय लागणार? हे संतवचन आजही समाजाला आदर्श जीवन पद्धतीकडे नेत आहे.

मी कोण आहे, मी काय करतो आहे, मला काय करायला हवं, क्षणभर थांबून माणसाला आपला विचार करायलाही वेळ उरलेला नाही. नोकरी, घर, कार्यालयात आपण सहकारी व कुटुंबीयांसाठी दररोज संवाद साधतो. पण, कधी स्वत:शी संवाद साधला आहे का?

जर नाही तर अजून वेळ गेलेली नाही.वेळीच सावध व्हा...स्वतः बरोबर दुस-याचे कल्याण करा.त्यात आनंद द्या.त्यात परमेश्वराचा अंश लपला आहे ..तो ओळखा..दृष्टिकोन बदला.देव सर्वत्र आहे.त्याचा आशिर्वाद घ्या व दुस-यास चांगलेच आशीर्वाद द्या....

लेखन कौशल्य-उदय माळगांवकर.

लेबल:

शनिवार, २६ फेब्रुवारी, २०२२

आजचे विचार पुष्प -सोड सोड माया सारी, आहे जग हे नश्वर..

दिनांक - २७/०२/२०२२

आजचे  विचार पुष्प - सोड सोड माया सारी आहे जग हे नश्वर......

 आज सकाळीच  बसमध्ये कोणाच्या तरी मोबाईल वर रिंग जोरजोरात वाजत होती..त्यावर हे स्वर ऐकून माझी झोप उडाली.जुन्या काळातील थोर गायक कै.प्रह्लाद शिंदे ह्याचे गाणे चालू होते.

"ज्ञानी असो की अज्ञानी, गती एक आहे जाण,
मृत्यूला न चुकवी कोणी थोर असो अथवा सान,
सोड सोड माया सारी आहे जग हे नश्वर,
जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर"

लगोलग गाणे ऐकण्यात तल्लीन होऊन विचार करू लागलो कि पुर्वीच्या काळात समाजाचे प्रबोधन गाण्यातून केले जायचे.एक एक शब्द नी शब्द सुसंस्कृत आणि अर्थबोध असायचा.गीतकारांने  योग्य तो शब्दकोशाचा  वापर करून गाणे लिहून त्याकाळातील ताकदीच्या संगीतकाराने संगीतबद्ध करून थोर गायकाने त्यात जीव ओतून ते स्वरबद्ध केले.म्हणूनच ते गीत अजरामर झाले.आजसुद्धा ते गाणे  ऐकतांना आपण आपले भान हरपून त्यात तल्लीन होतो.

जीवनाचे खरे सार ह्या गाण्यात मांडले आहे.खोलवर विचार करता, असा बोध होतो " मनुष्य योनीत जन्म देऊन ईश्वराने फार मोठे उपकार आपल्यावर केले आहेत.आपली जीवन गती एकसमान आहे.त्यामध्ये कुठलाच भेदभाव नाही,ज्ञानी वा अज्ञानी असे म्हणून पळवाट काढता येणार नाही.जीवन मोक्ष प्राप्ती व्हायला हवी असेल तुमचे जीवन सार्थकी लावा.हा जन्म पुन्हा भेटणे नाही.तुम्ही जे काही चांगले वाईट कर्म कराल त्याचेच फळ तुम्हांस ह्याच जन्मात मिळेल. शेवटी आपला मृत्यु अटळ आहे.तो कोणालाच चुकला नाही...म्हणूनच असे सांगितले आहे  "
राग,रूसवे,लबाडी,माया,मोह,मस्तर,द्वेष ,अहंकार,
 भेदभाव, अभिमान हे सर्व सोडून ईश्वर चरणी लीन होऊन प्रेम,
माणुसकी,ममता,लोभ ,दया,करूणा,वात्सल्य ह्याची कास धरा.

गरजवंत,निराधार लोकांचा आधार व्हा, गोरगरीबांवर दया करून त्याच्या जीवनात आनंद निर्माण करा.वेळप्रसंगी हातचे सोडून त्यांस मदत करा.दैवयोगाने जर काही देण्याजोगे संपत्ती असेल तर समाजकार्य करून समाजाच्या ऋणातून मुक्त व्हा.शक्य तेवढे नि:स्वार्थाने दुस-यास आनंद द्या. त्याच्या मदतीला धावून जा. परोपकार करा .

प्रत्येक क्षण जगणं हेच जीवन.जीवनातील प्रत्येक क्षण महत्त्वाचा असतो. कुठल्याही क्षणाचं मूल्य दुसऱ्यापेक्षा कमी किंवा जास्त नसतं ज्ञानी लोक प्रत्येक क्षणातून आनंद मिळवितात . थेंबाथेंबानं सागर बनतो. क्षणाक्षणानं जीवन बनतं जो प्रत्येक क्षणाचा लाभ करून घेतो त्याला जीवनही लाभदायक होतं.

ज्याला त्याला हे समजले तो खरा जीवन साधक....

लेखन कौशल्य-उदय माळगांवकर...

लेबल: ,

गुरुवार, २४ फेब्रुवारी, २०२२

सोळावं वरीस धोक्याचं....

काल असाच सवयीनुसार पुस्तक वाचत बसलो होतो.अचानक कुठूनतरी कानावर  स्वर आले..सोळावं वरीस धोक्याचं....

लगोलग पुढील बोल जिभेवर नाचू लागले....
तरुणपणाच्या रस्त्यावरचं पहिलं ठिकाण नाक्याचं,  सोळावं वरीस धोक्याचं....

अर्थात बालपणातून तरुणपणात जाण्यापूर्वी लागणारे एका टप्पा वा द्वार म्हणूया....

जीवन शास्त्रानुसार आपल्या जीवनाचे तीन प्रवेशद्वार आहेत...बालपण, तरूणपण, म्हातारपण आणि एकावेळेस एकाच "_पणात" राहता येईल.पुढे पुढे जाणं शक्य पण पाठी फिरणं अशक्य..कारण पुढील दारात प्रवेश केला की मागील दार कायमचे बंद होते..उरतात त्या फक्त आठवणी.....चांगल्या वा वाईट..सुखकर वा खडतर अनुभव....पण जीवनाला कलाटणी देणारे हा कालखंड...

तेव्हा हे कालचक्र कोणासही काही  चुकलं नाही. माणसाच्या जीवन अवस्था बदलतात जसे लहानपणी आपण बाळ (मुलगा वा मुलगी )  म्हणतो. तरुणपणात स्त्री वा पुरूष आणि म्हातारपणी "म्हातारा वा म्हातारी एवढंच...

पण जीवनाचा सर्वच अर्थ बदलून जातो...

जीवनशैलीत वा खानपानात काळानुरूप बदल होतात.पण आजसुद्धा जीवनाच्या ह्या टप्प्यावर आल्यावर आपल्या आईवडिलांच्या मनात धाकधूक  निर्माण होते. चिंता आणि विचार सतावतात.मन बैचेन होत.दिवस रात्र झोप लागत नाही.शब्द तोकडे पडतात पण अर्थ एकच...आता काय करायचं ?ह्याचे किंवा हीचे कसं होणार ?पुढे काय वाढून ठेवलयं ?  कारण जीवनाला कलाटणी देणारा कालखंड....म्हणजेच हे सोळावं वरीस...अधोगती का परागती????

प्रत्येकजण आपापल्या परीने प्रयत्न करत असतो पण यश मिळेल कि नाही.ह्याची खात्री हा येणारा काळच देत असतो.कारण ते आपल्या हातात नाही...कर्म करत राहणे.कोणत्याही फळाची अपेक्षा न करता.
श्रीमद् भगवद्गीतेत कृष्णाने सांगितल्याप्रमाणेच 

कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन।

मा कर्मफलहेतुर्भूर्मा ते सङ्गोऽस्त्वकर्मणि।।2.47

लेखन कौशल्य-उदय माळगांवकर 

लेबल:

शिक्षक

🌺🌺......एकवेळ विद्यार्थी बनून सविस्तर शिक्षण घेणे सोपे असते पण कोणत्याही विषयाचा पारंगत शिक्षक होऊन  शिकवणे तर फारच कठीण असते.हे ज्याला त्याला त्याच्या   अनुभवावरून समजते. कारण प्रथम तो  सर्वसामान्यांप्रमाणे एक विद्यार्थी असतो आणि नंतर आपल्या बुद्धीमत्ता आणि कौशल्याच्या  जोरावर एक शिक्षक बनतो. हे वाटतंय तेवढे सोपे नाहीत. कारण एका वर्गात  साठ सत्तर  मुले असतात  पण पुढे जाऊन  किती शिक्षक होतात..म्हणूनच म्हटलं जाते...विद्यार्थी होणे सोप्प  ..🏵️🏵️

थोर तुमचे उपकार

🏵️थोर तुमचे  उपकार!!🙏
नमस्कार मित्र हो, मागील दोन वर्षांत आपण एकमेव गोष्ट शिकलो की कोणत्याही आकस्मित संकटावर  मात करायची असेल तर आपणांस एकच गोष्ट वाचवू शकते ,ती म्हणजेच लहानपणापासून आपणांस माहित असलेली शिस्त व आपल्यावर झालेले संस्कार ह्याच्या वर लक्ष्य  केंद्रित करून पुढील  वाटचाल केली तर आपण काहीही साध्य वा मात करू शकतो आणि ह्याचाच प्रत्यय आपणास हया कोरोना काळात दिसून आला.लहानपणापासून आपल्यावर ज्यांनी ज्यांनी आपल्या आयुष्याला घडविले... जसे सर्वप्रथम आपले  आईवडील, दुसरे आपले गुरूजी,तिसरे आपले सवंगडी, मित्रमंडळी,सगेसोयरे आणि सरते शेवटी आपले अनुभव जे काही चांगले वाईट, जीवनात आयुष्यभर मिळत असतात..त्या सर्वानाच आपण असे म्हणूया "थोर तुमचे उपकार "🙏🙏

लेबल:

रविवार, २० फेब्रुवारी, २०२२

सरकता जिना ...

सोमवार दिनांक  २१ फेब्रुवारी २०२२

सरकता जिना ...

आज सकाळीच साडेचार वाजता मी घाईघाईत कल्याण स्टेशन वर येऊन पोचलो.समोरचा सरकता जिना पाहून मला हायसे वाटले.कारण आता पा-यरा चढायची कटकट संपली होती.
सरकता जिना चालू होता.एक दोन लोक त्याचा वापर करून वरती मुख्य अंखड मोठया पूलावर जात होती.जिथून तुम्ही कोणत्याही फलाटावर पोहोचू शकता.आहे की नाही मज्जाच मज्जा..

मी सुद्धा त्याच्यापाशी येऊन पहिले पाऊल टाकून स्थिरावलो आणि  केव्हा वर येऊन पोचलो ते मला  समजलेच नाही.मग विचार करू लागलो.हे कसे झाले.सरकता जिना हे एक माध्यम ज्याच्या द्वारे मी योग्य त्या ईप्सित ठिकाणी पोहचलो होतो.कमी वेळेत आणि विशेष काही शारीरिक हालचाल न करता वरती आलो. काय फायदा वा काय तोटा ह्यावर मी काही भाष्य करणार नाही.पण एक गोष्ट बाकी मला समजली आणि ती म्हणजेच योग्य ते नियोजन आणि योग्य त्या साधनसामग्रीचा वापर करून आपण वेळेची आणि शारीरिक कष्टांची बचत करू शकतो व आपले ध्येय साध्य करू शकतो......

 आता समीकरण असे झालेय...

कोणतेही ध्येय प्राप्ती करणे = योग्य  नियोजन + योग्य ती साधनसामुग्री ÷ लागणारी वेळ + लागणारे कष्ट × ईच्छा शक्ती 

ह्या विषयावर आपण जाणीवपूर्वक लक्ष केंद्रित केले तर आपण आपले  ईप्सित साध्य करू शकतो....

खोलवर विचार  केला तर  आजच्या हया धकाधकीच्या जीवनात आपल्याला अश्याच समीकरणाचा वा  गोष्टींचा वापर करून आपला जीवन प्रवास  सुखकर  करावा लागतो....तरच आपणास सुख, समाधान आणि आनंद  मिळते....आहे की नाय खरं....

आपले मत व्यक्त करा.

लेखन कौशल्य-उदय माळगांवकर

लेबल:

शनिवार, १९ फेब्रुवारी, २०२२

विचार गाथा

शुक्रवार दिनांक-१८ फेब्रुवारी २०२२

प्रकरण १--विचारांचे सामर्थ्य  ????

नमस्कार मित्र हो,मला बहुतेक लोक नेहमीच विचारत असतात कि विचार हे  कसे असावेत? विचारांचे सामर्थ्य म्हणजेच  काय?. कोणते विचार कसे  येतात?  चांगले  व वाईट  विचार कसे ओळखावे ? त्यांची गरज का असते? विचार श्रेष्ठ व समृद्ध का  असावेत? असे एक ना अनेक प्रश्न वेळोवेळी आपल्या समोर उपस्थित होत असतात.मग त्यास आपण सामोरे कसे जातो. ह्या विचारांमुळे आपल्यात काय बदल होतात.तसेच चांगल्या वा वाईट विचारांमुळे आपणास काय फायदा वा तोटा होतो.ह्याचा आपण केव्हा विचार केला आहे का?
 
आणि आजवर जर विचार केला नसेल तर अजून वेळ गेलेली नाही. थोडे थांबा व तुम्हांस त्याची  इत्थंभूत माहीती उद्याच्या लेखात मिळेल.... आहे का तुमची तयारी.??? 

आपले विचार मात्र जरूर कळविण्यास विसरू नका.
##########################
शनिवार दिनांक-१९ फेब्रुवारी २०२२

प्रकरण २--विचार म्हणजेच काय????

नमस्कार मित्र हो , सुप्रभात !!!!!

तर आज आपण विचार  म्हणजेच काय?ह्याबददल जरा समजून घेऊ या.

शास्त्रीय सिद्धांत असे सांगतो कि  बुद्धीला किंवा मनाला काही नियमांनुसार 'चालविणे' म्हणजे विचार करणे. "पुर्वानुभवाच्या मदतीनेच व्यक्तिच्या मनातल्या मनात होणारी प्रक्रिया वा घालमेल म्हणजेच विचार होय". 
विचार प्रक्रिया;-(THINKING PROCESS) - विचार ही मानवी मनाची प्रक्रिया वा पद्धत आहे. डोळ्यासमोर नसलेल्या कोणत्याही गोष्टींबद्दल चालु असलेल्या मानसिक प्रक्रियेलाच  ( Thought  Process)  आपण विचार असे म्हणतो.

 हे विचार आपणांस दिसत नाही.पण एकदा का ह्या विचारांनी आपल्या मानवी मनाचा ताबा मिळवला कि लगेच त्यानुसारच आपण सर्वजण वागायला सुरुवात करतो.तुसभर ही जागा सोडत नाहीत.उलट एकदा का तुम्ही विचार करायला लागला  कि क्षणार्धात आपली हालचाल बदलते.चेहऱ्यावर वेगळे हावभाव उमटायला सुरुवात होते ,राग रूसवा, फुगवा येतो वा आनंद,हर्ष येतो. आपण नाचतो काय, गातो काय ..मी तर बाबा गुणगुणत असतो.लहानपणापासूनच मला ती सवय आहे. त्यात आजवर काहीच फरक झाला .मी असाच आहे आणि असाच राहाणार..कारण ते माझ्या जिवंतपणाचे लक्षण आहे.हे माझ्या परिवाराला वा मित्रमंडळीना तुम्ही विचारू शकता. तर असो .आपण पुढे चालूया..

तर मी काय म्हणत होतो...हा..आलं लक्षात....न बोलणारा माणूस बोलायला लागतो...आजूबाजूस काय चाललंय. ह्याच काही त्यास देणे घेणे नसते. पण हे सर्वकाही विचारांवर अवलंबून असते व आपण एका वेगळ्याच विचारांत रंगून जातो.आपल्या  शरीरात  बदल निर्माण व्हायला  लागतात.त्यानंतर आपण सर्वजण त्यानुसारच वागायला लागतो ..विचारांचे प्रतिसाद उमटायला  लागतात..विचार विचार म्हणजेच काय??? त्यात दोनच  प्रमुख प्रकार आहेत. हे आपण लक्षात घेतलं पाहिजेत...त्यातला एक म्हणजे सकारात्मक विचार ( POSITIVE THOUGHT)  आणिक दुसरा नकारात्मक  विचार( NEGATIVE THOUGHT). त्याचे कार्य कसे चालते वा त्यास असे का म्हटले जाते....वगैरे वगैरे....प्रश्न अनेक...
ह्यावर आपण नंतर बोलूयात.कारण विषय फार कठीण व गहन आहे..तर असो ...

तर आज आपण कशावर बोलतोय.????... हा ..आठवलं...अरे हो , बोलता बोलता मी सुद्धा  विचारात पडलोय....तर आपणांस  विचार  कसे व का पडतात व हे कोठून येतात व केव्हा येतात...ह्याचा केव्हा तुम्ही  विचार  केलायं ...
मग  तुम्ही कुठेही असा,जसे घरात वा दारात  वा रस्तावर चालतायं  वा बोलतायं ...कामावर असा  या सुट्टीवर असाल..वा झोपाळ्यावर झुलतायं वा एकाच ठिकाणी शांत बसलेले असाल वा कोणाबरोबर तरी बोलत उभे असाल..कुठेतरी कोणाचे काही ऐकत असाल.मिटिंगमध्ये असाल वा घरात काही काम करत असाल वा हाॅटेलात जेवण करत असाल वा एकदा पिक्चर बघत असाल.तुमची भौगोलिक परिस्थिती काय आहे वा सभोवतालची वर्तमान स्थिती कशी आहे.तुमची शारीरिक वा बौद्धिक अवस्था काय आहे..तुमच्या बरोबर कोण आहे.. ह्याला काहीच अर्थ नसतो.कारण एकदा का तुम्हांस विचार यायला सुरुवात झाली  कि लगोलग तुमचे मन त्यानुसारच काम करणार...

ह्यात काहीच दुमत नाहीच...दुसऱ्या कोणालाही विचारा. कारण तुम्ही त्यावेळेस विचार करतायं.त्यामुळेच तुम्हाला ते समजत नाही वा दिसत  नाही.पण तुम्ही करत असलेल्या हालचाली दुसराच कोणीतरी दुरून पाहत असतो.तो तुम्हांस बघत असतो.तो तुमच्या जवळ येतो आणि तोच तुम्हांस म्हणतो कसा  " अरे कसला विचार  करतोस? आज काय झालंय. तुझे चित्त काही स्थिर दिसत नाही? तू कसल्या तरी विचारात आहे.एवढे काय झालंय? असे एक ना अनेक प्रश्नांचा भडिमार तुम्हालाच करावा लागतो..बरोबर कि नाही ? अहो बोला..बोला.....अरे हे मी काय तुम्हांस विचारतोय...मी हे तर विसरून  गेलो कि तुम्ही  माझा लेख वाचताय..साॅरी ...साॅरी...मला माफ करा..क्षमस्व...

तर आज आपण कशावर बोलतोय.????... हो ..आठवलं...पण ह्याच्या अगोदरची स्थिती वेगळीच असते.
तो तुम्हांस जोरजोरात आवाजसुदधा  देतो पण तुम्हांस ते ऐकूच येत नाही वा तुम्ही त्याकडे दुर्लक्ष करतात कारण तुम्ही तुमच्याच विचारांत गर्क झालेले असतात. तुम्हांस काहीच  समजत नाही. तो तुमच्या जवळ येतो व जोरात हलवतो तेव्हाच तुम्ही भानावर येतात. हे कसे काय घडते? ह्याचा कधी विचार केलाय ?  अरे थोड तुम्ही  थांबा. तुम्ही कसला विचार करतायं.ते काम माझ्यावर सोपवा. मी तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे देतो..पण आज नको...कारण जे काही आतापर्यंत मी लिखाण केले आहे. ते तुम्हांस कसे वाटले...त्यावर तुम्ही तुमचे मत प्रकट करा व मला जरूर  कळवा. बाय. बाय...टाटा ... चला तर ....मग आपण उदधा भेटू या.....

आपला मित्र..

लेखन कौशल्य-उदय माळगांवकर .
##########################

रविवार दिनांक २० फेब्रुवारी २०२२

प्रकरण ३ --विचारांचे आपल्या आयुष्यात महत्त्व काय??

नमस्कार मित्र हो , सुप्रभात !!!!!

तर आज आपण विचारांचे आपल्या आयुष्यात  महत्व  आहे.?...ह्याबददल जरा समजून घेऊ या.

विचार माणसाच्या जीवनात फार महत्त्वाचे असतात. निसर्गाने माणसाला विचारशक्ती अगदी मुक्त हस्ताने बहाल केली आहे. इतर कोणत्याही प्राण्याकडे विचार करण्याची अथवा विचारांची देवाण-घेवाण करण्याची शक्ती नाही. विचारांचा माणसाच्या जीवनावर प्रभाव पडत असतो. कारण विचार हे सतत मनात स्फुरत असतात. मानसशास्त्रानुसार माणूस दिवसभरात अंदाजे हजार दा  विचार करत असतो. या विचारांपैकी काही विचार तुम्ही जाणिवपूर्वक करता तर काही विचार तुमच्या विचारसरणीनुसार, संस्कारानुसार तुमच्या मनात स्फुरत असतात. काही विचार हे लहानपणापासून तुमच्यावर झालेले संस्कार, संगत आणि शिक्षण यानुसार तुमच्या मनात निर्माण होत असतात.

 मात्र तुम्ही चांगले अथवा वाईट कोणतेही विचार केले तरी त्या विचारांचा तुमच्या जीवनावर परिणाम हा होतच असतो. जर तुम्ही चांगले विचार केले तर जीवनात चांगले घडते आणि चुकीचे विचार केले तर त्याप्रमाणेच जीवन घडत असतो.म्हणूनच तर माणसाने विचार करताना सतत सावध राहणे देखील फार गरजेचे आहे. वाईट, नकारात्मक विचार जीवनाला चुकीची कलाटणी देतात तर सकारात्मक विचार (POSITIVE  THOUGHT) हे माणसाला जीवनात यशाच्या शिखरावर नेतात. तसेच (NEGATIVE THOUGHT) हे नैराश्य आयुष्यात  लोटून  देतात. थोडक्यात काय माणूस विचारांच्या  सामर्थ्यावर  घडत असतो वा बिघडत असतो.असे म्हटल्यास वावगं ठरणार नाही.हे सामर्थ्य  इतके महत्त्वाचे असते कि एका शुल्लक गोष्टींमुळेच त्याचे पूर्ण  आयुष्य बदलून जाते.

उदाहरणार्थ एक सत्य प्रसंग वा माझ्या बाबतीत घडलेली घटना मी येथे  सांगतो, जेणेकरून तुम्हांस त्याची अनुभूती येईल. सकारात्मक विचारानं मी कसा घडलो.माझे आयुष्य  कसे बदलून गेले.ते मी पुढील  भागात सांगत आहे....

ही गोष्ट वा संदर्भ मी आपणांस सांगत आहे .ही गोष्ट  मागील अडतीस वर्षापूर्वीची आहे. साधारण  १९८४-८५ सालची ...मी तेव्हा माझे शालेय शिक्षण पूर्ण करून नुकताच बाह्य दुनियेत प्रवेश करत होतो.ती मायावी दुनिया  म्हणजेच आमची मुंबई...ती कशी आहे व तिला मायावी दुनिया का म्हणतात.  स्वप्न  ऊराशी बाळगून तिथे राहणारे लोक  वा ज्यांचा हा ना त्या कारणांनी प्रत्यक्ष संबंध आला असेल तेच तुम्हांस सांगू शकतात. मुंबईत राहत असताना काय फायदे झाले वा काय नुकसान..थोडं थांबा....तुम्ही काय म्हणतायं..... मुंबई आणि नुकसान? असे होउच शकणार नाही.तुमचे काहीतरी चुकतंय....अहो मी पक्का मुंबईकर आहे...मुंबई म्हणजेच  माझा जीव वा प्राण किंवा माझे अस्तित्व आहे. तर असो ...तो विषय थोडा बाजूला ठेवू या...

तर मी असाच एकदा माझ्या मित्राच्या घरी काॅटन ग्रीन ( मुंबईतील एक उपनगर) ला काही कारणास्तव  गेलो होतो. तो माझा जिवलग मित्र  होता.  मी माझे काम आटपून घरी जात होतो. वाटेतच मला फार लोकांची गर्दी दिसली. मग आठवू लागलो कि आज काय आहे.? कोणता सण वा सार्वजनिक संभारंभ वा छुटटी  वगैरे  आहे का ? का कोणीतरी  स्वर्गवासी झालंय का ? असे एक ना अनेक प्रश्न माझ्या मनात उपस्थित झाले. मी बैचेन झालो.माझे मन काहीच केल्या मला शांत बसू देत नव्हतं. कारण तो माझा स्वभाव ( स्वंयःप्रेरणेतून चौकशी  करणे ) आहे..लहानपणापासूनच  मी चौकस बुद्धीचा असल्यामुळेच थोडं धाडस करून रस्त्यावरून  चालणा-या एका अनोळखी माणसाला  रस्तातच थांबवून मृदू आवाजात विचारले कि साहेब हे काय आहे.ऐवढी गर्दी का आहे ? पहिल्यापासूनच  माझ्यावर माझ्या आजीचे संस्कार आहेत तेव्हा  कोणीही माणूस असो मग तो लहान असो वा मोठा,त्यास साहेब म्हणूनच आदराने हाक मारणे.त्याच्याशी आदराने बोलणे. हा माझा जन्मसिद्ध हक्कच आहे.तसे आमचे संस्कार आहेत. 

मला त्याच्याशी बोलल्यावर असे समजले कि ह्या ठिकाणी सद्गुरू वामनराव पै साहेबाचे प्रवचन चालू  होते.मग काय  मी तडक आतमध्ये ज्ञान मंदिरात घुसलोच व खुर्चीत जावून बसलो...मला फार उशीर झाला होता..मी समोर बघताच तिथे प्रत्यक्षात सद्गुरु वामनराव पै साहेब एक विचार सांगत होते.....# तूच  आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार!!!!!!माझ्या  कानावर  ते शब्द पडले आणि मी त्या विचारांत रंगून गेलो.मला काहीच भान नव्हते...मी त्यांच्या विचारांशी एकरूप होऊन प्रवचन ऐकण्यात तल्लीन झालो होतो..एवढ्यात एक मोठा गजर झाला व मी भानावर आलो..सर्वजण  जीवन विद्येची विश्व प्रार्थना बोलत होते..

"हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे , आरोग्य दे , 
सर्वांना सुखात , आनंदात , ऐश्वर्यात ठेव , 
सर्वांच भल कर , कल्याण कर , रक्षण कर , 
आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे ".

मी सुद्धा आपोआपच त्यांच्या सुरात सूर मिसळून गाऊ  लागलो.केव्हा वेळ निघून गेला ते मला समजेलच नाही.माझा उदय काळ सुरू झाला होता..मला साक्षात्कार झाला होता. माझी संगत एका थोर विचारवंत व विद्वान प्रवचनकाराशी होत होती.माझ्या बाल मनावर कायमची ही अक्षरे कोरली गेली.

# तूच  आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार!!!!!!...

 त्यानंतर मी मागे वळून केव्हाच पाहिले नाही..उराशी एक स्वप्न बाळगून  बाहेर पडलो.आज कित्येक  वर्षानंतर मागे वळून पाहता.मी पाहिलेली  
माझी सर्व स्वप्न पूर्ण केलीत. यशाची  अनेक शिखरे  मी  प्रत्यक्षात पादाक्रांत केली. अखेर मीच माझ्या जीवनाचा ख-या अर्थाने शिल्पकार झालो.मला जसं माझं  आयुष्य  हवे होते तसेच  ते मी पुर्ण केले.. तो एक सकारात्मक विचार माझ्या  मनात  आला आणि सर्वच जग बदलून गेले...माझा महामार्ग मी स्वतःच निवडला आणि तो पूर्णत्वास नेला...

म्हणूनच म्हणतो" विचारात  सामर्थ्य असते.हे माझे स्व अनुभव आहेत....

आता तूर्तास मी येथेच थांबवून पुढील लेख आपण  विचार  कसे व कश्यामुळे उत्पन्न  होतात.  काय  केल्यावर  आपणास  फायदा  होतो..हे  उद्याच्या लेखात पाहूया. तोपर्यंत आपण सर्वजण मजेत रहा.पण तत्पूर्वी आजचा लेख कसा वाटला. ते जरूर कळवा...आपले मत वा अभिप्राय हे लेखकास आरशा समान असतात. त्यात तो आपल्या लिखाणाचे  प्रतिबिंब पाहून योग्य त्या सुधारणा करू शकतो..तेव्हा आपले विचार वा मत प्रकट करा...

लेखन कौशल्य-उदय माळगांवकर ..

###########################

विशेष सूचना- हे संपूर्णत लिखाण मी माझ्या जीवनात घडलेल्या घटनांवर वा प्रसंगावर आधारित लिहित आहे.तेव्हा काही घटना वा प्रसंग ह्यात काही साम्य  आढळल्यास तो केवळ  एक दुर्मीळच वा दुर्लभ  असा योग समजावा .तसेच तुम्हांस तुमच्या  जीवनात आलेला अनुभव आणि माझ्या अनुभवाची तुलना करू नका. हि नम्र विनंती, लोभ असावा....धन्यवाद. ..

लेबल:

विषय- विचारांचे सामर्थ्य???

विषय- विचारांचे सामर्थ्य  ????
दिनांक-१८ फेब्रुवारी २०२२

विषय- विचारांचे सामर्थ्य  ????

नमस्कार मित्र हो,मला बहुतेक लोक नेहमीच विचारत असतात कि विचार हे  कसे असावेत? विचारांचे सामर्थ्य म्हणजेच  काय?. कोणते विचार कसे  येतात?  चांगले  व वाईट  विचार कसे ओळखावे ? त्यांची गरज का असते? विचार श्रेष्ठ व समृद्ध का  असावेत? असे एक ना अनेक प्रश्न वेळोवेळी आपल्या समोर उपस्थित होत असतात.मग त्यास आपण सामोरे कसे जातो. ह्या विचारांमुळे आपल्यात काय बदल होतात.तसेच चांगल्या वा वाईट विचारांमुळे आपणास काय फायदा वा तोटा होतो.ह्याचा आपण केव्हा विचार केला आहे का?
 
आणि आजवर जर विचार केला नसेल तर अजून वेळ गेलेली नाही. थोडे थांबा व तुम्हांस त्याची  इत्थंभूत माहीती उद्याच्या लेखात मिळेल.... आहे का तुमची तयारी.??? 

आपले विचार मात्र जरूर कळविण्यास विसरू नका.
########$$$$$$$$##########
शनिवार दिनांक-१९ फेब्रुवारी २०२२

नमस्कार मित्र हो , सुप्रभात !!!!!

तर आज आपण विचार  म्हणजेच काय?ह्याबददल जरा समजून घेऊ या.

शास्त्रीय सिद्धांत असे सांगतो कि  बुद्धीला किंवा मनाला काही नियमांनुसार 'चालविणे' म्हणजे विचार करणे. "पुर्वानुभवाच्या मदतीनेच व्यक्तिच्या मनातल्या मनात होणारी प्रक्रिया वा घालमेल म्हणजेच विचार होय". 
विचार प्रक्रिया;-(THINKING PROCESS) - विचार ही मानवी मनाची प्रक्रिया वा पद्धत आहे. डोळ्यासमोर नसलेल्या कोणत्याही गोष्टींबद्दल चालु असलेल्या मानसिक प्रक्रियेलाच  ( Thought  Process)  आपण विचार असे म्हणतो.

 हे विचार आपणांस दिसत नाही.पण एकदा का ह्या विचारांनी आपल्या मानवी मनाचा ताबा मिळवला कि लगेच त्यानुसारच आपण सर्वजण वागायला सुरुवात करतो.तुसभर ही जागा सोडत नाहीत.उलट एकदा का तुम्ही विचार करायला लागला  कि क्षणार्धात आपली हालचाल बदलते.चेहऱ्यावर वेगळे हावभाव उमटायला सुरुवात होते ,राग रूसवा, फुगवा येतो वा आनंद,हर्ष येतो. आपण नाचतो काय, गातो काय ..मी तर बाबा गुणगुणत असतो.लहानपणापासूनच मला ती सवय आहे. त्यात आजवर काहीच फरक झाला .मी असाच आहे आणि असाच राहाणार..कारण ते माझ्या जिवंतपणाचे लक्षण आहे.हे माझ्या परिवाराला वा मित्रमंडळीना तुम्ही विचारू शकता. तर असो .आपण पुढे चालूया..

तर मी काय म्हणत होतो...हा..आलं लक्षात....न बोलणारा माणूस बोलायला लागतो...आजूबाजूस काय चाललंय. ह्याच काही त्यास देणे घेणे नसते. पण हे सर्वकाही विचारांवर अवलंबून असते व आपण एका वेगळ्याच विचारांत रंगून जातो.आपल्या  शरीरात  बदल निर्माण व्हायला  लागतात.त्यानंतर आपण सर्वजण त्यानुसारच वागायला लागतो ..विचारांचे प्रतिसाद उमटायला  लागतात..विचार विचार म्हणजेच काय??? त्यात दोनच  प्रमुख प्रकार आहेत. हे आपण लक्षात घेतलं पाहिजेत...त्यातला एक म्हणजे सकारात्मक विचार ( POSITIVE THOUGHT)  आणिक दुसरा नकारात्मक  विचार( NEGATIVE THOUGHT). त्याचे कार्य कसे चालते वा त्यास असे का म्हटले जाते....वगैरे वगैरे....प्रश्न अनेक...
ह्यावर आपण नंतर बोलूयात.कारण विषय फार कठीण व गहन आहे..तर असो ...

तर आज आपण कशावर बोलतोय.????... हा ..आठवलं...अरे हो , बोलता बोलता मी सुद्धा  विचारात पडलोय....तर आपणांस  विचार  कसे व का पडतात व हे कोठून येतात व केव्हा येतात...ह्याचा केव्हा तुम्ही  विचार  केलायं ...
मग  तुम्ही कुठेही असा,जसे घरात वा दारात  वा रस्तावर चालतायं  वा बोलतायं ...कामावर असा  या सुट्टीवर असाल..वा झोपाळ्यावर झुलतायं वा एकाच ठिकाणी शांत बसलेले असाल वा कोणाबरोबर तरी बोलत उभे असाल..कुठेतरी कोणाचे काही ऐकत असाल.मिटिंगमध्ये असाल वा घरात काही काम करत असाल वा हाॅटेलात जेवण करत असाल वा एकदा पिक्चर बघत असाल.तुमची भौगोलिक परिस्थिती काय आहे वा सभोवतालची वर्तमान स्थिती कशी आहे.तुमची शारीरिक वा बौद्धिक अवस्था काय आहे..तुमच्या बरोबर कोण आहे.. ह्याला काहीच अर्थ नसतो.कारण एकदा का तुम्हांस विचार यायला सुरुवात झाली  कि लगोलग तुमचे मन त्यानुसारच काम करणार...

ह्यात काहीच दुमत नाहीच...दुसऱ्या कोणालाही विचारा. कारण तुम्ही त्यावेळेस विचार करतायं.त्यामुळेच तुम्हाला ते समजत नाही वा दिसत  नाही.पण तुम्ही करत असलेल्या हालचाली दुसराच कोणीतरी दुरून पाहत असतो.तो तुम्हांस बघत असतो.तो तुमच्या जवळ येतो आणि तोच तुम्हांस म्हणतो कसा  " अरे कसला विचार  करतोस? आज काय झालंय. तुझे चित्त काही स्थिर दिसत नाही? तू कसल्या तरी विचारात आहे.एवढे काय झालंय? असे एक ना अनेक प्रश्नांचा भडिमार तुम्हालाच करावा लागतो..बरोबर कि नाही ? अहो बोला..बोला.....अरे हे मी काय तुम्हांस विचारतोय...मी हे तर विसरून  गेलो कि तुम्ही  माझा लेख वाचताय..साॅरी ...साॅरी...मला माफ करा..क्षमस्व...

तर आज आपण कशावर बोलतोय.????... हो ..आठवलं...पण ह्याच्या अगोदरची स्थिती वेगळीच असते.
तो तुम्हांस जोरजोरात आवाजसुदधा  देतो पण तुम्हांस ते ऐकूच येत नाही वा तुम्ही त्याकडे दुर्लक्ष करतात कारण तुम्ही तुमच्याच विचारांत गर्क झालेले असतात. तुम्हांस काहीच  समजत नाही. तो तुमच्या जवळ येतो व जोरात हलवतो तेव्हाच तुम्ही भानावर येतात. हे कसे काय घडते? ह्याचा कधी विचार केलाय ?  अरे थोड तुम्ही  थांबा. तुम्ही कसला विचार करतायं.ते काम माझ्यावर सोपवा. मी तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे देतो..पण आज नको...कारण जे काही आतापर्यंत मी लिखाण केले आहे. ते तुम्हांस कसे वाटले...त्यावर तुम्ही तुमचे मत प्रकट करा व मला जरूर  कळवा. बाय. बाय...टाटा ... चला तर ....मग आपण उदधा भेटू या.....

आपला मित्र..

लेखन कौशल्य-उदय माळगांवकर .
#######$$$$$$#$############

दिनांक- २० फेब्रुवारी २०२२

नमस्कार मित्र हो , सुप्रभात !!!!!

तर आज आपण विचारांचे सामर्थ्य म्हणजेच का
?सकारात्मक विचार आणि नकारात्मक  विचार  काय? आपल्या आयुष्यात त्याला ऐवढे काय  महत्व  आहे.?...ह्याबददल जरा समजून घेऊ या.

विचार माणसाच्या जीवनात फार महत्त्वाचे असतात. निसर्गाने माणसाला विचारशक्ती अगदी मुक्त हस्ताने बहाल केली आहे. इतर कोणत्याही प्राण्याकडे विचार करण्याची अथवा विचारांची देवाण-घेवाण करण्याची शक्ती नाही. विचारांचा माणसाच्या जीवनावर प्रभाव पडत असतो. कारण विचार हे सतत मनात स्फुरत असतात. मानसशास्त्रानुसार माणूस दिवसभरात अंदाजे हजार दा  विचार करत असतो. या विचारांपैकी काही विचार तुम्ही जाणिवपूर्वक करता तर काही विचार तुमच्या विचारसरणीनुसार, संस्कारानुसार तुमच्या मनात स्फुरत असतात. काही विचार हे लहानपणापासून तुमच्यावर झालेले संस्कार, संगत आणि शिक्षण यानुसार तुमच्या मनात निर्माण होत असतात.

 मात्र तुम्ही चांगले अथवा वाईट कोणतेही विचार केले तरी त्या विचारांचा तुमच्या जीवनावर परिणाम हा होतच असतो. जर तुम्ही चांगले विचार केले तर जीवनात चांगले घडते आणि चुकीचे विचार केले तर त्याप्रमाणेच जीवन घडत असतो.म्हणूनच तर माणसाने विचार करताना सतत सावध राहणे देखील फार गरजेचे आहे. वाईट, नकारात्मक विचार जीवनाला चुकीची कलाटणी देतात तर सकारात्मक विचार (POSITIVE  THOUGHT) हे माणसाला जीवनात यशाच्या शिखरावर नेतात. तसेच (NEGATIVE THOUGHT) हे नैराश्य आयुष्यात  लोटून  देतात. थोडक्यात काय माणूस विचारांच्या  सामर्थ्यावर  घडत असतो वा बिघडत असतो.असे म्हटल्यास वावगं ठरणार नाही.हे सामर्थ्य  इतके महत्त्वाचे असते कि एका शुल्लक गोष्टींमुळेच त्याचे पूर्ण  आयुष्य बदलून जाते.

उदाहरणार्थ एक सत्य प्रसंग वा माझ्या बाबतीत घडलेली घटना मी येथे  सांगतो, जेणेकरून तुम्हांस त्याची अनुभूती येईल. सकारात्मक विचारानं मी कसा घडलो.माझे आयुष्य  कसे बदलून गेले.ते मी पुढील  भागात सांगत आहे....

ही गोष्ट वा संदर्भ मी आपणांस सांगत आहे .ही गोष्ट  मागील अडतीस वर्षापूर्वीची आहे. साधारण  १९८४-८५ सालची ...मी तेव्हा माझे शालेय शिक्षण पूर्ण करून नुकताच बाह्य दुनियेत प्रवेश करत होतो.ती मायावी दुनिया  म्हणजेच आमची मुंबई...ती कशी आहे व तिला मायावी दुनिया का म्हणतात.  स्वप्न  ऊराशी बाळगून तिथे राहणारे लोक  वा ज्यांचा हा ना त्या कारणांनी प्रत्यक्ष संबंध आला असेल तेच तुम्हांस सांगू शकतात. मुंबईत राहत असताना काय फायदे झाले वा काय नुकसान..थोडं थांबा....तुम्ही काय म्हणतायं..... मुंबई आणि नुकसान? असे होउच शकणार नाही.तुमचे काहीतरी चुकतंय....अहो मी पक्का मुंबईकर आहे...मुंबई म्हणजेच  माझा जीव वा प्राण किंवा माझे अस्तित्व आहे. तर असो ...तो विषय थोडा बाजूला ठेवू या...

तर मी असाच एकदा माझ्या मित्राच्या घरी काॅटन ग्रीन ( मुंबईतील एक उपनगर) ला काही कारणास्तव  गेलो होतो. तो माझा जिवलग मित्र  होता.  मी माझे काम आटपून घरी जात होतो. वाटेतच मला फार लोकांची गर्दी दिसली. मग आठवू लागलो कि आज काय आहे.? कोणता सण वा सार्वजनिक संभारंभ वा छुटटी  वगैरे  आहे का ? का कोणीतरी  स्वर्गवासी झालंय का ? असे एक ना अनेक प्रश्न माझ्या मनात उपस्थित झाले. मी बैचेन झालो.माझे मन काहीच केल्या मला शांत बसू देत नव्हतं. कारण तो माझा स्वभाव ( स्वंयःप्रेरणेतून चौकशी  करणे ) आहे..लहानपणापासूनच  मी चौकस बुद्धीचा असल्यामुळेच थोडं धाडस करून रस्त्यावरून  चालणा-या एका अनोळखी माणसाला  रस्तातच थांबवून मृदू आवाजात विचारले कि साहेब हे काय आहे.ऐवढी गर्दी का आहे ? पहिल्यापासूनच  माझ्यावर माझ्या आजीचे संस्कार आहेत तेव्हा  कोणीही माणूस असो मग तो लहान असो वा मोठा,त्यास साहेब म्हणूनच आदराने हाक मारणे.त्याच्याशी आदराने बोलणे. हा माझा जन्मसिद्ध हक्कच आहे.तसे आमचे संस्कार आहेत. 

मला त्याच्याशी बोलल्यावर असे समजले कि ह्या ठिकाणी सद्गुरू वामनराव पै साहेबाचे प्रवचन चालू  होते.मग काय  मी तडक आतमध्ये ज्ञान मंदिरात घुसलोच व खुर्चीत जावून बसलो...मला फार उशीर झाला होता..मी समोर बघताच तिथे प्रत्यक्षात सद्गुरु वामनराव पै साहेब एक विचार सांगत होते.....# तूच  आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार!!!!!!माझ्या  कानावर  ते शब्द पडले आणि मी त्या विचारांत रंगून गेलो.मला काहीच भान नव्हते...मी त्यांच्या विचारांशी एकरूप होऊन प्रवचन ऐकण्यात तल्लीन झालो होतो..एवढ्यात एक मोठा गजर झाला व मी भानावर आलो..सर्वजण  जीवन विद्येची विश्व प्रार्थना बोलत होते..

"हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे , आरोग्य दे , 
सर्वांना सुखात , आनंदात , ऐश्वर्यात ठेव , 
सर्वांच भल कर , कल्याण कर , रक्षण कर , 
आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे ".

मी सुद्धा आपोआपच त्यांच्या सुरात सूर मिसळून गाऊ  लागलो.केव्हा वेळ निघून गेला ते मला समजेलच नाही.माझा उदय काळ सुरू झाला होता..मला साक्षात्कार झाला होता. माझी संगत एका थोर विचारवंत व विद्वान प्रवचनकाराशी होत होती.माझ्या बाल मनावर कायमची ही अक्षरे कोरली गेली.

# तूच  आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार!!!!!!...

 त्यानंतर मी मागे वळून केव्हाच पाहिले नाही..उराशी एक स्वप्न बाळगून  बाहेर पडलो.आज कित्येक  वर्षानंतर मागे वळून पाहता.मी पाहिलेली  
माझी सर्व स्वप्न पूर्ण केलीत. यशाची  अनेक शिखरे  मी  प्रत्यक्षात पादाक्रांत केली. अखेर मीच माझ्या जीवनाचा ख-या अर्थाने शिल्पकार झालो.मला जसं माझं  आयुष्य  हवे होते तसेच  ते मी पुर्ण केले.. तो एक सकारात्मक विचार माझ्या  मनात  आला आणि सर्वच जग बदलून गेले...माझा महामार्ग मी स्वतःच निवडला आणि तो पूर्णत्वास नेला...

म्हणूनच म्हणतो" विचारात  सामर्थ्य असते.हे माझे स्व अनुभव आहेत....

आता तूर्तास मी येथेच थांबवून पुढील लेख आपण  विचार  कसे व कश्यामुळे उत्पन्न  होतात.  काय  केल्यावर  आपणास  फायदा  होतो..हे  उद्याच्या लेखात पाहूया. तोपर्यंत आपण सर्वजण मजेत रहा.पण तत्पूर्वी आजचा लेख कसा वाटला. ते जरूर कळवा...आपले मत वा अभिप्राय हे लेखकास आरशा समान असतात. त्यात तो आपल्या लिखाणाचे  प्रतिबिंब पाहून योग्य त्या सुधारणा करू शकतो..तेव्हा आपले विचार वा मत प्रकट करा...

लेखन कौशल्य-उदय माळगांवकर ..

विशेष सूचना- हे संपूर्णत लिखाण मी माझ्या जीवनात घडलेल्या घटनांवर वा प्रसंगावर आधारित लिहित आहे.तेव्हा काही घटना वा प्रसंग ह्यात काही साम्य  आढळल्यास तो केवळ  एक दुर्मीळच वा दुर्लभ  असा योग समजावा .तसेच तुम्हांस तुमच्या  जीवनात आलेला अनुभव आणि माझ्या अनुभवाची तुलना करू नका. हि नम्र विनंती, लोभ असावा....धन्यवाद. ..

लेबल:

बुधवार, १६ फेब्रुवारी, २०२२

आजचा विचार- ज्ञान..मान..आणि दान ह्या तीन गोष्टीं सतत देत रहा...

आजचा विचार- ज्ञान..मान..आणि दान ह्या तीन गोष्टीं सतत देत रहा...

#  जीवनात तीन गोष्टीं सतत देत राहील्या पाहिजेत. 

१> ज्ञान 
२> मान 
३> दान 

मग बघा..तुम्हीच  म्हणाल, जीवन फार सुंदर आहे...

ज्याला जीवनाचा खरा दृष्टिकोन समजला आहे.तयास काहीच कमी नाही.तो आपले जीवन आनंदमय करत असतो.पण इतरांना ते लवकर अंगवळणीच पडत नाही..त्याच्या दृष्टिकोनात तो फारच  सामान्य माणूस म्हणून दिसतो.पण एकदा का त्याचे विचार ,वाणी तसेच आचार समजायला लागले की तो इतरांसमोर आदर्श ठरतो. लोक तयाचे अनुकरण करायला लागतात..ते  त्यास गुरू समान मानतात व  जेव्हा केव्हा भेटतात तेव्हा त्याला दोन्ही हाताने नमस्कार करतात. हिच तर खरी त्याची ताकद आहे.

म्हणूनच असा सिद्धांत सांगितला  जातो " प्रथम  आपण ज्ञान मिळवा व  समजल्यावर इतरांना द्या  जेणेकरुन आपला मान वाढतो आणि एकदा का त्याचीच आपणास सवय झाली कि आपण आपलाच आदर सत्कार करायला सुरुवात करतो.मग आपोआप  पुढील वाटचाल होत जातात व आपण दान करायला लागतो .

म्हणूनच म्हणतात नेहेमीच नविनगोष्ट गोष्टी शिकत राहिलो पाहिजेत. तयाचा आग्रह धरला पाहिजे. जेणेकरून ज्ञान कायमच आपणास मिळेल आणि आपोआपच पुढील घटना घडत जातात व आपण वेगळ्याच विश्वात रममाण होऊन जातो...

सरते शेवटी तीन गोष्टींवर लक्ष केंद्रित करा....ज्ञान...मान..आणि ...दान...केव्हाच तुम्ही दुःखी वा निराश होणार नाही...आपले जीवन सुखकर होईल ..

लेखन कौशल्य-उदय माळगांवकर

लेबल:

मंगळवार, १५ फेब्रुवारी, २०२२

जीवनाला खरा अर्थ कसा प्राप्त होतो??

मला मनापासून असं वाटतं की 
“तुमच्या जीवनाला तुम्ही ज्याप्रकारे घडवण्याचा प्रयत्न करता तो तुमच्या जीवनाचा अर्थ बनतो.”

आता मित्र हो,हे मी का व कशाचया आधारावर बोलत असेल तर गेल्या तीस पस्तीस वर्षांत जे मी काही शिकलो वा अनुभवले त्याच्या आधारावरच हे मी बोलत आहे. ह्या विचाराचे  स्वातंत्र्य सर्वानाच आहे. हे चिंतन सार्वजनिक आहे.पण त्यातून प्रत्येकांनी जो मार्ग अवलंबून त्याच्याबद्दल आत्मविश्वास बाळगला.त्याचे जीवन सार्थक झाले. असे मी म्हणेन वा त्यापुढे मी असे ही सांगणार आहे कि त्यांनी स्वतः बरोबर दुसऱ्याचे सुदधा कल्याण केले......

ह्या  विचारांवर काम करताना मला मात्र  एका गोष्टीचा साक्षात्कार झालाय तो म्हणजेच  जिथं आपण काम करतो ती कंपनी नव्हे तर ती एक संस्था आहे.ह्या संस्थेत आपण आपल्या बरोबर आपल्या समाजाचे ऋण फेडण्यासाठी कार्यरत झालो पाहिजेत.तरच  आपल्या संस्थेचा विकास व आपला उद्धार होईल....हे तितकेच सत्य आहे..

ज्या विचारांनी मी प्रेरित झालो व ज्या संस्काराने मी माझ्या जीवनात आनंद निर्माण करीत आलो.ते विचार वा चिंतन आपल्या समोर घेऊन आलो आहे.आपण ते एकवार अवश्य वाचावे आणि त्यामधून मिळेल त्या अनुभूतीत जीवनात पुढील वाटचाल करावीत..असे मला वाटते...

ह्या विचारांवर कोणाचीच मक्तेदारी नाही... हे विचार  सर्वानाच  खुले आहेत. हे विचार कोणी लिहिले ?  व का लिहिले ? आणि कशासाठी  लिहिले?????? हे मला माहीत नाही.पण एवढं बाकी म्हणेन कि ......

आम्ही बि-घडलो तुम्ही ही बिघडांना ||ध्रु||
सद्गुरुच्या संगे शिष्य बिघडला
शिष्य बिघडला सद्गुरुची झाला ||१||
परिसाच्या संगे लोह बिघडले
लोह बिघडले सुवर्णची झाले ||२||

लेखन कौशल्य-उदय माळगांवकर.

लेबल:

सोमवार, १४ फेब्रुवारी, २०२२

जो भी होता है।वह अच्छे के लिए

आज का मंत्र # जो भी होता है।वह अच्छे के लिए .....

जो भी होता है।वह अच्छे के लिए....अब यह अच्छा क्या है और बुरा  क्या है। कभी आपने सोचा समझा  है। तो जरा दोन मिनिट रुको और सोचो ।

जब कोई भी  कार्य  करने से अपनो के आनंद मिले तो अच्छा.....और  यदि दु:ख मिले तो बुरा .... पर दोस्तों , आप  जरा सोचिए .......यदि आप को दु:ख मिल रहा तब दुसरों को तो आनंद मिल रहा  होता है।  और  जब आप आनंद  महसूस करते हो तो वह दुःखी होता है।यह तो प्राकृतिक का नियम है।  और  उसे सदियो पहले १६८७ में संकलित किया गया है।

एक महान ब्रिटिश  भौतिक व गणितज्ञ वैज्ञानिक थे। उनका नाम सर आय जॅक न्यूटन। उन्होंने दुनिया को एक नयी राह दिखाई। गति के नियम बताए ।उनका  
तिसरा नियम यह है कि कोई  भी कार्य  करते हो तो उसके  बराबर तथा उसके विपरीत  दिशा में  प्रतिक्रिया होती है। तो हम  सिर्फ यह याद रखेंगे कि 
" क्रिया  - प्रतिक्रिया " यह नियम  वर्तमान स्थिती मेें भी चल रहा है।
तो उसमें आप को परेशान होने कि जरुरत नही।
कार्य करते रहो प्रतिक्रिया अपने आप खुद का रास्ता ढुढती हुई आपके पीछे पीछे आएगी। 

तो आखिर में हम सिर्फ यह  याद रखेंगे .....जो भी होता है।वह अच्छे के लिए .....होता है ।

लेखन कौशल्य-उदय माळगांवकर

लेबल:

शनिवार, १२ फेब्रुवारी, २०२२

माणसे ओळखायला शिका.....

माणसं ओळखायला नाही.....

माणसं ओळखायला नाही, तर तयाचा वर्तमान चेहरा वाचायला शिका असे मी म्हणेन कारण ..
मी माणसं ओळखायला शिकलो’ असं वाक्य अनेकजण वापरतात. परंतु माणसं ओळखायला नाही तर माणसं समजून घ्यायला शिकायला हवं. माणसांचा स्वभाव ओठात एक आणि पोटात एक असा असतो. तसंच काही माणसे ही फार हळवी असतात. त्यांच्या मनात एक असंत आणि वागण्यात मात्र वेगळंच. मनातून दुःखी असलेली व्यक्ती आपलं दुःख कोणाला कळू नेय म्हणून ते मनातच दाबून ठेवण्याचा प्रयत्न करतात.

आता माणसे वाचणे म्हणजेच काय तर परिस्थिती सारखी बदलत असते.थोड्याच वेळापूर्वीच तुमचा सहकारी तुमच्या समोरून काहीच न बोलता निघून गेला व पुढच्याच पाच मिनिटांत तुमच्याशी भांडण करून हुज्जत घालू लागला.आता तूम्ही त्यास काय म्हणाल.?  तुम्ही जर त्याला त्यावेळेस  प्रतिउत्तर देण्याचा प्रयत्न केला तर शब्दाला शब्द वाढत जावून ते भांडण विकोपास जाते.हा माझा आजपर्यंतचा अनुभव आहे.

काही व्यक्ती साध्या साध्या गोष्टींवरसुद्धा चिडतात, रागावतात. अशा व्यक्तींच्या वागण्यावर जाऊ नका, तर त्या व्यक्तीला समजून घ्या. कारण ती व्यक्ती मनातून फार एकटी आणि अस्वस्थ असू शकते. त्या व्यक्तीला कशाचा  तरी आधार  हवा असतो, पण तोच  तिला कोणाकडूनही मिळालेलं नसतं. त्या व्यक्तीच्या अशा वागण्यामुळे तिला चुकीचं जज करू नका, तर त्यामागची अवस्था समजून घ्या.

तुम्ही त्यास कितीही समजवण्याचा  प्रयत्न केला तर तो ऐकण्याच्या मनस्थितीत नसतो.तो तुम्हांस त्याचा विरोधक असल्याचा आभास निर्माण करून मनात  क्रोध बाळगून वागत असतो. तुम्ही जर काळजीपूर्वक निरखून त्याच्या चेहर्‍यावर पाहिले तर एक वेगळीच प्रतिमा तुम्हांस दिसत असते.त्याला कशाची तरी चिंता वा भिती वाटत असते.काहीतरी झालेय .असे तुम्हांस वाटेल.माणूस जसा दिसतो तसा तो नसतो, प्रत्येक जण मनाचं खरं प्रतिबिंब चेहऱ्यावर उमटू न देता खोटा मुखवटा धारण तुम्ही या क्षणी वावरत असतो. म्हणून माणसं ओळखण्या पेक्षा त्यांचा वर्तमान चेहर्‍यावर हावभाव  समजून घेण आवश्यक असतं.

तो व्यक्ती आतून फारच घाबरलेला असतो.अजून तुम्ही त्याच्या जवळ गेला तर त्याचे शरीर थरथरत  असते.पण तो तुम्हांस  दाखवत नाही.उलट जोर जोरात बोलत असतो.तुम्हीपण त्यास प्रतिसाद दिला तर सर्वच संपले.त्यातून काहीच निष्पन्न होणार नाही.उलट तुम्ही शांत राहुन त्याचे म्हणण ऐकले तर उलट दोघांनाही फायदाच होईल. कारण  पाच दहा मिनिटांत त्याचा राग ओसरून जाईल. पण त्यासाठीच तुम्हालाच थोडे दूर जावे लागेल. तुम्ही शांत राहिल्यात म्हणून शूद्र वा लहान होत नाही वा तुम्ही कमजोर आहात असा अर्थ निघत नाही.उलट तुम्ही त्याचा मान सन्मान ठेवून त्या दुषित वातावरणातून बाहेर निघून जाण्याचा प्रयत्न करत असतात. त्यामुळेच तुम्ही श्रेष्ठ ठरतात. 

असे  आकस्मित संकट आले तर घाबरून जाऊ नका उलट त्यातून चांगले कसे  निर्माण होईल ते बघा.त्यास राग आला म्हणून तुम्हांस काहीच नुकसान होणार नाही कारण त्याचा राग हा क्षणभंगुर होता.तो शांत झाल्यावर त्याला त्याची चूक समजून येणार आणि त्यालाच त्याची लाज वाटेल. कारण तुम्ही त्याला काहीच न बोलता समजून घेतलेले असता.हा सर्वस्वी तुमचा निर्णय होता.आजूबाजूस घडणाऱ्या कोणत्याही गोष्टीचा तुमच्यावर परिणाम तुम्ही होऊ दिला नव्हता.हा तुमच्या मनाचा मोठेपणा होता.तुम्ही  त्यास माफ केले.

ह्या ठिकाणी मी ऐवढंच  म्हणेन कि कोणावर कशी वेळ येईल. हे कोणालाही माहीत नाही.परिस्थिती सारखीच  बदलत असते.तेव्हा अहंकार करू नका. आपण कोणासाठी कधीपर्यत असणार  हे ब्रम्हदेवाला सुद्धा  माहित नाही.तेव्हा आपण माणसं नाती जोडा.आपण जो पर्यंत आहोत तोपर्यंत आपल्या माणसांसाठी असणार, अशाप्रकारे जगण्यात कमी पडू नका.दुसऱ्याचा तिरस्कार वा अनादर करू नका.जे पेरलं तेच उगवणार..

तेव्हा चांगल्या माणसांचा कदर  करा त्याचा आदर करा..जे चांगल तेच तुम्ही ओळखून त्यानुसार वागणे हेच सारे खरे आहे. फायदा आणि नुकसान ह्या दोन्ही गोष्टी फारच लांबच्या आहेत.कारण एकाच  वेळेस ह्याचा प्रत्यय तुम्हांस मिळणार नाही. एका वेळेस एकच ध्येय साध्य होणार. एकतर फायदा नाहीतर नुकसान..आता फायदा कोणाचा आणि नुकसान कोणाचे ??? हा तर यक्षप्रश्न आहे. कारण भांडण चालू होण्या आधी ते दोघंजण गुण्यागोविंदाने वागत होते.आणि एका शुल्लक गोष्टींमुळेच हे भांडण उरकून आले. तो काही वाईट नाही वा तुम्ही त्याचे कायमचे शत्रू  नाही. फक्त एक गैरसमज वा एक असुरी  ईच्छा शक्ती जी त्यास शांत बसू देत नाही.ऐवढंच म्हणूनच म्हणतो कि माणसं ओळखायला नाही, तर तयाचा वर्तमान चेहरा वाचायला शिका...

लेख कसा वाटला ते जरूर कळवा.

लेखन कौशल्य-उदय माळगांवकर

लेबल:

शुक्रवार, ११ फेब्रुवारी, २०२२

तू सुखकर्ता....तू दुःखहर्ता...

तू सुखकर्ता ...तू दुःखहर्ता ..                             गेल्याच आठवडय़ात आमच्या घरी गणेश जयंतीनिमित्त माघी गणपती आला होता. आम्ही सर्वानीच हा गणेश जयंती उत्सव मोठ्या दिमाखात व थाटामाटात साजरा केला.दोन दिवस आम्ही सर्वजण एका वेगळ्याच विश्वात रममाण होऊन आनंदाने नाचत बागडत होतो.तसेच 
एका वेगळ्याच धुंदीत सगळीकडेच वावरत होतो.

 कित्येक दिवसानंतर आम्ही सर्व नातेवाईक व मित्र मंडळी ( जवळचे आणि दुरचे )ऐकमेकांस भेटून आप आपल्या सुख दुःखाच्या गप्पा गोष्टींत रंगून गेलो होतो.आपले राग रुसवे पार विसरून गेलो होतो.प्रत्येक जण  आपआपली कला कौशल्य दाखवत होती.जसे कोणी स्वयंपाक करण्यास पुढे पुढे करीत होती तर कोणी बाजारात जाऊन भाजी पाला आणण्यास धावत होती तर कोणी गणपतीची मूर्ती पाटावर बसवण्यात मश्गुल होती.तर काहीजण मूर्तीचे डेकोरेशन करण्यात मागेपुढे पहात नव्हती.जिकडे तिकडे प्रत्येक जण काम करण्यास उत्सुक होता.

कसलीच आदळआपट वा कोणाची किरकिर  नव्हती. कोणीच कामात टाईमपास करत नव्हता. प्रत्येकाच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद व हास्य निर्माण झाले होते..जणूकाही अशी काही स्पर्धा होती.. "जिकडे कमी तिकडे आम्ही " सर्वत्र गणरायाचा जयघोष चालू होता.वातावरणांत सुगंध व सुगम संगीत दरवळत होता. कोणीही मदत करण्यास तत्पर होता.....कोण घरमालक आणि कोण पाव्हणे  काहीच समजत नव्हतं.आमचा गणपती आता सार्वजनिक झाला होता.

प्रत्येकास वाटत होते कि आमच्या घरचा गणपती आहे व त्याप्रमाणेच वावरत होता. सकाळ संध्याकाळ आरती सुरू आणि रात्री जेवणाची तर   फारच मज्जाच आली. पोट तृप्त होऊन भजनास सज्ज  झालो.. . कारण कोणतेही वाद्य वा मृदुंग नसताना सुद्धा घरातील डब्यावर  ताल धरून गात होतो.महिलामंडळ तर फारच पुढे होते.एक गवळण संपली कि दुसरी चालू.मग काय गजराचा जयघोष पुरूष आणि महिला एका तालात गात होती..पण अधूनमधून दुधात हळद टाकून मस्त पैकी गरम गरम दुधाचा ग्लास फिरत होता.गणपतीची सेवा करण्यात प्रत्येकास आनंद घेत होता.जणू काही असे म्हणायचेय ...

" तू सुखकर्ता, तू दुःखहर्ता,
तूच कर्ता आणि करविता,
मोरया मोरया, मंगलमूर्ती मोरया।

ओंकारा तू, तू अधिनायक,
चिंतामणी तू, सिद्धीविनायक,
मंगलमूर्ती तू भवतारक,
सर्वसाक्षी तू अष्टविनायक,
तुझ्या कृपेचा हात मस्तकी,
पायी तव मम चिंता,

देवा सरू दे माझे मी पण,
तुझ्या दर्शने उजळो जीवन,
नित्य कळावे तुझेच चिंतन,
तुझ्या धुळीचे भाळी भूषण,
सदैव राहो ओठांवरती,
तुझीच रे गुणगाथा,

आम्ही सर्वजण एकाच घरात गुण्यागोविंदाने नांदत होतो.पण ही सुद्धा वेळ जाणार होती आणि झालं सुद्धा तसेच....लगेच दुसरा दिवस सुरू झाला व हा ना हा म्हणता...गणपती विसर्जनाची घटका जवळ आली.  सामानाची आवराआवर सुरू झाली आता आम्हांस गणपतीचा  निरोप घ्यावा लागणार. सुखानंतर दुःखाची झालर दिसत होती...कारण  गणपती संध्याकाळनंतर  आपल्या पुढील प्रवास निघणार...

झालं मग काय, पळापळ आणि धावपळ सुरू..गाडीत बसायला शर्यत सुरू..गणेश घाट केव्हा आला ते समजलचं नाही...आरती करून  देवास साकडे घातले कि सर्वाचे भल कर..सर्वानाच उत्तम आरोग्य व धनदौलत दे....मनातील ईच्छा पुर्ण कर....आणि शेवटी एकच मागणं....तू सुखकर्ता, तू दुःखहर्ता,
तूच कर्ता आणि करविता,
मोरया मोरया, मंगलमूर्ती मोरया।

लेखन कौशल्य-उदय माळगांवकर.

लेबल:

गुरुवार, १० फेब्रुवारी, २०२२

"कोंकण माझों गांव विसरून चालणार नाही त्येचा नांव "

"कोंकण माझों  गांव विसरून चालणार नाही त्येचा नांव " 

बांदेवाडी गावाक  जाताना लागता वाकडो तिकडो रस्तो, पण घराक जाताच विसरून जातंय असतालो  मी  मुंबईचो पोस्तो. प्रमेळ माझी आजी देते मला चाय आन चपाती,पण आठवणीने मी नेतो ताजी ताजी भाजी .श्री वाडेगती मंदिराच्या मागे आहे प्राचीन तळा,समोरुन बघतंय तर सारवलेला खळा .म्हणूनच म्हणतंय कोंकण माझों गांव, विसरून चालणार नाही त्येचा नांव. 

विजयदुर्गाची खाडी त्यात सोडली उंडलाची होडी,
माडाची माडी आणि ताडाची ताडी ,कोठारवाडीतून घेऊन आली खटारी गाडी. सकाळी जातयं श्री हनुमानाच्या देवळात तर संध्याकाळी आरती करतालो श्री  गणपतीच्या मंदिरात.  दुपारच्या जेवणाक बांगडे आन तारले तर रात्रीच्या जेवणात उरले सुरलेले  कुरले आन  कोंबडीची कवटा. म्हणूनच म्हणतंय कोंकण माझों गांव, विसरून चालणार नाही त्येचा नांव. 

आऊस बापूस कसी म्हणताली,  जावयाक माझ्या  घावणे आन कोंबो पण पावन्याक मात्र देवगडचो हापूस आंबो,बाकी दिवसा कुळिदाची पीटी आणि सुक्या माश्याची आमटी. मेव्हणी येता घरी करी नाचणीची आन तांदळाची भाकरी,पण बायको म्हणता माका सागोती वडे आन  काळया वाटाण्याची आमटी.म्हणूनच म्हणतंय कोंकण माझों गांव, विसरून चालणार नाही त्येचा नांव. 

शिमगो येता दारी,देवखेळे नाचती घरोघरी, ढोल आणि तासे,गांवकर आन बांदकर असतील माझे  खासे.निशाण्या आणि पालखी घेऊन येती तिर्लोटची   गावकी पण रात्री  मांडावर सोंगाशिवाय चावत नाय माका गुळाचा खाजा आन  झोप नाय येत तुका  दशावतारी राजा.म्हणूनच म्हणतंय कोंकण माझों गांव, विसरून चालणार नाही त्येचा नांव.

तेव्हा तुम्ही पण म्हणा "कोंकण माझों गांव विसरून चालणार नाही त्येचा नांव " 

लेखन कौशल्य-उदय माळगांवकर, गिर्ये बांदेवाडी, तालुका-देवगड, जिल्हा-सिंधुदुर्ग, महाराष्ट्र.

लेबल:

सोमवार, ७ फेब्रुवारी, २०२२

जिंदगी - मोबाइल के साथ और मोबाइल के बिना

जिंदगी - मोबाइल के साथ और मोबाइल के बिना 

आज कल हमारी जिंदगी मोबाइल  के साथ बहुत ही कठिन और मेहनत भरी हुई है। हम मोबाइल के बिना रह ही नही सकते।जरा सोचिए, हमारा मोबाइल कुछ देर के लिए  हमसे दूर हो गया । तो हम कैसे अपने आप से बर्ताव करते है। जिसे बिना पाणी कि मछली।
पर आप जानते हो कि यदि हम मोबाइल को कुछ देर के लिए अपने से दूर  रखे । तो क्या  होता है।क्या फायदा या क्या लाभ मिलता है।मोबाइल से ज्यादातर लोग यह बात गंभीर से नही लेते कि मोबाइल का इस्तेमाल ज्यादा देर तक किए तो उससे उत्पन्न होनेवाले रेडिएशन से आपको सिरदर्द और काम मे रूची कम हो जाती है।-रेडिएशन से लंबे समय के बाद प्रजनन क्षमता में कमी, कैंसर, ब्रेन ट्यूमर और मिस कैरेज होती है। -शरीर और दिमाग में मौजूद पानी धीरे-धीरे बॉडी रेडिएशन को अब्जॉर्ब करता है। -मोबाइल के रेडिएशन से कैंसर, ऑर्थराइटिस, अल्जाइमर और हार्ट डिजीज का खतरा रहता है।यह हो गये,मोबाईल से होनेवाले नुकसान के बारे हमने आपको ज्ञात किया।परंतु मोबाईल से फायदे भी बहोत है।जैसे मोबाइल फ़ोन आज स्मार्ट हो गए हैं और हर दिन कई आधिकारिक उद्देश्यों के लिए उपयोग किया जाता है। आज इनका उपयोग रोजमर्रा के कार्यों के प्रबंधन के लिए किया जाता है जैसे – मीटिंग शेड्यूल, दस्तावेज भेजना और प्राप्त करना, प्रस्तुतिकरण, अलार्म आदि देना। मोबाइल फोन हर ऑफिस गोअर के लिए एक आवश्यक गैजेट बन गए हैं।

तो अब आप समझ सकते है कि मोबाइल का इस्तेमाल करके आप को फायदा और नुकसान दोनो हो सकता है।तो अब क्या करे।

जानकार लोग इस बात को बहोत ही अच्छे तरह समझ चुके है। मोबाइल का इस्तेमाल उतना ही करे।जितना जरूरत महसूस करते हो। हररोज की जिंदगी मे एक नियम निश्चित करे कि शाम होने के बाद, मतलब रात के करीब करीब आठ बजे से सुबह सह बजे तक मोबाइल का उपयोग करना वर्जित है।मोबाइल  को अपने से दूर रखे।या उसका इस्तेमाल ना के बराबर है।

शुरूआती  दौर मे आपको यह करना कठिन होगा।लेकिन एक बार आदत बन गई  तो फिर मुस्किल नही है। आप एक बार ठान लिए तो,कोई भी कठिन काम कर सकते हो।सिर्फ अच्छा विचार आपके मन मे आना चाहिए। 

कोशिश करने वालों की हार नही होती है।हम आप को यहाॅ एक कविता सुनाते है।

लहरों से डर कर नौका पार नहीं होती
कोशिश करने वालों की हार नहीं होती

नन्हीं चींटी जब दाना लेकर चलती है
चढ़ती दीवारों पर, सौ बार फिसलती है
मन का विश्वास रगों में साहस भरता है
चढ़कर गिरना, गिरकर चढ़ना न अखरता है
आख़िर उसकी मेहनत बेकार नहीं होती
कोशिश करने वालों की हार नहीं होती

डुबकियां सिंधु में गोताखोर लगाता है
जा जाकर खाली हाथ लौटकर आता है
मिलते नहीं सहज ही मोती गहरे पानी में
बढ़ता दुगना उत्साह इसी हैरानी में
मुट्ठी उसकी खाली हर बार नहीं होती
कोशिश करने वालों की हार नहीं होती

असफलता एक चुनौती है, स्वीकार करो
क्या कमी रह गई, देखो और सुधार करो
जब तक न सफल हो, नींद चैन को त्यागो तुम
संघर्ष का मैदान छोड़ मत भागो तुम
कुछ किये बिना ही जय जयकार नहीं होती
कोशिश करने वालों की हार नहीं होती

अंत मे हम आपको एक बात गंभीर से बताते है कि मोबाइल का इस्तेमाल करो पर जितना जरूरी है। मोबाइल का जादा इस्तेमाल करोगे तो नुकसान आपको ही भुगतना है।जैसे करोगे वैसा ही पायोगे।

सर सलामत तो पगड़ी पचास।जिंदगी अच्छी रही तो मोबाइल कुछ भी नही।पहले भी जिंदगी हम जी रहे थे।जब दूर दूर तक उसका कोई नामोनिशान नही था। और अब भी हम जिंदगी जी रहे है।

तो अब आप समझ चुके होगे कि  हमारी जिंदगी मोबाइल के  साथ और मोबाइल के बिना भी बहोत ही अच्छी है।फैसला आप को करना है।

लेखन कौशल्य-उदय माळगांवकर

लेबल:

मंगळवार, १ फेब्रुवारी, २०२२

मोठी झेप...स्वप्नांचा पाठलाग करा

दिनांक  - १ फेब्रुवारी २०२२  

आज मी सकाळीच सकाळी चिंचवड स्टेशन वर येऊन पोचलो.कारण सुद्धा त्याला तितकेच महत्त्वपूर्ण होते.सालाबाद प्रमाणे ह्यावर्षी सुध्दा आमच्या घरी माघी गणपती उत्सव ,माझ्या नव्हे   आमच्या  सौ.सावित्री बाईसाहेबांनी त्याचे नियोजन  केले आहे.मी असे का म्हणत आहे.ह्याचा प्रत्येय तुम्हांस  पुढील लिखाणावरून समजलेच...

तर मित्र  हो,रेल्वेचे टिकट ( अ‍ॅडव्हान्स बुकिंग-रिझर्व्हेशन) करून मी कल्याणला जाण्यास मी चिंचवड स्थानकावर येऊन पोचलो. कामानिमित्त मी पुण्यात राहतो आणि माझा पूर्ण घर परिवार कल्याण येथे राहतो. त्यामुळेच घराची सर्व जबाबदारी अर्थात आमच्या सौ.वर येऊन पोचते.मग सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत.मी त्या कामाची यादी करत बसलो तर फारच मला लिहून ठेवावे लागेल.म्हणूनच  मी त्या फंदात पडत नाही आणि मी त्याच्यावर भाष्य  करू शकत नाही.कारण आपण सर्वजण जाणकार आहात.आणि एक " घरंदाज स्त्री "च काय करू शकते.हे मी इथं बसून सांगणार नाही. संसाराचा गाडा कसा ओढायचा ह्याची  पीएचडी कोणी केली असेल तर घरच्या बायकोस  विचारा.मग तुम्हांस  समजेल कि हे  भव्यदिव्य धनुष्यबाण ती कसे पेलते ते..आणि आपल्यासाठी ती जिवाचा आटापिटा करते ते.. त्यामुळेच तिला कमी लेखू नका..तिचा आदर करा...मान सन्मान करण्यात जराही मागे पुढे पाहू नका....घराचा स्वर्ग करायचंय तर घरच्या लक्ष्मीचा मान राखा.....

  तर असो ,आपण पुढे जाऊ या. तर मी काय म्हणत होतो...प्रत्येक गोष्टीत तिचा शंभर टक्के सहभाग असतो.आणि माझा वाटा फक्त एक टक्का. कारण  मी प्रत्यक्षात तेथे उपलब्ध  नसतो. पण फायनल टच हे माझ्या  एक टक्क्यांवरच अवलंबून  असते. कारण कोणी तरी म्हणाले कि सबका साथ सबका  विकास..अणि हो,  आम्ही सर्वजण कोणतेही  काम एकशे एक टक्का कसे होईल. यावर भर देतो...कारण आम्हांस सर्व साधारण, चांगले,फारच  चांगलेच,उत्तम वगैरे .... असे केलेले  तिला मान्य  नाही.तर आमच्या सौ.सावित्री बाईसाहेबांनी तसेच  शिकवले आहे की कोणतेही  काम करताना ते "सर्वोत्कृष्ट" कसे होईल. ह्या कडेच लक्ष दिले पाहिजेत आणि तसाच त्याचा आग्रह आणि -होरा सुद्धा असतो.आणि सर्वजण तो तंतोतंत पालन करण्याचा प्रयत्न करत असतात.आणि त्यात आम्हांस आनंद वाटतो.कारण त्या शिक्षिका आहेत.

आणि  त्या  नेहेमीच  म्हणतात  # Always go for Excellence..कारण त्याचे असे सांगणे  आहे की लोक नेहमीच  सर्वोत्कृष्ट गोष्टींवर  लक्ष  केंद्रित  करतात किंवा  त्यालाच  फार  मागणी असते...जसे धातूंच्या  अनेक चकाकणा-या  गोष्टी आहेत पण सर्वात जास्त  मागणी सोन्याला असते.कारण  गुणवत्तेवर  चर्चा  होते.तेव्हा  सोन्याचा कस मोजला जातो....आणि त्यामुळेच  ते  जो काही निर्णय घेतात त्यास आमचे सर्वजणांचे अनुमोदन असते.फार नाही तर थोडेफार ...केव्हा केव्हा चालू परिस्थितीत निर्णय  घेताना त्यात बदल सुद्धा होत असतात.पण फारच दुर्मीळच..पण निर्णय  घेताना सर्वजण त्या चर्चेत सहभाग घेतात.सर्वाचेच मत विचारात घेऊनच पुढील वाटचाल होत असते. अर्थात आमची टीम लीडर असते.आमची होम मिनिस्टर म्हणजेच आमची सौ.सावित्री बाईसाहेब .थोडक्यात काय ," नियोजन कर्ती " " Event Manager "  असे मी का म्हणालो ते आता समजून आलेच असेल..In short all solutions under one roof ..or  SPOC ( Single Point Of Contact.) 

तर मित्र हो,परत आपण मूळ मुद्यावर बोलूयात .तर आज मी पुण्यातून कल्याणला जाण्यास चिंचवड स्टेशन वर आलो..माझी चौकस बुद्धी आणि चौफेर वायुवेगाने फिरणारी नजर, मला काही स्वस्थ बसू देत नव्हती..माझी नजर समोरील फलाट क्रमांक तीन वर एका रेल्वे पुरस्कृत रेल्वेच्या डब्यावर पडली. आणि मित्र  हो,मी तुम्हांस  काय सांगू...तिथे  साकारलेले चित्र पाहून व त्यावरील लिहून ठेवलेला महत्त्वपूर्ण संदेश पाहून मी क्षणभर विसरूनच गेलो कि मी रेल्वे स्टेशन वर उभा आहे ते...तो संदेश असा  होता ... 

" I would say if you have a dream,it doesn't really matter whether you are woman or from India or from wherever. Message Quoted by Kalpna Chawla. "तुम्ही एखादे स्वप्न पाहत असाल तर मी म्हणेन. त्याचे अनुसरण करा. तुम्ही स्त्री आहात किंवा भारतातील आहात किंवा कोठूनही आहात याने काही फरक पडत नाही. कल्पना चावला यांनी उद्धृत केलेला संदेश.
कल्पना चावला : प्रत्येक भारतीयाच्या मनातील अंतराळ परी" 

पुढे काहीच सांगायची गरज नव्हती..मला तो सर्व प्रसंग डोळ्यासमोर उभा ठाकला...तो काळाकुट्ट दिवस आठवला.तो होता १ फेब्रुवारी  २००३ ...ज्या दिवशी म्हणजेच १ फेब्रुवारी २००३ ला कोलंबिया अंतराळ यानाने पृथ्वीकडं येण्यासाठी अमेरिकेजवळच्या पॅसिफिक समुद्राकडं झेप घेतली. अंतराळवीरांनी स्पेस सुट घातला. त्यावेळी सर्व योग्यरीत्या सुरू होतं.

त्यावेळी स्थानिक वेळेनुसार सकाळच्या 8.40 वाजता कोलंबिया यानानं पृथ्वीच्या वातावरणात प्रवेश केला. अंतराळवीर आणि नासातल्या अंतराळयान नियंत्रण कक्षातले सगळेजण आनंदी होते.22 मिनिटांत ते यान पृथ्वीवर उतरणार होतं. सुमारे 8.54 वाजता यानाचा आणि नियंत्रण कक्षाचा संपर्क तुटायला सुरुवात झाली. 9.16 वाजता काही गोष्टी स्पष्ट व्हायला लागल्या आणि कोलंबिया यान इतिहासात जमा झालं.

तेव्हा कोलंबिया स्पेस शटलचा अपघात झाला आणि त्यातच सगळ्या अंतराळवीरांचं निधन झालं.

आपण एका भारतीय अंतराळ परी # कल्पना चावला" ह्यास कायमचे पोरके झालो होतो...तो दिवस  आणि आजचा दिवस ह्यास  विशेष महत्त्व आहे. ते आपणास विसरून चालणार नाही.कारण  आज १ फेब्रुवारी २०२२ आहे..म्हणजेच आज तिचा स्मृतिदिन  आहे. तिने सांगितलं  तसे " तुम्ही एखादे स्वप्न पाहत असाल तर मी म्हणेन. त्याचे अनुसरण करा. तुम्ही स्त्री आहात किंवा भारतातील आहात किंवा कोठूनही आहात याने काही फरक पडत नाही.# कल्पना चावला.तिने आपली सर्व स्वप्न पूर्ण केली होती..ती अजरामर झाली होती.तिच्यावर  मी काही जास्त बोलणार.....पण एवढ्यात माझी गाडी आली व मी गाडीत जाऊन बसलो.मला सीट  मिळाली कारण  माझे रिझर्व्हेशन  होते व मी गाडीतच लिखाण करण्यास सुरुवात  केली..

मी लिहितच होतो.कारण तिने सांगितल्याप्रमाणेच  आम्ही दोघंजणांनी सुदधा ( नवरा बायको) एक स्वप्न पाहिलं होते.आणि ते म्हणजेच आमचे लग्न  झाल्यावर ,माझी सौभाग्यवती माहेर सोडून सासरी आली होती. ती आता सासुरवाशीण  झाली होती..पण तिचे पुढील शिक्षण थांबले होते.ती " हंगामी  शिक्षक "म्हणून नोकरी करत  होती.लग्न करताना तिने मला एक अट घातली होती आणि ती म्हणजेच मला बीएड करण्यास आपण मला मदत कराल..मी पण लगेच हो सुद्धा म्हटलं..पण मला कुठे माहित होते कि पुढे काय वाढून ठेवलय ते..झाल दिवसामागून  दिवस  जात  होते..आणि थोड्याच दिवसात  एक गोड बातमी आम्हांस  समजली. ती आता आई होणार होती.मग काय सगळीकडेच  आनंदीआनंद ..त्या काळात आम्ही दोघंजण हे विसरून गेलो..आणि वर्तमान स्थितीवर अवलोकन करून एक निर्णय घेतला कि आता मुलांची संगोपन करण्यासाठी तिने शाळेतली नोकरी सोडून  घरीच  राहावे..कारण मी फिरतीची नोकरी करत  होतो..तिने हा निर्णय  मान्य  केला पण  एका अटीवर कि वेळ मिळेल तेव्हा  तूम्ही  माझं स्वप्न पूर्ण  करायचे.मला तिला बीएड करायचंय....पण 
दिवसामागून दिवस चालेले होते..ह्यातच आमची चौदा वर्षे निघून गेली..फार पावसाळे झाले होते ..पण मी ती गोष्ट विसरलो नव्हतो.....

#  स्वप्नांचा पाठलाग." .मी परत भूतकाळात जाऊन पोचलो..पण डब्यात  झालेला गोंगाट ऐकून माझी तंद्री भंग  पावली.मी लिखाण थोडे थांबवले.कारण कर्जत स्टेशन वर गाडी येऊन पोचली होती...अरे हो, मी सांगायलाच  विसरलो कि मी गाडीत बसून  कल्याणला निघालो आहे ते. आणि हे लिखाण मी चालू गाडीतच लिहत आहे..मला कल्याण यायच्या अगोदरच हे पूर्ण केले पाहिजेत..तर थोडा धीर   धरा...एक घोट पाणी पिऊन व डब्यात  आलेला नाष्टा व चहापानानंतर  परत लिखाण करण्यास  सुरुवात  केली...

चौदा वर्षांत आम्हांस दोन कन्यारत्नांनी आमचे घर आता उजळून निघाले होते.आमचे कुटुंब चौकोनी झाला होते.आमच्या घरात  लक्ष्मी व सरस्वती पाणी ह्याचा आम्हांस वरदहस्त लाभला होता.असे मी म्हटल तर वावगं ठरणार नाही.कारण मी अभियंता म्हणून भरपूर पैसा कमवत होतो आणिक माझी धर्मपत्नी  शिक्षक या नात्याने आमच्या मुलांवर  चांगले संस्कार घडवत होती. जरी तिने नोकरी सोडून  घरी बसली  होती.तरी तिचे घरच्याघरी होम क्लासेस चालूच होते व त्यास उत्तम प्रतिसाद सुद्धा  मिळत  होता..दिवसभरात जवळपास तीस चाळीस  मुले मुली आमच्या घरात येत जात होती.त्यावरूनच तुम्हांस समजलेच असेल कि  हाडाचा  शिक्षक कोणास म्हटले जाते ते...असे मी का म्हणतो तर तिचे विद्यार्थी ,विद्यार्थिनी  आज उत्कृष्ट शिक्षण घेऊन डॉक्टर ,इंजिनिअर, ऐवन ऑफिसर झाले आहेत. कोणी अमेरिकेत वा जपान, जर्मनीत काम करतात आहेत.........तर आमचे सर्व आलबेल सुरळीत चालू  होते...सुखासमाधानात जराही कसलीच कमतरता नव्हती.

तर झालं असे कि माझ्या सासुरवाडीत सालाबाद प्रमाणे  भाद्रपदातील गणपती आला होता व आम्ही दोघंजण त्याच्या  घरी जाण्यास  निघालोच....सवयीनुसार मी एक मराठी वर्तमान पत्र  विकत  घेऊन  वाचायला सुरुवात  केली...वाचता वाचता माझी नजर  एका बातमीवर गेली...त्यात असे लिहले होते कि होतकरू विद्यार्थी आणि विद्यार्थीना आपले  बीएड चे पुढील शिक्षण पूर्ण करता येईल.मग काय माझ मन चक्क त्या गोष्टीवर पुढे सरकायला धजावत नव्हतं...मी लगेच बायकोस न बोलता .त्यात लिहिलेल्या फोनवर फोन गेला.तेव्हा मला समजले कि शेवटच्या तीन जागा खाली आहेत..मी आपलं संभाषण थांबवून सासुरवाडीत येऊन पीहचलो. रितीरिवाजानुसार गणपतीचे दर्शन घेऊन बायकोस म्हणालो ,चला आपणास एका ठिकाणी जायचं आहे.ती पण काही आढेवेढे न घेता निघाली.कोणालाच काहीच बोललो नाही.कारण मला सुद्धा काहीच माहित नव्हते की पुढे काय होणार ???

रिक्षात बसून  सरळ शिक्षण संस्थेत येऊन पोचलो.   संबधित क्लार्क ला भेटून  सर्व  फॉर्म भरून पुढील सर्व  सोयिस्कर गोष्टी पार करून ,पैसे भरायची वेळ आली..तर त्यावेळेस  माझ्याकडे पैसेच  नव्हते..आता काय  करायचं??? आता परत क्लार्कला भेटून अडचण सांगितली. तर तो म्हणाला कि आज शेवटचा दिवस आहे. तेव्हा तुम्ही काहीही करा व दुपारी तीन वाजेपर्यंत पैसे भरा.नाहीतर दुस-यास सीट दिली जाईल...मग काय आली का पंचाईत..

थोडावेळ थांबून दोन मिनिटांचा पाॅज घेऊन विचार करू लागलो. कारण  मित्र हो ,ही संधी मला सोडायची नव्हती..कारण ती चौदा वर्षांनी मला गणपती बाप्पाने दिली होती. मी बायकोस शब्द दिला होता..अरे हो ,एवढ्यात मला आठवले कि आपण गणरायाला साकडे घालूया.आज गणेशचतुर्थीच आहे.चांगला योग आहे..तो आपल्याला जरूर मार्ग दाखवेल आणि झालंच तसे....मी मनात मनात गणपती बाप्पाला साकड घालतो  ना घालतोच तोवर माझ्या मोबाईलवर एक मेसेज आला.मी लगेच बघितलं तर आमच्या कंपनीकडून  माझा आऊट डोअर्स चा मोबदला  जमा झाला होता. जो कि बाकी होता....ती रक्कम निश्चित मला लागणा-या फी पेक्षा जास्त होती...मग देवाचे आभार मानून सर्व पैसे जमा केले.एकूण तीस हजार भरले.आमचे अ‍ॅडमिशन पूर्ण  झाले होते...म्हणूनच  म्हणतात  " भाव तेथे देव "

अर्थात चौदा वर्षानी आमचे स्वप्न पूर्ण झाले होते....म्हणूनच म्हणतात स्वप्नाचा पाठलाग  करा.स्वप्न पूर्ण होण्यास  थोडीफार  वेळ लागेल  पण प्रयत्न  सोडू नका..एक ना एक दिवस..देव  तुमची ईच्छा  पुर्ण  करणार....

आज आमच्या सौ.सावित्री बाईसाहेब " एम ए बी एड आहेत.आणि त्याचा आम्हांस सार्थ अभिमान आहे...

मित्र हो,मी आपला निरोप  घेतो.माझा प्रवास इथेच संपणार  आहे.कारण  कल्याण स्टेशन आले आहे .घड्याळात बघितल तर नऊ वाजून दोन मिनिटे झाली होती....रेल्वेतील अनाउन्समेंट चालू होती... पण तुम्ही काही थांबू नका ,स्वप्नांचा पाठलाग  करा....देव  सर्वत्र आहे..तो तुमच्या पाठिशी आहे.तो सर्व  तुमच्याच  ईच्छा पुर्ण करेल. खात्री बाळगा....गणपती बाप्पा मोरया...

विशेष  नोंद-मित्र हो,आजचा लेख वाचून आपणांस  कसा वाटला.ते जरूर  कळवा.आपले  मत विचारात घेतले जाईल....वाचक वर्ग हा लेखकास आरशातल्या  प्रतिबिंबासारखा असतो.तेव्हा  आपला अभिप्राय जरूर कळवा.....

@लेखनकौशल्य-उदय माळगांवकर

लेबल: